Skip to main content

ही जिवाला आस आहे

लेखक विजुभाऊ
बुधवार, 14/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/20071 , http://misalpav.com/user/7236 आणि http://misalpav.com/user/707 जेवणाच्या पंगतीला , मोदकाचा घास आहे आणखी तो मठ्ठ्या संगे , मसालेदार भात आहे भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे मीठ,चटणी ,लोणचे, कुरडया ,कोशिंबीरी डाळ वांगे नी फोडणीची , ही तर्रीही खास आहे. चवीचवीने जेव जरा , बेत आज खास आहे पाहिले नसे कधी असा ;आतिथ्याचा स्वर्ग आहे चंदनाचा मोगर्‍याचा , केवड्याचा वास आहे पानासवे उदबत्तीचा, हा मराठी बाज आहे. शेवटी घे विडा कपुरी , वेलदोडा मुखवास आहे तृप्त व्हावा जीव तुझा; ही जिवाला आस आहे
लेखनविषय:

वाचने 6647
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

कविता. प्रत्येक जिवाला असतेच.

अशा बैठकी कराच्या. आणि म्हणाचे की अर्थ व्यवस्था ढासळते आहे. आणि कुणीतरी काकाच्या अकाउंट वर डॉळे लावायचे.

गणेशा विजुभाऊंवर प्रचंड खुश झाला असता. कारण या विडंबनात कुठेही दारुचा उल्लेख नाही. शिवाय नुकतेच त्याने अश्या जेवणाचा आस्वाद घेतला असल्याने त्याच्या स्मृती परत चाळवल्या जातील. ;) __/\__

शेवटी घे विडा कपुरी , वेलदोडा मुखवास आहे तृप्त व्हावा जीव तुझा; ही जिवाला आस आहे काय, छुपा अजेंडा काय आहे म्हणायचा??

भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे अहाहा...! काय चवदार शेर आहे. :) -दिलीप बिरुटे

मूळ कवित गजलसदृश असावी (गैरमुरद्दिफ गज़ल? कॉलिंग एक्स्पर्ट्स) त्यात 'भास आहे', 'वास आहे' श्वास आहे' इ. काफिया आहेत. तुम्ही तर पहिल्या कडव्यातच काफियाची ऐशीतैशी केली राव. असो. अवांतरः एवढं जेवल्यानंतर अखेरचा शेर 'वास आहे' या काफियाने संपेल असे उगाचच वाटून गेले.

भजीची चव कांद्यामुळे आली की बेसनातील लसुण मसाल्यामुळे या कडे अस्सल खवय्या फारसे पहात नाही. चवीला महत्व असते. तद्वत ......

नंतर मसाला दुध प्यायला चांदीचा ग्लास असावा याची सोय केलेली असेलच. बाकी कविता भारीच झालीय विजुभाउ.

लज्जतदार कविता... ५० फक्तच्या प्रतिसादावरुन सुचलेल्या ओळी.. " आता पुढच्या कामासाठी, केशरी दुधाचा शक्तीवर्धक चांदीचा ग्लास आहे.."

In reply to by चिगो

केशरी दुधाचा शक्तीवर्धक चांदीचा ग्लास आहे.." पण.. शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी.. सर्वकाही व्यर्थ जेव्हा ---- ---- . . . . . सुचेना राव... पूर्ण करा की...

In reply to by प्रभाकर पेठकर

. तुमचं यमक छान हो पेठकरकाका,पण "..Xस आहे" अशा पॅटर्नमधे शेवटचे शब्द हवे आहेत हो.

In reply to by गवि

शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी.. सर्वकाही व्यर्थ जेव्हा तारुण्याचा भास आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

"तारुण्याचा भास आहे" हे काहीतरी मीटरबाहेर जातंय वाट्टं. ...... शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी.. सर्वकाही व्यर्थ जेव्हा बेडखाली डास आहे. शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी.. सर्वकाही व्यर्थ जेव्हा फोनवरती बॉस आहे. ...

In reply to by गणपा

शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी.. सर्वकाही व्यर्थ जेव्हा तारुण्याचा भास आहे. शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी.. जोम गेला व्यर्थ म्हणूनी ; तारुण्य उदास आहे. हे बरोबर बसतय का गवि?

In reply to by विजुभाऊ

>>शुभ्र मुसळी, चांदीपेला, जमविली शक्ती जरी.. जोम गेला व्यर्थ म्हणूनी ; तारुण्य उदास आहे. क्या बात है, विजुभाऊ... वरचे गविंचे "डास आणि बॉस"ही मस्त आहेत..

In reply to by विजुभाऊ

"चांदीच्या ग्लासातील दुध" शक्तीवर्धक.. मीटरात बसवायला जरा चुकीचे फएरफटका मारावा लागला.. समजून घ्या की राव..

बुधवार रात्रीची पंगत आवडली ;) आवडती स्त्री देखील खुश झाली असावी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

बुधवारी रात्रीची पंगत अशी वरण-भाताची असते का रे, आं? तुझ्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकाकडून अशी चूक? हे राम. (अभ्यासू) रम-ता-राम