✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वसा

क — क्रान्ति, गुरुवार, 12/08/2011 - 15:56
कुणा माहिती काल होतो कसा? मला मीच ना आठवे फारसा ! प्रवाहातल्या ओंडक्यासारखा, किती दूर वाहून आलो असा दगा देतसे सावलीही मला, भरोसा करावा कुणाचा कसा? खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना इथे कोरडा मी जसाच्या तसा ! खरा चेहरा दाखवू पाहता, चरे पाडले, फेकला आरसा नकोसा जरी वाटला जन्म हा, पुसावा कसा मीच माझा ठसा? उतूही नये जीव, मातू नये फुलावा, फळावा असा दे वसा !

प्रतिक्रिया द्या
5248 वाचन

💬 प्रतिसाद (27)

सुंदर!!

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 12/08/2011 - 15:58 नवीन
रचना मनापासून आवडली.
  • Log in or register to post comments

आह्हा! सगळेच शेर सुरेख आहेत!

मेघवेडा
गुरुवार, 12/08/2011 - 16:09 नवीन
आह्हा! सगळेच शेर सुरेख आहेत! मस्त!
  • Log in or register to post comments

अतिशय आवडल्या गेले आहे.

सूड
गुरुवार, 12/08/2011 - 16:11 नवीन
अतिशय आवडल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments

दो आ प्र का टा आ

सूड
गुरुवार, 12/08/2011 - 16:15 नवीन
दो आ प्र का टा आ
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर... आवडले..

गवि
गुरुवार, 12/08/2011 - 16:17 नवीन
खूपच सुंदर... आवडले..
  • Log in or register to post comments

साधं सोप्पं सुंदर काव्य.

गणपा
गुरुवार, 12/08/2011 - 16:22 नवीन
साधं सोप्पं सुंदर काव्य.
  • Log in or register to post comments

छान

जाई.
गुरुवार, 12/08/2011 - 16:30 नवीन
छान
  • Log in or register to post comments

गझल आवडली

चित्रा
गुरुवार, 12/08/2011 - 18:27 नवीन
>खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना >इथे कोरडा मी जसाच्या तसा ! हे विशेष आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर काव्य, आवडले.

प्रचेतस
गुरुवार, 12/08/2011 - 22:13 नवीन
सुंदर काव्य, आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
गुरुवार, 12/08/2011 - 22:17 नवीन
गझल आवडली. नव्या कवीनी ही अवश्य वाचावी असं सांगेन. किंबहुना क्रान्तिचं जेवढं लिखाण मिळेल तेवढं वाचावं आणि मग आपल्या कविता प्रकाशित कराव्यात!
  • Log in or register to post comments

>>.....जेवढं लिखाण मिळेल

पाषाणभेद
Fri, 12/09/2011 - 07:49 नवीन
>>.....जेवढं लिखाण मिळेल तेवढं वाचावं आणि मग आपल्या कविता प्रकाशित कराव्यात! प्रतिसाद अस्थानी असेल पण आजकाल येथे कवितांच्या कुटूंबनियोजनाचे व कविताभॄणहत्तेचे जे प्रयत्न चालू आहेत ते सारे कवि अन कवितांना मारक आहेत हे नक्की. गाजलेल्या कविता दिसतात पण त्या कविता येण्यापुर्वी लिहीलेले कागदी बोळे दिसत नाहीत. नविन कविंनी प्रयत्नच करू नये काय? की एकदम सेलेबल प्रॉडक्टच येथे अपेक्षीत आहे. संपादक या नात्याने सर्व थराच्या लेखकांना बरोबर घेणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

रागावू नका

पैसा
Fri, 12/09/2011 - 10:44 नवीन
पाभे, हे कुटुंबनियोजन नाही किंवा भ्रुणहत्याही नाही. त्यां नवोदितांच्या भल्यासाठीच सांगत आहेत सगळेजण. निदान मी तरी. तुमच्या कवितांना कोणी कधी नावं ठेवलीत का? नाही ना? इथे सेलेबल प्रॉडक्टचा प्रश्नच नाही. कोणी काही विकत नाही आणि विकत घेत नाही. सर्वचजण हौशी लेखक्/कवी आहेत (एखादे रामदास किंवा क्रान्ति सोडून). उत्तम लिहिणार्‍यांचा अभ्यास करा म्हटलं तर त्यात चूक ते काय? नव्या कवीनी लिहू नका असं मी कुठे म्हटलंय का? उलट कोणत्याही नव्या कवीला जे ४/५ प्रतिसाद येतात त्यात माझा एक नेहमीच असतो. मी आवर्जून जे काही चांगलं वाटलं ते लिहिते. तसंच चांगलं वाचा हेही सांगितलं त्यात एवढा बाऊ करण्यासारखं काही नाही. तरीही तुम्हाला दुखावलं असेल तर क्षमा मागते. त्यातून लेखांवरच्या प्रतिक्रिया संपादक लिहितात तेव्हा त्या वैयक्तिक एक सदस्य म्हणूनच लिहिलेल्या असतात, संपादक मंडळाचं जे काही म्हणणं असेल ते संपादक मंडळ या आयडीनेच लिहिलं जातं हे कृपया समजून घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

अहो ताई राग वैगेरे काही नाही.

