मुगाच्या डाळीचा हलवा ...
मुगाच्या डाळीचा हलवा
साहित्य : २ वाट्या मुग डाळ , २ वाट्या साखर ( पिठीसाखर ) , काजू १०-१२, बदाम १०-१२ , मनुके २०-२५ तूप अर्धी वाटी ( साजूक असेल तर उत्तम ),इलायची पावडर अर्धा छोटा चमचा , दुध अर्धी वाटी (ऑप्शनल)
कृती : मुगाची डाळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यात किमान दोन तास भिजत घाला , नंतर डाळ कोरडी करून मिक्सिमध्ये दरदरीत वाटून घ्या ,(अगदी पुरणासारखी केली तर हलवा गिचका लागतो )
एका कढईत २ चमचे तूप घाला ,त्यात डाळीचे मिश्रण घाला ,कमी आचेवर हलवत राहा , गाठी होऊ देऊ नका
( याला हलवा का म्हणतात हे तुम्हाला हळूहळू कळेलच ) ;)
मिश्रणाचा कलर लालसर सोनेरी होईपर्यंत हलवण्याचे काम चालू द्या , साधारण २०-२५ मिनिट तरी लागतात डाळ छान परतायला ,मग हवा तसा सोनेरी लालसर कलर येईपर्यंत हाताचे मसल्स एकदम टाईट झालेलं असतील
असो
आता मिश्रण हळूहळू मोकळे होवून तूप सोडू लागले की मिश्रणात साखर घाला ,साखर वितळू लागली कि हलवा मोकळा अन सैल होऊ लागतो ,आता एका वाटीत ४ चमचे साजूक तूप गरम करा त्यात मनुके , इलायची पावडर , काजूचे ,बदामाचे काप तळून घ्या ,हलव्यावर ओता ,हलवा पुन्हा एकदा ढवळून घ्या
,हुश्श ....... आता तुम्ही घामाघूम झाला असलाच ,आधी फ्रेश व्हा थंड थंड संध्याकाळी गरम गरम हलवा खाऊन थंडी एन्जॉय करा :)
( टीप हलवा जर जास्ती कोरडा वाटला तरच दुध घाला ,(काही लोक यात खवा / मावा घालतात )

वाचने
18738
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
चान चान एकदम टेस्टी दिसतोय
In reply to चान चान एकदम टेस्टी दिसतोय by स्पा
=))
In reply to =)) by परिकथेतील राजकुमार
हुश्श!!
In reply to हुश्श!! by कपिलमुनी
हॅ हॅ हॅ
वा! वा!
In reply to वा! वा! by प्रास
मस्त
In reply to मस्त by अन्या दातार
असहमत
In reply to मस्त by अन्या दातार
बरोबर
In reply to वा! वा! by प्रास
केलेल्या पदार्थांची चव घेता
In reply to केलेल्या पदार्थांची चव घेता by वपाडाव
वप्या
In reply to वप्या by अन्या दातार
सोप्पंय....
In reply to सोप्पंय.... by वपाडाव
(No subject)
वा वा चान चान!
In reply to वा वा चान चान! by इंटरनेटस्नेही
पियु.... खूपच गोड्ड्ड
हलवा चांगला दिसतोय. पण
In reply to हलवा चांगला दिसतोय. पण by नगरीनिरंजन
हेच म्हणतेय मी
अरेरे... काय हे ?
मस्तच.
व्वा व्वा... तोंडाला पाणी
In reply to व्वा व्वा... तोंडाला पाणी by सुहास झेले
असेच म्हणते......
काय पियुबै जोरात तयारी चालू
In reply to काय पियुबै जोरात तयारी चालू by गणपा
असेच
वा वा!
In reply to वा वा! by स्मिता.
पुढच्या पार्टीतला तूपाने
In reply to पुढच्या पार्टीतला तूपाने by प्रास
नक्की
In reply to नक्की by स्मिता.
.............................
In reply to ............................. by प्रास
का का काका असं लिहीताय? पूर्ण
In reply to का का काका असं लिहीताय? पूर्ण by प्यारे१
प्यारे काका, इथे झाडांची
अरे वाह लगेच केलास पण मस्तच
छान मस्तच ग आता पाकृ खूप
In reply to छान मस्तच ग आता पाकृ खूप by जाई.
जनहितार्थ जारी....
In reply to जनहितार्थ जारी.... by प्रास
+१
In reply to जनहितार्थ जारी.... by प्रास
+१
In reply to +१ by अन्या दातार
@-(आमच्याकडे सर्वप्रकारचे
विशेष धन्यवाद
मस्त आहे
मस्त....
In reply to मस्त.... by मन१
'पाकृ वीकांतास करून पाहिल्या
फारच मस्त
ओ नाव बदला आधी धाग्याचं, बिन
मस्त..
अर्धी वाटी तुपात दोन वाट्या
इलायची
फटु गन्डलेत....
वा... ट्वीटीला भज्यांबरोबर
अबब अबब अबब ' चकली तायच्या
पदार्थ आवडला........छान
मस्त!
पाकृ छान