ऐका हो ऐका...
"उद्या मंगळवार दि २७ डिसेंबर पासून मुंबईतल्या एमएमआरडीए मैदानावर टीम अण्णा कंपनीच्या उपोषणाचा इव्हेन्ट साजरा केला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी आपापले कामधंदे सोडून तिथे जमायचं आहे, 'लोकपाल लोकपाल जनलोकपाल..' इत्यादी देशभक्तिपर गीतं गायची आहेत, 'मी म्हणेन तीच पूर्व-आम्ही संसद मानत नाही' आदी मुक्ताफळे उधळणारे देशातील एकमेव हुशार-कायदेपटू-तज्ञ वगैरे वगैरे असलेल्या रा. रा. अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांची भाषणं ऐकायची आहेत..!
आमचं मत मात्र केजरीवालांपेक्षा अंमळ वेगळं आहे. आम्हाला आमच्या भारतीय राज्यघटनेचा आत्यंतिक आदर आहे. आपण स्विकारलेल्या संसदीय लोकशाही पद्धतीनुसार (केजरीवालांची कुठली पद्धती आहे, हे आम्हाला ठाऊक नाही..!) कायदा हा केवळ संसदेतच केला जातो. संसदेत सारे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त आहेत अशा भ्रमात आम्ही मुळीच म्हणजे मुळीच नाही.. तरीही आज त्या खासदार मंडळींना आपणच निवडून दिलं आहे आणि आपल्या घटनेने त्यांनाच कायदे बनवण्याचे अधिकार दिले आहेत ही वस्तुस्थिती संपूर्णत: नाकारून किंबहुना अशी संसदीय पद्धती लाथाडून दर दोन-तीन महिन्यांनी उपोषणाचा इव्हेन्ट साजरा करायचा आणि सरकारच्या डोक्यावर पिस्तुल ताणायचं, हे आम्हाला पटत नाही.
कुठल्याही वाहिनीवर जेव्हा जेव्हा अरविंद केजरीवालांची क्रॉस झाली आहे तेव्हा तेव्हा ते 'ये हमारी नही, भारत के पुरे जनता की मांग है..' असं ठेवणीतलं उत्तर देतात. आम्हाला हे उत्तर ऐकून असा प्रश्न पडतो की केजरीवाल नक्की कुठल्या भ्रमात वावरत आहेत? मुंबई, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, हैद्राबाद येथील प्रत्येकी - धरून चाला - लाख लाखभर मेणबत्तीबाज अन् टोपीबाज म्हणजे संपूर्ण भारतीय जनता होते का? आम्ही म्हणतो की अश्या जेलभरोत्सुक मेणबत्तीवीरांची व टोपीबाजांची संख्या फार तर १० लाख असेल.. आता, सूज्ञ वाचकांनो, आपणच तुलना करा की कुठे १० लाख अन् कुठे १२५ करोड..! या १२५ करोड जनतेपैकी बहुतांशी जनता तर आजही भारतातल्या खेड्यापाड्यात राहते. परंतु 'सचोटीची पत्रकारिता' हा शब्दही विसरलेल्या बर्याचश्या टीआरपीच्या भुकेलेल्या वारांगनावजा वृत्तवाहिन्यांना हाताशी धरून टीमअण्णाचं बोकाळलेपण हल्ली फारच वाढू लागलेलं आहे.
शिवाय जनतेचं मत काय, जनता कुणासोबत आहे, हे ठरवायचे निकष देखील संसदेनेच घालून दिलेले आहेत. 'मतदानातून ज्याला बहुमत मिळेल तोच उमेदवार, तोच पक्ष, किंबहुना त्याच पक्षाचा विचार श्रेष्ठ' असा अत्यंत साधा सोपा असा हा मामला आहे. मग त्यात 'सारी भारतीय जनता आमच्या बाजूने आहे, त्यांना आमचंच जनलोकपाल हवं आहे' असं केजरीवाल-बेदी आदी प्रभुती कुठल्या आधारावर म्हणत आहेत?
