घोळात घोळ नव्हे घोळ म्हणजे मासा
घोळीचे सर्वच भाग खाण्यासाठी वापरतात. मोठी घोळ चविष्ट असते. वरील फोटोपेक्षाही घोळीचा मोठा मासा असतो. घोळ माश्याला मोठी खवले असतात. ह्याच्या डोक्याला घबाड म्हणतात. हे डोकेही चविष्ट म्हणून खास कालवणासाठी डोके मासेखाऊ नेतात.
घोळीचा मधला काटाही कालवणासाठी वापरतात. (माझा फेव्हरेट लहानपणापासुन) हा काटा उखळीप्रमाणे असतो. ह्याच्या मधले जॉइंट काढले की त्यात रस मिळतो तो प्यायचा हा पुर्वीपासूनचा छंद. काट्याच्या म्हणजे मणक्याच्या बाजूला थोडे मांस असते.
घोळीचा पिसारा म्हणजे प्रराकडचा मांसल भाग. ह्याचे कालवण करतात.
घोळीच्या मधल्या भागाच्या तुकड्या तळण्यासाठी व कालवणासाठीही वापरतात.
चविला हा मासा मध्यम, म्हणजे कोणालाही आवडेल असाच. अती चविष्ट नाही व मुळमुळीतही नाही.
साहित्यः
घोळ माश्याच्या ५-६ तुकड्या
ओल खोबर, आल, लसुण, मिरची, कोथींबीर वाटण
हिंग चिमुटभर
हळद पाव चमचा
मसाला २ चमचे
लींबाएवढ्या चिंचेचा कोळ
चवीपुरते मिठ
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
१ किंवा २ छोटी पळी तेल
पाककृती:
१) घोळीच्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
मी वरच्या पेक्षा जास्त प्रमाणात घेतल्या आहेत.
२) भांड्यात तेल गरम करून त्यावर लसुणाची फोडणी द्यायची.
३) त्यातच लगेच हिंग, हळद, मसाला घालून पटकन ढवळून लगेच वाटण घालायचे. जर पटापट जमत नसेल तर वाटण घातल्यावर मसाला घाला त्यामुळे मसाला करपणार नाही. पण जर तेलातच घातलात तर कालवणाला चांगला लाल रंग येतो.
४) आता त्यात चिंचेचा कोळ, घोळिच्या तुकड्या, मिठ, गरज असेल तेवढेच पाणी घालून ढवळून उकळवत ठेवा
५) उकळी आल्यावर साधारण ७-८ मिनीटांत गॅस बंद करा.
झाले घोळीचे कालवण.हाकानाका?
अधिक टिपा:
घोळीच्या कालवणात शेवग्याच्या शेंगा, टोमॅटोही चांगला लाग्तो. शेंगा घालायच्या असतील तर चिंचेचा कोळ व तुकड्या घालण्याआधी शिजवून घ्याव्यात.
हे कालवण जास्त दाट न करता पातळच करावे म्हणजे वाटणाची चव न येता खरी माश्याची चव त्यात उतरते. काहीजण वाटण न घालताही हे कालवण करतात.
तुकड्या तळण्यासाठी नेहमीसारखेच हळद, मसाला, मिठ लावून तळाव्यात.
घोळीचे सर्वच भाग खाण्यासाठी वापरतात. मोठी घोळ चविष्ट असते. वरील फोटोपेक्षाही घोळीचा मोठा मासा असतो. घोळ माश्याला मोठी खवले असतात. ह्याच्या डोक्याला घबाड म्हणतात. हे डोकेही चविष्ट म्हणून खास कालवणासाठी डोके मासेखाऊ नेतात.
घोळीचा मधला काटाही कालवणासाठी वापरतात. (माझा फेव्हरेट लहानपणापासुन) हा काटा उखळीप्रमाणे असतो. ह्याच्या मधले जॉइंट काढले की त्यात रस मिळतो तो प्यायचा हा पुर्वीपासूनचा छंद. काट्याच्या म्हणजे मणक्याच्या बाजूला थोडे मांस असते.
घोळीचा पिसारा म्हणजे प्रराकडचा मांसल भाग. ह्याचे कालवण करतात.
घोळीच्या मधल्या भागाच्या तुकड्या तळण्यासाठी व कालवणासाठीही वापरतात.
चविला हा मासा मध्यम, म्हणजे कोणालाही आवडेल असाच. अती चविष्ट नाही व मुळमुळीतही नाही.
साहित्यः
घोळ माश्याच्या ५-६ तुकड्या
ओल खोबर, आल, लसुण, मिरची, कोथींबीर वाटण
हिंग चिमुटभर
हळद पाव चमचा
मसाला २ चमचे
लींबाएवढ्या चिंचेचा कोळ
चवीपुरते मिठ
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
१ किंवा २ छोटी पळी तेल
पाककृती:
१) घोळीच्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
मी वरच्या पेक्षा जास्त प्रमाणात घेतल्या आहेत.
वाचन संख्या
24699
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप दिवसांनी दर्शन दिलत जागु तै. :)
हो गणपा तेही पातळ पातळ कालवण
वा.... तोंपासु
आहा... जागुतै मूळ रुपात
मृणालीनी, गवी धन्यवाद.
व्वा!
सर्वात आवडता मासा
अरे व्व्वा जागुताई, घोळ
काय तायडे बऱ्याच दिवसांनी
तोँपासू मस्तच
सानिका, शाहिर, विश्वनाथ,
झकास....
इंग्रजी नाव (Spotted
In reply to झकास.... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to इंग्रजी नाव (Spotted by गणपा
जागु, शेवटी तू घोळ
अरारारा
In reply to जागु, शेवटी तू घोळ by रेवती
मस्त दिसतेय कालवण..
वाह वाह
चांगलाच घोळ दिसतोय सीफुड
रेवती इच्छा मारू नकोस पुन्हा
धन्यवाद जागुतै..
त्या फोटो मधिल माश्याच्या
एक अंदाज..
In reply to त्या फोटो मधिल माश्याच्या by पक पक पक
हेच ते...
मस्त एकदम ... रेवती जी.. मन न
आजच हा मासा पालघरनजीक एका
मला वाटते
In reply to आजच हा मासा पालघरनजीक एका by गवि
होयं...हि बातमी खरी आहे.
त्यांनी ही बोथ इतकी महाग विकत