
नमस्कार मंडळी.. गेले काही दिवस आंतरजालापासून दूर होते. सध्या ख्रिसमसमय माहौल आहे, फ्रांकफुर्टचे ख्रिसमस मार्केट आणि त्यातील चॉकलेट्स, गरमागरम चेस्टनट्स, ब्राटवुर्ष्ट, राकलेट, फाँड्यु आणि ग्लुवाइनचे स्टॉल्स भरभरुन गर्दी करत आहेत.ग्लु वाइनच्या जोडीला चेरी, रास्पबेरी, प्लमच्या वाइन्सही वाफाळत आहेत.खास मुलांकरता आणि अल्कोहोल न पिणार्यांकरता नॉनअल्कोहोलिक ग्लु वाइन्सचे स्टॉल्सही आहेत. त्यात आज शेवटचा रविवार! दोन चार दिवसातच मार्केट बंद होणार ते पुढच्या नाताळापर्यंत.. पण ग्लु वाइनची मजा घरीही घेता येईलच की! म्हणूनच ही पाकृ: (ग्लु वाइन मधील अनेक व्हेरिएशन्स पैकी हे एक - जर्मनीतल्या मार्केटात ग्लु वाइन आणि ग्लु वाइनचा स्पेशल मसाला मिळतो , परंतु तो सगळीकडे उपलब्ध नसतो. म्हणून ही दुसरी पध्दत देते आहे.)
ग्लु वाइनला (Glühwein) म्युल्ड वाइन (Mulled wine) असेही म्हणतात.
साहित्य- १ लिटर साधीशी रेड वाइन (उगाच महागडी रेड वाइन नासायची गरज नाही.ती नुसती पिता येते.)
३/४ लवंगा,२ वेलदोडे, १ बोटभर दालचिनीचा तुकडा,लिंबाची किसलेली साल २ टी स्पून,
४ ते ५ टेबलस्पून साखर (अधिक गोड हवी असेल तर अजून २ चमचे साखर घाला)
आणि कडाक्याची थंडी! साहित्यात हा पदार्थ नसेल तर ग्लु वाइनला मजा नाही!
कृती- अगदी सोप्पी आहे.
दालचिनी,वेलदोडे, लवंगा, लिंबाची किसलेली साल ह्या सर्वाची मिक्सरमधून पूड करा रेड वाइनमध्ये ही पूड आणि साखर घाला व गरम करत ठेवा,उकळू नका. पुरेसे गरम झाले की गाळून कपातून प्या.
ग्लु वाइन
कपातूनच पितात.
प्रतिक्रिया
धन्यवाद!
जर्मनीतल्या मार्केटात ग्लु
छानच दिसतेय!
जाहिर प्रार्थना...
धन्यवाद. या पाककृतीची वाटच
असं असतंय काय हे, बरं बरं,
चला एखादी तरी दारु गरम करुन
In reply to असं असतंय काय हे, बरं बरं, by ५० फक्त
जेब्बात !!
In reply to असं असतंय काय हे, बरं बरं, by ५० फक्त
येस्स्स्स......
ग्लु वाइन कपातूनच पितात.
हे घ्या
In reply to ग्लु वाइन कपातूनच पितात. by चिंतामणी
एकदम ब्येस
मसाला चहाची आठवण झाली.. शुद्ध
सहीच... प्यायला आवडेल
मस्त गं स्वातीताई, करुन
मी काय म्हणतो ही ग्लु वाइन
आणि कडाक्याची थंडी! साहित्यात
आणि कडाक्याची थंडी! साहित्यात
ब्येष्ट....
ब्येष्ट....
>>आत्ता त्या वाईनचे घोट घेत
In reply to ब्येष्ट.... by प्रभाकर पेठकर
आमच्या कोंकणातली गरमागरम
In reply to >>आत्ता त्या वाईनचे घोट घेत by अन्या दातार
दिसते तर एकदम खल्लास. रेसिपी
In reply to आमच्या कोंकणातली गरमागरम by गवि
ज्या सायटीवरुन फोटो चोप्य
In reply to दिसते तर एकदम खल्लास. रेसिपी by मनिष
फुटी कढी..
In reply to ज्या सायटीवरुन फोटो चोप्य by गवि
सही...आजच केली आणि गरमागरम
In reply to ज्या सायटीवरुन फोटो चोप्य by गवि
धन्यवाद
..