(सूचना:- या किंवा अन्य कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीच्या लेखातील मतांशी किंवा शिफारशींशी मिपा व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही.)
शेअरबाजारातून नेहमीच चांगले पैसे कसे मिळवावेत?
तुमच्या मनात शंका येत असेल कि सध्या शेअरबाजारापासून दुरच राहीलेले बरे कारण गेले जवळपास एक वर्ष सेन्सेक्स १५५०० ते १८००० या दरम्याने वरखाली होत आहे.
पण खरं म्हणजे हाच काळ शेअरबाजारातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे हे मी स्वानुभवाने सांगतो. जोपर्यंत युरोपमधील आर्थिक संकट दुर होत नाही तो पर्यंत बाजारात तेजी येणे कठीण आहे, यावर मार्ग निघणार हे निश्र्चित, युरोपीअन देशाना तो काढावाच लागेल अन्यथा युरो चलन बंद करावे लागेल, व परत प्रत्येकाचे चलन जागतीक बाजारात व्यवहारासाठी वापरावे लागेल, हे कोणालाच परवडणारे नाही, मात्र किती काळ लागेल हे सांगता येत नाही. आपल्या देशात, सर्वच इमर्जींग देशात (BRIC Countries ब्राझील, रशीया, इंडिया व चीन) FII (Foreign Institutional Investors) गुंतवणूक करत आहेत, फार मोठी रक्कम त्यानी गुंतवलेली आहे. हे फक्त पैसा मिळवण्यासाठी येथे आलेले आहेत आणि आज बारावर त्यांचेच वर्चस्व आहे, तेच बाजाराची दिशा ठरवत आहेत म्हणूनच बाजार पुढील काही काळ १५% ते २०% या दरम्याने वर खाली होत रहाणार यातच त्याना पैसे मिळतात. स्वस्तात खरेदी करा व महागात विका हेच तत्वाने हे चालले आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे वर जाते ते खाली येणारच व जे खाली येते ते वर जाणारच हा अर्थशास्त्राचा नियम आहे, मात्र शेअर बाजारात स्टॉकची निवड महत्वाची असते.
सर्वसामान्य माणसाने या बाजारातून कसा जास्तीत जास्त फायदा मिळवावा?
हे करा:
1) संयम.
2) अगदी थोडे म्हणजे २ किंवा ३ च लार्ज कँप शेअरची निवड करा ज्यात सर्वात जास्त उलाढाल होते व सर्वात जास्त चढ उतार होतात. (कृपया हे कोणते ते विचारू नका कारण मी हे फि घेऊनच सांगतो – मी ब्रोकर नाही फक्त सल्ला देतो).
3) आता या स्टॉकची किंमत खाली येऊ लागली कि थोडे थोडे गुंतवावयास लागा.
4) नुकसानीत विकू नका, सरासरी करत रहा.
5) तुम्हाला किमान ५% फायदा झाला कि विकून टाका.
6) फायद्याचे गणित करताना, ब्रोकरचे कमिशन व आयकराची गणना करा. लक्षात ठेवा नफा हा निव्वळ झाला पाहिजे.
7) हे वारंवार करा, ह्या संधी बाजारात नियमीत येत असतातच.
8) बाजाराचे (एफआयआय) च्या कलाप्रमाणेच निर्णय घ्या. प्रवाहाप्रमाणे पोहणेच फायद्याचे असते.
9) तुमच्याकडे असणा-या अतिरीक्त रकमेचीच गुंतवणूक करा, जी किमान एक वर्ष तरी लागणार नाही.
10) तुम्ही अगदी रु.दहा हजारानेही सुरुवात करु शकता.
11) लक्षात ठेवा बाजाराचे अचूक भाकीत कोणीच करु शकत नाही व जो असे सांगतो तो खोटे बोलतो.
12) शेअर बाजाराकडे तुमचे स्वत:चे किराणा दुकान आहे असे समजून व्यवहार करा, वाणी कधी कमी किमतीत विकत नसतो.
13) हे व्यवहार नफा मिळवण्यासाठीच करावचे आहेत हे विसरु नका.
14) बाजाराच्या कलाप्रमाणे बदलत रहा.
हे करु नका:
१) डे-ट्रेडिंग अजीबात करु नका.
२) मार्जीनच्या मोहात तर अजीबात पडू नका.
३) एकसारखे खरेदी विक्री करु नका, हे फक्त ब्रोकरच्या फायद्याचे असते.
४) जास्त मोह करु नका, फायद्यात असताना विकून टाका, जास्त फायद्याचा सोस धरु नका कारण संधी नेहमीच येत रहाणार आहे. जो जास्त व्याजाला भुलला तो मुद्दलाला मुकला.
५) बाजाराच्या कलाच्या विरुध्द वागू नका, प्रवाहाच्या विरुध्द पोहण्याने फक्त लवकर दमछाक होते.
६) कर्ज काढून पैसे यात गुंतवू नका.
७) सर्व रक्कम एकदम गुंतवू नका.
८) आयपीओच्या वाटेला जाऊ नका (यात नुकसानच जास्त होते).
९) कोणत्याही शेअरच्या प्रेमात पडू नका.
१०) टिव्हीवर ब-याच आर्थीक वाहिन्या आहेत त्यावर नियमीत चर्चेचे गु-हाळ चालू असते, ते जरुर पहा पण त्यांच्या टिपवर विसंबून व्यवहार करु नका, यातील 50% टिप चुकीच्या असतात (कदाचीत मुद्दामच दिल्या जातात).
११) दुस-यानी (ब्रोकर वगैरे) दिलेल्या हॉट टिपच्या मोहात पडू नका, सारे काही स्वार्थासाठी चालते व ज्याला बाजाराची माहितीच नाही त्याचे का ऐकावे?
किती फायदा होऊ शकतो?
१) वर्षात किमान ४ ते ६ वेळा तुम्ही निवडलेल्या स्टॉक मध्ये १०% ते ४०% चढ उतार होत असतातच.
२) निर्णय महत्वाचा.
३) संयमाने वागल्यास वर्षात किमान २५% ते ४०% फायदा मिळवू शकता.
हे शक्य नसल्यास:
१) म्युच्युअल फंडात नियमीत दरमहा दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत रहा.
२) २ किंवा ३ स्टॉक नियमीत खरेदी करत रहा Buy & Hold या तत्वाने वागा.
वाचने
6673
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आभार
IPO
In reply to आभार by रमताराम
अहो मालक
In reply to IPO by सदानंद ठाकूर
अगदी थोडे म्हणजे २ किंवा ३ च
काही प्रश्न
अभ्यास
In reply to काही प्रश्न by सदानंद ठाकूर
आत्ता ज्यांची किंमत ३० च्या
घंटा....
In reply to आत्ता ज्यांची किंमत ३० च्या by आत्मशून्य
हॅहॅहॅ भलतेच विनोदी राव तूमी....
In reply to घंटा.... by मन१
काही प्रश्न व काही शंका
In reply to हॅहॅहॅ भलतेच विनोदी राव तूमी.... by आत्मशून्य
शेअरबाजारबद्दल डोळे झाकून
In reply to काही प्रश्न व काही शंका by मन१
?
In reply to शेअरबाजारबद्दल डोळे झाकून by आत्मशून्य
???
In reply to ? by मन१
प्रकाटाआ
In reply to घंटा.... by मन१