पाषाणभेद
Fri, 12/09/2011 - 16:02 नवीन
अहो ताई राग वैगेरे काही नाही. कृपया मनातले टाका. माझा याच प्रतिसादाला लिहीलेले उत्तर छापले गेलेले दिसत नाही. त्यात विस्तारीत रित्या लिहिलेले होते. आपले प्रतिसाद देण्याचे प्रयत्न समजतात. >> निदान मी तरी. तुमच्या कवितांना कोणी कधी नावं ठेवलीत का? येथे वैयक्तिकरित्या काहीच घेतलेले नाही. तुम्हीही घेवू नका. माझे म्हणणे केवळ हेच आहे की कविता करणे हे एक लेथ मशीन नाही की त्यातून एकसारखा जॉब बाहेर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

समजुतीचा प्रश्न

चित्रा
Fri, 12/09/2011 - 18:44 नवीन
मशीनमधूनही चांगले कपडे येतात आणि हाताने शिवलेले कपडेही सुरेख असू शकतात. शिलाई ओबडधोबड का होईना, पण पक्की असली की झाले. किंबहुना मशीनप्रमाणे कविता नकोत हाच आग्रह आहे. मी मागेही सांगितले आहे - येथे येणार्‍या कवितांच्या फलकावरील कवितेची यादी क्रिकेटच्या फलकावरच्या धावांपेक्षाही जलद गतीने बदलत असते. रोज अनेक संस्करण न केलेल्या कविता आलेल्या दिसतात, त्यांच्या मार्‍यात चांगल्या कविता खाली कुठेतरी चटकन निघून जातात. तुम्ही म्हणता तसे सगळे कवी कवितांच्या कागदांचे अनेक बोळे आधी फेकून देत असतील तर अशा मंथनातून निघालेली कविता ही निदान थोडीतरी वाचनीय असायला हवी? तसे नसते म्हणून तर हे लिहीले गेले आहे. प्रोत्साहन देताना सातत्याने नुसतेच प्रोत्साहन दिले गेले आणि मार्गदर्शन लाभले नाही, तर सुधारणा अजिबातच शक्य नाही. नव्या-जुन्याचा माझ्या मते हा प्रश्न नाही. काही नवे कवी/लेखक जुन्या कवी/लेखकांपेक्षा कधी सकस लिहीतात, तर कधी जुने अधिक सफाईने लिहीत असतात. त्यामुळे हा नवे विरूद्ध जुने असा काही संघर्ष आहे असे समजता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

वा वा! सुंदर गजल क्रांतीताई!

चतुरंग
गुरुवार, 12/08/2011 - 23:12 नवीन
खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना इथे कोरडा मी जसाच्या तसा ! उतूही नये जीव, मातू नये फुलावा, फळावा असा दे वसा ! हे दोन विशेष आवडले! :) -रंगा
  • Log in or register to post comments

फारच छान. आवडली. <<

इन्दुसुता
Fri, 12/09/2011 - 06:00 नवीन
फारच छान. आवडली. << प्रवाहातल्या ओंडक्यासारखा, किती दूर वाहून आलो असा दगा देतसे सावलीही मला, भरोसा करावा कुणाचा कसा? खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना इथे कोरडा मी जसाच्या तसा ! >> हे विशेष आवडले ....
  • Log in or register to post comments

काही रचनाच अशा असतात की

राघव
Fri, 12/09/2011 - 10:28 नवीन
काही रचनाच अशा असतात की प्रतिसाद दिल्यावाचून चैन पडत नाही. ही रचनाही त्यातलीच एक. सगळेच शेर सुंदर आहेत. त्यातही हा शेर खूप आवडला - खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना इथे कोरडा मी जसाच्या तसा ! राघव
  • Log in or register to post comments

दो आ प्र का टा आ

पक पक पक
Sat, 12/10/2011 - 14:09 नवीन
याचा अर्थ काय.....?
  • Log in or register to post comments

काही रचनाच अशा असतात की

पक पक पक
Sat, 12/10/2011 - 14:12 नवीन
काही रचनाच अशा असतात की वाचुन छान वाटते........काव्य खुप आवडले...
  • Log in or register to post comments

काव्य खुप आवडले

पक पक पक
Sat, 12/10/2011 - 14:15 नवीन
वल्लि आणी अन्या दातार , यात काहि गैर नाहि ना...?
  • Log in or register to post comments

गैर काहीच नाही हो, तुम्ही

प्रचेतस
Sat, 12/10/2011 - 15:16 नवीन
गैर काहीच नाही हो, तुम्ही अगदी बिन्धास १०० प्रतिसाद द्या की. मालकांनी आपल्याला मिपा फुकट वापरायलच दिलंय ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

बिन्धास १०० प्रतिसाद द्या की

पक पक पक
Sun, 12/11/2011 - 16:47 नवीन
मास्तर लोकं रागवतात हो शुद्धलेखन चुकले कि...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्यामुळे हा नवे विरूद्ध जुने असा काही संघर्ष आहे असे समजता येत न

पक पक पक
Sat, 12/10/2011 - 14:17 नवीन
सहमत आहे..
  • Log in or register to post comments

काव्य छान आहे

हरिकथा
Sun, 12/11/2011 - 22:36 नवीन
काव्य छान आहे. सगळ्या साध्याशा कल्पना काहीसे असामान्य भाव प्रदर्शित करत असल्यासारखे वाटत आहेत. कवयित्री उत्तम तयारीच्या वाटतात. इथे चांगले काव्य वाचायला मिळते आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

दत्ता काळे
Mon, 12/12/2011 - 10:37 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

:)

क्रान्ति
Tue, 12/13/2011 - 13:30 नवीन
शतशः धन्यवाद !
  • Log in or register to post comments

सुन्दर सुन्दर्...बर्याच

सोनल कर्णिक वायकुळ
Wed, 12/14/2011 - 10:47 नवीन
सुन्दर सुन्दर्...बर्याच दिवसानी एक चान्गली कविता वाचल्याच समाधान मिळाल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा