पॅनकेक - स्ट्रॉबेरी सिरप
खुप दिवसांपासुन पॅनकेक खाण्याची व (त्याहिपेक्षा) बनवण्याची इच्छा होती , शेवटी ह्या विकांताला बनवण्याचा योग आला.
साहित्य : (साधारण ५-६ पॅनकेक च्या हिशोबाने)
पॅनकेक :
१. मैदा - १ वाटी
२. गव्हाचे पीठ - १ वाटी
३. ताक - २ वाटी
४. दुध - १ वाटी
५. अंड - १
६. बटर - ५० ग्रॅम
७. बेकिंग पावडर - २ चमचे
८. बेकिंग सोडा - अर्धा चमचा
९. पीठीसाखर - ३ चमचे
१०. मीठ - चवीनुसार
११. फ्रेश-क्रिम - सर्व्हिंगनुसार
स्ट्रॉबेरी सिरप :
१. स्ट्रॉबेरी - १०
२. साखर - ५-७ चमचे
३. पाणी - ३ वाटी
कृती :
पॅनकेक :
१. मैदा, गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, पीठीसाखर व मीठ व्यवस्थीत एकत्र करुन घ्यावे (कोरडे मिश्रण).
२. एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग (एग व्हाईट) व ताक एकजीव करुन घ्यावे.
३. दुसर्या भांड्यात २-३ चमचे बटर(शक्यतो गरम पाण्यावर वा वाफेवर थोडे वितळुन घ्यावे) व अंड्याचा पिवळा बलक एकत्र फेटुन घ्यावे.
४. अता ताक्+एग व्हाईट व बटर+पिवळा बलक ह्यांचे मिश्रण (वरील क्र.२ व ३) एकत्र करुन घ्यावे.
५. ह्या मिश्रणा मधे कोरडे मिश्रण (वरील क्र. १) हळूहळू ओतावे आणि मिश्रण सतत हलवत रहावे, गुठळ्या-रहित.
६. हे मिश्रण डोश्याच्या मिश्रणाप्रमाणे घट्ट/सैल ठेवावे, अति-घट्ट वाटल्यास सैल करण्यासाठी दुध टाकावे. मिश्रण साधारण १०-१५ मिनीटांसाठी झाकुन ठेवावे.
७. अता मध्यम आचेवर, पॅनवर थोडे बटर टाकुन ते सर्व बाजुस फिरवुन पेनकेक चे मिश्रण पॅन वर डावाने किंवा वाटीने टाकावे/पसरावे (डोश्याप्रमाणे डावाने वा वाटीच्या बुडाने पसरु नये, कारण पॅनकेक जाडच असलेला चांगला लागतो व 'sponge' होतो).
८. पॅनकेक दोन्हि बाजुने व्यवस्थीत परतुन घ्यावा (बेक करावा). सोनेरी/गोल्डन ब्राउन होईपर्यंत बेक करावा.
पॅनकेक तयार :) अश्या ह्या पॅनकेक वर फ्रेशक्रिम पसरावे. पण 'सिरप' शिवाय पॅनकेक ला 'काय मजा नाय..' :)
म्हणुन ...
स्ट्रॉबेरी सिरप :
१. स्ट्रॉबेरीज बारीक चिरुन व थोडे क्रश करुन घ्यावे.
२. पाण्यामधे साखर व (वरील) क्रश स्ट्रॉबेरी टाकुन त्याचा एकतारी पाक होईपर्यंत ते मध्यम आचेवर ठेवावे व नंतर व्यवस्थीत गाळुन घ्यावे कि झाले झटपट स्ट्रॉबेरी सिरप :)
गरमा-गरम पॅनकेक मस्तं स्ट्रॉबेरी सिरप बरोबर सर्व्ह करावे ( चांगले ओतावेच ते सिरप त्या पॅनकेक वर :) )
वाचने
5478
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
iHOP आठवले आणि तिथे ज्यांच्या
In reply to iHOP आठवले आणि तिथे ज्यांच्या by विश्वनाथ मेहेंदळे
लेक ताहो
वा झकास
झक्कास ,जबरदस्त ! या विकान्ती
आहं...
छान
स्वारी खुसपटं नाही काढत पण
In reply to स्वारी खुसपटं नाही काढत पण by गणपा
सहमत
In reply to स्वारी खुसपटं नाही काढत पण by गणपा
@गणपा : अहो 'स्वारी' काय
छानच.........
लई भारी...
पॅन केक बसला वाट्टं. सिरप