नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन
आज आमच्या नायजेरिया(नायज्जा)मधील एक पाककृती तुमच्यासाठी घेउन आलोय. हा नायजेरियचा राष्ट्रीय पदार्थच आहे म्हणा ना. अगदी लग्ना,बारश्या पासुन ते 'दिवसा'पर्यंत कुठलाही समारंभ असुद्यात मग जेलोफ राईस हवाच हवा. त्याशिवाय पंगत पुर्ण होणे नाहीच.
या भाताच्या जोडीला येते ती पेप्पे चिकनची तंगडी नाही तर मग चिकन स्ट्यु किंवा कॅरमलाईज्ड प्लँटीन (राजेळी केळी).
थोडक्यात सांगायच तर जेलोफ राईस म्हणजे आपला टॉमेटो राईसच पण किंचीत बदल.
चला तर मग लागुया तयारीला.
साहित्य :
२ वाट्या तांदुळ १/२ तास भिजत ठेवलेला. (इथे उकडा तांदुळ वापरला जातो. मी बासमती वापरलाय.)
२ मोठे कांदे.
२ मोठे टोमॅटो.
२-३ मोठे चमचे टोमॅटो पेस्ट.
२ लहान गाजरं.
१ वाटी मटार दाणे.
४-५ पाकळ्या लसुण.
१/२ इंच आले.
२-३ लहान लाल बेल पेपर्स. (ज्या भुतलावरील काही अती जहाल मिरच्यांमध्ये मोडतात. पण त्यांचा एक भनाट गंध असतो.)
३-४ लहान सिझनिंग क्युब्स.
१ डाव तेल.
कृती :
टॉमेटोला वर चित्रात दाखवल्या प्रमाणे सुरीने चरे पाडुन घ्यावे. मिरच्या स्क्युअर स्टिकमध्ये ओवून घ्याव्या.
एका भांड्यात पाण्याला उकळी आणुन मग यात हे टॉमेटो ब्लांच करुन घ्यावे.
टॉमेटो शिजतायत तोवर मिरच्या मधम आचेवर भाजुन घ्याव्या. भाजुन नंतर थंड झाल्यावर आतल्या बीया काढून टाकाव्या.
मिक्सरमध्ये १/२ कांदा, २ लसुण पाकळ्या, आलं, ब्लांच केलेले टॉमेटो (सालं काढूण टाकावी.) आणि भाजलेल्या मिरच्या टाकुन पातळ वाटुन घ्यावं.
एका भांड्यात १ डाव तेल तापवून त्यात २ पाकळ्या बारील चिरलेला लसुण आणि उभा/आडवा कापलेला कांदा टाकुन परतुन घ्यावं.
कांदा गुलाबी पारदर्शक झाला की त्या वर वाटलेले टॉमेटो आणि टॉमेटो पेस्टं टाकुन ५-१० मिनीटे परतुन घ्यावं.
सिझनिंग क्युब टाकाव्या. नसल्यास चवी नुसार मीठ, २ चमचे संडे मसाला (बाजारात रेडिमेड मिळतो) टाकावा.
भिजत ठेवलेला तांदुळ (पाण्या शिवाय) टाकुन हलक्या हाताने परतुन घ्यावा. जास्त ढवळा ढवळ केली तर भाताची कणी मोडेल.
अंदाजे तांदळाच्या १/२ इंच वर येईल इतपत गरम पाणी टाकावं आणि झाकण ठेवून मंद आचेवर १५-२० मिनीटे शिजू द्यावं. मध्ये मध्ये थोडा पाण्याचा अंदाज घ्यावा. अगदीच गरज भासली तर थोडं गरम पाणी वाढवावं.
भात शिजतोय तोवर आपण पेप्पे चिकनची तयारी करु.
चिकनचा लेग पीस स्वच्छ धुवून कोरडा करुन घ्यावा. त्याला सुरीने २-३ ठिकाणी चरे द्यावे.
१ चमचा तेल + १ चमचा कायेन पेपर (ही तिखट नसते पण रंग बरा येतो. नसल्यास काश्मिरी लाल तिखटं) चवी नुसार मीठ + चिली फ्लेक्स् + सुकवलेली थाईमची पानं (चित्रात दिसत नाहीयेत, ति मी नंतर टाकली.) एकत्र करुन घ्यावी.
वरील मिश्रण चिकनला लावून ५ मिनीटे मुरू द्यावं. तोवर ओव्हन २००° C वर ५ मिनिटं तापत ठेवावा.
ओव्हन तापल्यावर त्यात चिकन ठेवून २५-३० मिनेटे शिजवून घ्यावं. शेवटची ३ मिनीटे. ग्रील मोड वर ठेवावं.
चिकन शिजतय तोवर आपल्या भाताचं काय झालय?
ह्म्मम्म पाणी बहुतेक आटत आलय भातही बर्या पैकी शिजत आलाय. आता त्यात गाजराचे तुकडे आणि मटार टाकुन हलक्या हाताने ढवळुन वरून झाकण लावून (सील बंद करुन) परत १५ ते २० मिनीटे आतल्या आत वाफेवर शिजू द्यावं.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
इथला जेलोफ राईस आणि चिकन पेप्पे कसं दिसतं याची कल्पना यावी म्हणुन इथल्या 'टँटेलायझर'या फुड चेन मधुन मागवलेली ही डीश.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
आणि ही आहे आपण तयार केलेली.
दिसतेय की नाही हाटीलातल्या सारखी? :)

वाचने
18788
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
झकास
In reply to झकास by जाई.
सुपर्ब ! हाटलीतल्यापेक्षा
मी अभक्ष्य(क) नाही... पण
अहाहा!
अरे अजुन एक फोटो
अप्रतिम कलाकृती.
गाजराचे तुकडे अगदी एकसारखे
In reply to गाजराचे तुकडे अगदी एकसारखे by रेवती
अग दोन शेपरेट रेसिप्या
In reply to गाजराचे तुकडे अगदी एकसारखे by रेवती
चित्र
In reply to चित्र by चिंतामणी
चिंतुकाका, अगदी हेच केले.
In reply to चिंतुकाका, अगदी हेच केले. by रेवती
(No subject)
वा... काय मस्त दिसतय.......
चिकन जौदे! पण हा राइस एकदा
अप्रतिम...
In reply to अप्रतिम... by प्रभाकर पेठकर
छोट्या बेलपेपरऐवजी मोठी १ रेड
In reply to छोट्या बेलपेपरऐवजी मोठी १ रेड by स्वाती२
सहमत.
In reply to अप्रतिम... by प्रभाकर पेठकर
या फोटोतल्या मिरच्या
In reply to या फोटोतल्या मिरच्या by अमेरिकन त्रिशंकू
या फोटोतल्या मिरच्या
In reply to या फोटोतल्या मिरच्या by गणपा
हबनेरो पेपर्सचा तिखटपणा
In reply to हबनेरो पेपर्सचा तिखटपणा by स्वाती२
हाबन्येरो भाजून त्याच्या
व्वा भन्नाट रेसिपी
....._/\_... दंडवत
गणपा, तुमच्या प्रत्येक पाक्रु
एक वाक्य आहे.
...
कोंबडीस
कोंबडी तंगडी घेऊन पळू न
In reply to कोंबडी तंगडी घेऊन पळू न by प्यारे१
गणपानं शिळ्या भाकरीचे तुकडे
आयचा घोव.... भन्नाट
मस्त मस्त मस्त..
खपलेय
फोटो पाहूनच मन तृप्त झाले!
शाब्बास चालू दे....
भारीच
गणपाची एक एक पाककृती म्हणजे
खल्लास
खंग्री.