साहित्यः
१ किलो चिकन साफ करुन, तुकडे करुन घेणे. चिकन पीसेस ना थोडी हळद, लाल-तिखट व थोडे मीठ लावून मॅरीनेट करावे.
२ कांदे उभे चिरून , तळून त्यांची ब्राऊन पेस्ट करुन घेणे.
१५-२० लाल सुक्या बोर मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) , २-३ टेस्पून सुके खोबरे, २ टीस्पून खसखस, ४ लवंगा, १-१/२ टीस्पून जीरे, ७-८ अख्खी काळीमिरी किंवा १ टीस्पून काळीमिरीपूड. हे सर्व वेग-वेगळे कोरडेच भाजून एकत्र करणे व थोडे पाणी घालून मिक्सरवर वाटून घेणे. (काळीमिरीपूड वापरणार असाल तर भाजायची गरज नाही.)
३/४ वाटी फेटून घेतलेले दही
१/२ ते पाऊण वाटी नारळाचे दुध
२-३ टेस्पून फ्रेश क्रिम
१-१/२ टेस्पून आले+लसुण पेस्ट
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर ( ऑप्शनल आहे)
१ -१/२ टीस्पून गरम-मसाला
एक चिमुट केशर
३-४ थेंब केवडा एसेन्स
बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
एका भांड्यात तेल गरम करुन त्यात आले+लसुण पेस्ट परतून घ्यावी.
चांगली परतली गेली की त्यात लाल-मिरचीचे वाटण घालून चांगले परतावे.
मग त्यात कांद्याची ब्राऊन पेस्ट, हळद व काश्मिरी मिरची पावडर घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
त्यात आता चिकन पीसेस घालून एकत्र करणे. दही घालून , मिक्स करुन , झाकून चिकन शिजवावे.
चिकन जरा शिजत आले की त्यात चवीप्रमाणे मीठ व नारळाचे दुध घालावे. थोडे पाणी घालून परत झाकण लावून शिजु द्यावे.
चिकन पुर्ण शिजले की त्यात २-३ टेस्पून फ्रेश क्रिम घालणे व एक वाफ काढावी. (क्रिम खुप घालू नये नाहीतर दुधाळ होईल)
आता त्यात गरम-मसाला व केशर घालावे.
गॅस बंद करून त्यात ३-४ थेंब केवडा एसेन्स व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावे.
वरून थोडे क्रिम घालून सर्व्ह करावे.
चिकन निजामी तयार आहे तुम्ही तंदुरी रोटी, नान किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करु शकता.
वाचने
8866
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसला कातील फोटू आहे ग पण
_/\_ खतरनाक दिसतायत
जीवघेणा फोटो! क्रिम घातले
छान. याचा वेज प्रकार करावा
मेलो
च्यायला कसले निजामी अत्याचार
आकर्षक..
छान..
मस्त
जबरा ..... !!!
हम्म्म
मस्त!