पाईनअॅपल केक
काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने आमच्या दोघांचा सर्वात आवडता पाईनअॅपल केक बनवला त्याची पा़कृ :)
साहित्यः
३/४ वाटी मैदा
१/२ वाटी साखर
२ अंडी रुम टेम्परेचरला असलेली
१/४ कप दूध
१ टेस्पून बटर
१/२ टीस्पून बेकिंग पावडर
टीनमधले अननस (अननसाचे तुकडे किंवा चकत्या ज्या अननसाच्या ज्युसमधे असतील त्या घेणे, जर सिरप मधल्या घेतल्या तर मग अननसाचा एसेन्स वापरणे)
१/२ टीस्पून खाण्याचा सोडा
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स ( जर अननसाचा एसेन्स वापरणार असाल तर हा नका वापरु)
फ्रेश क्रीम
पाकृ:
प्रथम मैदा, बेकिंग पावडर व खाण्याचा सोडा ३ वेळा चाळून घेणे.
अंडी फोडून त्यातील पांढरे व पिवळा बलक वेगळा करणे.
ईल्केट्रीक बीटरने किंवा वायर व्हिस्कने अंड्याचे पांढरे घट्ट होईपर्यंत फेटावे. इतके घट्ट झाले पाहिजे की त्याचे भांडे उलटे केले तरी खाली पडणार नाही.
एका भांड्यात अंड्याचे पिवळे बलक फेटावे. त्यात थोडी-थोडी करुन साखर घालून फेटावे.
मायक्रोवेव्हमध्ये दूध व बटर घालून १० सेकंद गरम करावे. ते मिश्रण वरील अंड्याच्या मिश्रणात घालून फेटावे. त्यात थोडा-थोडा मैदा घालून हलक्या हाताने किंवा एकदम स्लो वर ईल्केट्रीक बीटरने फेटावे. त्यात आता व्हॅनिला किंवा पाईनअॅपल एसेन्स घालावा व एकत्र करावे.
आता अंड्याचे पांढरे वरील मिश्रणात हलक्या हाताने मिसळायचे. फेटायचे अजिबात नाही .
तयार मिश्रण ग्रीज केलेल्या किंवा बेकिंग पेपर लावलेल्या केकच्या भांड्यात ओतून, प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्रीवर २०-२५ मिनिटे बेक करणे.
केक तयार झाला कि कुलिंग रॅकवर थंड होण्यासाठी ठेवावे.
एका मोठ्या भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावे. त्यात थंड फ्रेश क्रीम ओतून बीटरने फेटावे.
त्यात थोडीशी साखर व एसेन्स घालावा व सॉफ्ट पीक्स येईपर्यंत फेटावे.
थंड झालेल्या केकचे दोन किंवा तीन भाग करुन घ्यावे.
केकच्या खालच्या भागावर टीनमधल्या अननसाचा ज्युस चमच्याने सर्वत्र टाकावा.
त्यावर क्रीमचा थर सुरीने किंवा पॅलेट नाईफने नीट पसरवावा.
त्यावर अननसाचे तुकडे लावावे.
आता त्यावर दुसरा केकचा भाग लावावा. त्यावर पुन्हा अननसाचा ज्युस चमच्याने सर्वत्र टाकावा व क्रीम लावावे. केकच्या बाजुलाही क्रीम लावावे.
पायपींग बॅगमध्ये क्रीम घालून केकवर आवडीप्रमाणे डिझाईन काढावी.
अननसाच्या तुकड्यांनी सजवावे. (आवडत असल्यास चेरी ही वापरु शकता)
तयार केक फ्रिजमध्ये ४-५ तास ठेवावे.
नोटः
टीनमधला अननस वापरणं सोपे पडते नाहीतर अननसाच्या चकत्यांना आधी स्ट्यु करावे लागते व त्याची क्रिया मोठी असते. स्ट्युईंग नीट नाही झाले तर अननस कडवट होऊ शकतं.
वाचने
18640
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
अभिनंदन ! केक मस्तच
In reply to अभिनंदन ! केक मस्तच by मदनबाण
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप
लग्नाच्या वाढदिवसाच्या
In reply to लग्नाच्या वाढदिवसाच्या by प्रचेतस
<<या केकच्या निमित्ताने मूळचा
In reply to <<या केकच्या निमित्ताने मूळचा by इन्दुसुता
+१०, हेच म्हणतो, <<या केकच्या
In reply to +१०, हेच म्हणतो, <<या केकच्या by ५० फक्त
मूळचा अस्सल चमचा म्हणजे तुमचा
शुभेच्छा..
हॅप्पी अॅनिवर्सरी! केक
लग्नाच्या वाढदिवसाच्या
एकदम मस्त... तोंपासु...
वाढदिवसाच्या शुभेच्छा केक छान
शुभेच्छा!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या
प्रचंड सुंदर!! दिसतोय तर
In reply to प्रचंड सुंदर!! दिसतोय तर by प्राजु
तायडे सानिका तैंचा ब्लॉग आगे
जबराच, धन्यवाद सास्व, केकची
सर्वप्रथम लग्नाच्या
आणिवर्सरीच्या शुभेच्चा
In reply to आणिवर्सरीच्या शुभेच्चा by ऋषिकेश
धन्यवाद
शुभेच्छा !
आइइ ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग
वाईन
सानिकातै लग्नाच्या
खत्तरनाक !
केक छानच!
केक मस्तच
सगळ्यांना धन्यवाद
In reply to सगळ्यांना धन्यवाद by सानिकास्वप्निल
तुम्हा दोघाना खुप खुप शुभेच्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या
सानिकाताय, लग्नाच्या
मस्त
मस्त