मनातलं जनांत
गेले काही वर्षे मी ब्लॉगबद्दल बरचं ऐकुन होतो. मध्यंतरी दोन एक वर्षांपुर्वी 'स्टार-माझा'ने ब्लॉगर्सची स्पर्धा ही भरवली होती आणि आपल्या मित्रांनी त्यात बक्षिसही पटकावली होती. ते सगळ पाहुन फार कौतुक वाटलं सगळ्यांच. आपलाही एखादा ब्लॉग असता तर असा विचार क्षणभर मनात डोकावून गेला. पण ज्याला चार ओळी धड टंकता येत नाहीत त्याचा ब्लॉग? आणि समजा जरी काढला (त्याला पैशे थोडीच लागतात ;) ) तरी त्यात लिहायचं काय? शाळेत सुद्धा ५-१० मार्कांचं पत्रलेखन आणि निबंध ऑप्शनला टाकणारे आम्ही. माझा ब्लॉग?
हौसे खातर थातुर मातुर पाककृत्या करणार्या मला आंतरजाला वरील काही स्नेह्यांनी पाककृतींचाच ब्लॉग काढायचं सुचवलं. आज करु-उद्या करू असं करत मी टाळत होतो. कारण मी अनेक ब्लॉग पाहिले होते की जिथे मंडळी उत्साहात सुरवात तर करतात पण मग महिनोंन महिने / वर्षे काही लिहितच नाहीत. माझं ही तसचं काहिस होईल अशी भिती मनात होती.
एके दिवशी राजे स्वतःच मला म्हणाला हवं तर मी तुला ब्लॉग बनवून देतो. तु फक्त हो म्हण. त्याचा हा माझ्या वरचा विश्वास माझा मलाच हुरुप देउन गेला. आणि बरोब्बर गेल्या वर्षी याच दिवशी खा रे खा चा जन्म झाला.
राजेने लागेल तशी मदत केलीच. प्राजू ताई आणि माझ्या ताईने मला या ब्लॉगसाठी एकदम समर्पक नाव सुचवलं. नाताळची सुट्टी होतीच हाताशी धडाधड सगळ्या जुन्या पाककृत्या टाकण्याचा सपाटा लावला.
मित्रं मंडळींना ब्लॉगचं रुप रंग आवडलं. त्यांनी त्यांच्या मित्रांकडे चार कौतुकाचे शब्द काढले. खवय्या तात्याने तर चक्क त्यावर एक लेखच लिहून प्रकाशित केला. एका दिवसात जवळ जवळ ५०० हिट्स् मिळाल्या. एकदम खुश झलो. अहो सामान्य माणुस मी. आपल्या कामाचं कौतुक झालेलं कुणाला नको असतं. :) १०००, १०,०००, २०,००० असे टप्पे पार होत होते. दरम्यान नवीन पाककृती येतच होत्या. आज एका वर्षा नंतर जवळ पास ८० पाककृत्या झाल्या आहेत. आणि तब्बल ४२,६०० हिट्स. यात सर्व मिपाकर, मीमकर, बझकार, अन्य ब्लॉगर्स आणि मायबोलीकरांचा मोलाचा वाटा आहेच. तुम्हा सर्वांचे आभार मानून मला तुमच्या ऋणांतुन मुक्त व्हायचं नाही कारण तुमचा हा लोभ मला असाच हवाय. :)
माझ्यासाठी तेच उत्तेजक आहे.
नतमस्तक
-गणपा
हा पदार्थ इथे बरेच वेळा येउन गेल्यामु़ळे इथे पाककृती देत नाहीये.
(स्वाती ताईची कृती १ , २
आणि ही सुबक ठेंगणी यांची)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
..
अरे वा ! शुभेच्छा आमच्या पण
हॅपी बर्थ डे
सही रे...
मस्त हो गणपाशेठ. अभिनंदन.
झकास
+१
शुभेच्छा.
गणपाशेठ, अभिनंदन
अभिनंदन आणि खूप खूप
झकास !
अभिनंदन!!
अभिनंदन
वावावा..
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन गणपाशेट.
छान ब्लॉग आहे
अभिनंदन रे गणपा !! पण ...मालक
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन!
जबरदस्त बल्लवाचार्य
गणपाभाऊ,
गण्या भो*** लै लै शुभेच्छा
अरे वा!
हार्दिक अभिनंदन
चिअर्स मेट!
अभिनंदन!
माझं एक स्वप्न आहे.एक दिवस
सन्माननिय बल्लवाचार्य श्री
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
गणपाशेट यांना वाढदिवसाच्या
गणपाशेट यांना वाढदिवसाच्या
अभिनंदन हो ब्लॉगचे मालक...
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
गंपा.. मला एकदा माझ्या
अभिनंदन गणपा....
अभिनंदन
अभिनंदन रे!
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन अन अजुन पाकृ खास करुन
आंम्ही मागे म्हंटल्या प्रमाणे
अभिनंदन!