नमस्कार,
'मराठी-मराठी ' चांगला शब्दकोश कोणी सुचवू शकेल काय? तुम्ही वापरला असल्यास कृपया आपले अनुभव जरूर सांगा.
मी अ.ब.चौकात चौकशी केली होती खूप दिवस आधी - अनमोल चा उपलब्ध होता पण सांगण्यात आले की दुसरा कुठला तरी एक चांगला(प्रमाण म्हणता येईल असा) शब्दकोश आहे पण सध्या तो उपलब्ध नाही (out of print).
काही शब्द इथे देत आहे, जाणकारांनी अर्थ सांगितल्यास बरे होईल :)
- परवाचा : मला वाटते ह्याचा अर्थ श्लोकासारखे काही जे दिवेलागणी वेळी म्हटले जाते असा असावा.
- नेणीव: अंतर्मनाशी जवळ जाणारा अर्थ असावा असे वाटतं. (subconcious?)
- असिधाराव्रत : मी मागे विचारणा केली होती एकदा, त्याचा अर्थ 'तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखे अवघड व्रत' असा सांगण्यात आला होता.
- व्यवच्छेदक (लक्षण): सर्वसामान्य पणे आढळणारे लक्षण असा अर्थ का?
- यादृच्छिक
- साक्षेपी
धन्यवाद.
वाचने
7181
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुरुस्ती
'परवचा' = पाढे.
यादृच्छिक :- Randomसाक्षेपी
बर्यापैकी अर्थ तर तुम्हालाच माहीत आहेत! तरीही.....
”विस्तारित शब्दरत्नाकर’ मधे किती पानं आहेत ?
In reply to बर्यापैकी अर्थ तर तुम्हालाच माहीत आहेत! तरीही..... by नरेंद्र गोळे
महाराष्ट्र शब्दकोश
मोल्सवर्थ
धन्यवाद!
आपटे
नेणीव =अज्ञान
नेणीव