आणि खरोखरंच जर या मंडळींना भष्टाचाराविरोधात अगदी कडक कायदा आणायचा आहे, तर मग ही मंडळी स्वत:चा पक्ष बनवून, सर्व सचोटीच्या मेणबत्तीवीर अन् टोपीबाजांना उमेदवारी देऊन सार्या देशातून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकात का नाही उभं करत? आहेत ना सारे देशवासीय तुमच्यासोबत? मग कशाला काळजी करता? संसदेत निर्विवाद बहुमत आणा आणि अगदी तुम्हाला हव्वा तस्सा लोकपाल कायदा घ्या की पास करून..! कुणी मनाई केली आहे?
आंदोलनांचे लोकशाहीतील महत्व आम्ही मुळीच नाकारत नाही, परंतु 'आंदोलनाआड दर दोन महिन्यांनी भारयीत घटनेला अन् संसदेला धारेवर धरणे' या मागे आंदोलनामागील प्रामाणिकतेपेक्षा काही अन्य हिडन् अजेंड्याचाच आम्हाला अधिक संशय येतो आहे. आणि हे सगळं 'अण्णा हजारे' सर्वच बाबतीतील स्वच्छ चारित्र्याच्या एका माणसाला पुढे करून, त्याचं बाहुलं करून केलं जात आहे याचा आम्हाला मनस्वी खेद वाटतो..!
'अन्ना नही ये आंधी है, देश का दुसरा गांधी है..' अशी अत्यंत बाष्कळ व भंपक स्लोगन चालवणार्यांना उपोषणाचा इव्हेन्ट साजरा करण्यासाठी लाख्खो रुपये भाडं असलेली मैदानं का बरं लागतात? आणि त्यातही सरकारने सूट द्यावी अशी बदमाशीवजा अपेक्षा कशाकरता? गेल्या ऑगस्ट महिन्यातील दिल्लीच्या रामलीला मैदानात अण्णांनी उपोषण केले होते. त्यावेळी देणगीस्वरूप गोळा झालेले लाखो रुपये अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्या एनजीओत जमा झाले होते. मग मुंबईच्या उपोषणाचं भाडं त्यातनंच का नाही भरलं? त्याकरता पुन्हा रोज कुणी १-२ लाख रुपये देणगी देणारा स्पॉन्सरर ही मंडळी (आणि पर्यायाने आमचे बिचारे अण्णा) का शोधताहेत..?
टीम अण्णा मधील मयंक गांधी या मुंबईतल्या धनदांडग्या बिल्डरच्या यापूर्वीच्या सार्या आर्थिक व्यवहारांबाबत अण्णा नि:शंक कसे काय..? ज्याला पाहूनच 'हा केवळ भामटा असावा..' अश्या कुमार विश्वास नामक इसमावर अण्णांचा इतका विश्वास कसा काय..?
रोज उठून संसदेला धारेवर धरणार्या, जे सार्या भारतीय जनतेचं मुळीच प्रतिनिधीत्व करत नाहीत, किंबहुना ज्यांच्या हेतूंबद्दल निश्चितच शंका आहे आणि अश्या भामट्यांच्या कह्यात अण्णा पूर्णत: गेले आहेत हे पाहून खेद होतो. की दारुच्या किंवा अन्य कुठल्या नशेपेक्षा गर्दीची नशा भयंकर असते आणि बिचारे अण्णा नेमके त्याच नशेच्या जाळ्यात सापडले आहेत असं आम्ही मानायचं?
असो..
तेव्हा ऐका हो ऐका, "सर्वांनी अन्ना-टोप्या घालून उद्याच्या उपोषणाच्या इव्हेन्टला मात्र नक्की हजेरी लावा. अहो अगदी मज्जा मज्जा आहे तिथे..!"
