Skip to main content

ओरिगामी प्रदर्शन - टिळक स्मारक मंदिर, पुणे.

लेखक उदय के'सागर यांनी मंगळवार, 13/12/2011 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर महिन्यात (३ ते ६ नोव्हेंबर) टिळक स्मारकला ओरिगामी प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनातील ओरिगामीच्या काहि कलाकृती इथे टाकत आहे. प्रदर्शनात फोटो काढण्यास सक्त मनाई असेल (नेहमीप्रमाणे) असे वाटल्याने कॅमेरा जवळ नव्हता, म्हणुन मग मोबाईलच्या कॅमेरानेच फोटो काढले होते त्यामुळे ते आहेत तसेच गोड मानुन घ्यावे :) पण जे मिपाकर काहि कारणास्तव प्रदर्शनला जाऊ शकलेच नाहि त्यांसाठी "हेहि नसे थोडके" नाहि का :) मिपाकर - सुधांशु नूलकर ह्यांनी प्रदर्शना बद्दल मिपावर मिहिती पुर्ण धागा आधिच टाकला होता. दिलेल्या माहिती बद्दल त्यांचे मनापसुन धन्यवाद! १. खारुताई :) २. ३. ४. ५. अप्रतिम (अनिल अवचटांची कलाकृती) ८. खुपच अप्रतिम आणि अवघड कलाकृती : ९. अजुन काहि दागिने. १०. ११. १२. आहाहा... "जस्ट परफेक्ट" १३. किती अवघड.... १४. १५. १६. आकर्षक... १७. १८. १९. २०. सुदंर.... २१. २२. २३. अप्रतिम २४. २५. २६. चेहरे २७. पत्ते खेळणारी जोडी २८. "मास्टरपीस" !!! २९. ग्गोगोड... क्युट... :) ३०. अदभुत! साधारण पाच फुटी ओरिगामी कलाकृती, "हॅट्स ऑफ टु द क्रिएटर". हि कलाकृती प्रवेशद्वाराच्या मधोमध होती : समाप्त!!! (अजुनहि बर्‍याच कलाकृती होत्या, पण काहि फोटो चांगले आले नाहित. तरीहि सवडीने नक्की टाकेन उरलेले काहि चांगले फोटो). :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8009
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

खरंच लई भारी कला आहे ही , मला एक विमान बनवणे या पलिकडे काही जमत नाही. खुप खुप धन्यवाद इथं शेअर केल्याबद्दल.

२८ क्रमांकाचा मास्टरपीस मी चेपुवर बघितल्याचे आठवतंय. टेसलेशन्स अजुन जरा नीट मांडता आली असती असे वाटले.

अप्रतिम...हायक्लास...मला ओरिगामीमधे कधीच एवढा रस वाटला नव्हता, पण आपण शेअर केलेल्या या कलाकृति बघुन माझं मत निश्चितच बदलल...प्रत्येक फोटो म्हणजे एकापुढे एक सरस धक्के आहेत .विशेषतः दागिन्यांच्या फोटोपासुन तर,अंगावर खरच रोमांचं उभे रहातात.

खरंच काय अफाट मेहनत आहे कलाकृतीत! ही प्रकाशचित्रे इथे दिल्याबद्दल उदय यांना धन्यवाद! :) (ओरीगामी प्रेमी)रंगमी

आयला, ही कागदी शिल्प आहेत आणि केवळ कागदांच्या घड्या घालून बनवलेली आहेत हे खरंच वाटत नाहीये. ज ब र द स्त! धन्यवाद! :-)

अतिशय सुरेख आणि अप्रतिम कलाकृती आहेत. सर्वच फोटोतल्या कलाकृती एवढ्या आवडल्या की एखादी जास्त आवडली म्हणून वेगळी काढताच आली नाही. इथे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. आणखी असतील तर नक्की इथे शेअर करा.