सुरक्षेची वगैरे फारशी चिंता करू नका. तिथे २००० च्या वर चोख पोलिस बंदोबस्त असेल, रॉ, एटीएस इ. सारा बंदोबस्त असेल, (अर्थात, तो तुम्हाआम्हा जनतेच्याच पैशांतून - हा भाग वेगळा!). काही धनाढ्य उदार मनोवृत्तीच्या बिल्डरांनी तिथे तुम्हाआम्हाकरता अगदी खाण्यापिण्याचीही मुबलक व्यवस्था केली आहे, तेव्हा अगदी यथेच्छ ताव मारायला या..! (अण्णा राहिनात का उपाशी, आपण खाऊ तुपाशी!)
शिवाय बॉलिवुड अन् त्यातील काही नट्याही तिथे यायची शक्यता आहे. आहे की नै मज्जाच मज्जा..?
आपला,
(भारतीय संविधान आणि भारतीय संसद मानणारा) कॉमन मॅन.
वाचने
7994
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
पटले नाही.
लेख आवडला
पण कॉमन मॅन आता तुम्ही (आणि
In reply to लेख आवडला by पुण्याचे वटवाघूळ
आवडला ...
आमच्या (लोकशाही मान्य
ओके..
+१
In reply to ओके.. by पिलीयन रायडर
आवरा !
+१
In reply to आवरा ! by परिकथेतील राजकुमार
+२
In reply to +१ by छोटा डॉन
>>>गे बघून कंटाळा आलाय. ए
In reply to +२ by स्मिता.
+१ आवरा !
In reply to आवरा ! by परिकथेतील राजकुमार
कॉमन मॅन .. योग्य लिहिले आहे..
ह्म्म...
छान.
स्वतः काहीच करायचे नाही आणि
?
In reply to स्वतः काहीच करायचे नाही आणि by मराठी_माणूस
"आम्ही म्हणतो तसेच"चे टुमणे
In reply to ? by नितिन थत्ते
मुळात अण्णांनी वर्षभर दबाव
अण्णांच्या विरोधात
संपूर्ण लेखात आरएसएस च्या
बळंच लेख
बाय द वे, प्रथम 'ऑगस्ट
In reply to बळंच लेख by मैत्र
आज आपण सार्वभौम असून
In reply to बाय द वे, प्रथम 'ऑगस्ट by कॉमन मॅन
सं.स.
अण्णा हजारेंच्या विरोधात
चुका..
काही चुका श्री. अण्णा हजारेही
In reply to चुका.. by प्रभाकर पेठकर
जनहिताय लोकपाल.
In reply to काही चुका श्री. अण्णा हजारेही by कॉमन मॅन
आपली काही मते पटली. आभारी
In reply to जनहिताय लोकपाल. by प्रभाकर पेठकर
कॉंग्रेसका हाथ कॉमन मॅन के साथ!
छान लिहिलाय
मला
जो गुन्हा करेन .. मग तो
मीच गांधी आणि अरेरावी...
जर आपण धुतल्या तांदुळासारखे
In reply to मीच गांधी आणि अरेरावी... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to जर आपण धुतल्या तांदुळासारखे by नगरीनिरंजन
+२
In reply to +१ by धमाल मुलगा
बराचसा सहमत....
In reply to जर आपण धुतल्या तांदुळासारखे by नगरीनिरंजन
शब्दाशब्दाशी सहमत आहे.
In reply to जर आपण धुतल्या तांदुळासारखे by नगरीनिरंजन
शोल्लेत्त
In reply to जर आपण धुतल्या तांदुळासारखे by नगरीनिरंजन
प्रभाकरजी धन्यवाद, पुन्हा
In reply to मीच गांधी आणि अरेरावी... by प्रभाकर पेठकर
नक्की द्या..
In reply to प्रभाकरजी धन्यवाद, पुन्हा by गणेशा
हो देइन नक्की ... पण येथे
In reply to नक्की द्या.. by पिलीयन रायडर
http://www.misalpav.com/node/
In reply to नक्की द्या.. by पिलीयन रायडर
प्रभाकरजी, ''संसदेत जे चालू
In reply to मीच गांधी आणि अरेरावी... by प्रभाकर पेठकर
सर्व प्रतिसादींचे आभार.
करमणूक सुद्धा नाहि झाली !!