✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

का?

ग — गोमटेश पाटिल, Fri, 12/09/2011 - 13:50
तुझ्या ओटान्वरति आहे पण तु अशी अबोल का? जणु नदि भरून वाहुन त्याचे पाणि खोल का? डोळ्याने बोलतेस ओट तुझे बन्द का? जणु पारिजात खुलुन त्याचा सुगन्ध मन्द का? तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्ध का? जणु पहिला पऊस मतित पडून त्याचा असा दुर्गध का? तुझ्या ह्रदयामध्ये आहे पण तुझा हा नकार का? जणु इतका उजेड असताना अन्धराचा आधार का?

प्रतिक्रिया द्या
6189 वाचन

💬 प्रतिसाद (28)

मोकलाया दाहि दिशेची आठवण

प्रचेतस
Fri, 12/09/2011 - 13:58 नवीन
मोकलाया दाहि दिशेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

नाही रे वल्ली!! "मोकलाया दाहि

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 12/09/2011 - 14:21 नवीन
नाही रे वल्ली!! "मोकलाया दाहि दिशा" हि उत्तुंग रचना आहे. त्याची सर याला कुठली? ओ गोमटेश "मोकलाया दाहि दिशा" बघा आणि पुन्हा प्रयत्न करुन बघा. जमेल जमेल... निराश होऊ नका... प्रयत्न करत रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो हो. ती तर आहेच. 'मोकलाया'

प्रचेतस
Fri, 12/09/2011 - 14:28 नवीन
हो हो. ती तर आहेच. 'मोकलाया' सारखे एव्हरेस्ट सर करायची ही 'का'ची पहिली पायरी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

गोमटेशाssssssssssssss(जी),

उदय के'सागर
Fri, 12/09/2011 - 14:25 नवीन
गोमटेशाssssssssssssss(जी), टंकलेखन सुधारा बुवा :(
  • Log in or register to post comments

गोमटेशाssssssssssssss(जी),

उदय के'सागर
Fri, 12/09/2011 - 14:25 नवीन
गोमटेशाssssssssssssss(जी), टंकलेखन सुधारा बुवा :(
  • Log in or register to post comments

गोमटेशाssssssssssssss(जी),

उदय के'सागर
Fri, 12/09/2011 - 14:25 नवीन
गोमटेशाssssssssssssss(जी), टंकलेखन सुधारा बुवा :(
  • Log in or register to post comments

बापरे!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 12/09/2011 - 14:31 नवीन
तीन तीन वेळा सांगीतल्यावर तरी मनावर घेतील असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

हा हा

उदय के'सागर
Fri, 12/09/2011 - 15:09 नवीन
हा हा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

हा हा

उदय के'सागर
Fri, 12/09/2011 - 15:09 नवीन
हा हा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

तुम्ही

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 12/09/2011 - 15:22 नवीन
फारच आधाशी बुवा!! हसतांना देखिल दोन दोनदा हसता!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

अहो काय माहित असं काय होतय,

उदय के'सागर
Fri, 12/09/2011 - 15:29 नवीन
:P अहो काय माहित असं काय होतय, काहि तरी प्रॉब्लेम झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

शुद्धलेखन नसणे हे समजून घेऊन,

गवि
Fri, 12/09/2011 - 14:32 नवीन
शुद्धलेखन नसणे हे समजून घेऊन, शुद्ध करुन वाचले. कवितेतलं मला फार काही कळत नाही पण दोन शंका विचारतोच..(हे शब्द शुद्धलेखनातल्या त्रुटींमुळे बनले नसावेत असं समजून..) -----"तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्ध का?" सुन्न म्हणायचे आहे का? नसावे कारण "दुर्गंध"शी यमक आहे, म्हणजे सुन्ध असाच शब्द असणार.. सुन्ध म्हणजे काय? ------"जणु इतका उजेड असताना अन्धराचा आधार का?" अन्धराचा आधार म्हणजे काय? धन्यवाद आणि मिसळपाववर स्वागत..
  • Log in or register to post comments

काय हे गवि शेठ ?

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/09/2011 - 14:37 नवीन
जणु इतका उजेड असताना अन्धराचा आधार का
ते नक्कीच इतका उजेड असताना 'अधरांचा आधार का' असे असावे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद.. -जे देखे कवी ते न

गवि
Fri, 12/09/2011 - 14:39 नवीन
धन्यवाद.. -जे देखे कवी ते न देखे गवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे

प्रचेतस
Fri, 12/09/2011 - 15:11 नवीन
तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्ध का?"
सुन्न नसून ते धुंद असावे. मन हे बर्‍याचवेळा धुंद असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नाही वल्लीशेठ,तसं नाही

गवि
Fri, 12/09/2011 - 15:15 नवीन
नाही वल्लीशेठ, तसं नाही वाटत, कारण रचनेमधे सर्वच ओळीच्या पूर्वार्धात पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्या उलट म्हणजे निगेटिव्ह सेन्स उत्तरार्धात प्रश्नार्थक स्वरुपात आहे.. म्हणजे. आहे मनोहर तरी गमते उदास या आकारबंधासारखे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो. आता लक्षात आलं. बरोबर आहे

प्रचेतस
Fri, 12/09/2011 - 15:27 नवीन
हो. आता लक्षात आलं. बरोबर आहे तुमचे. या कवितेचे संपूर्ण रसग्रहण कोणी करेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे घ्या गोपा शेठ

इरसाल
Fri, 12/09/2011 - 14:47 नवीन
तुझ्या ओठांवरती आहे पण तु अशी अबोल का? जणु नदी भरून वाहुन त्याचे पाणी खोल का? डोळ्याने बोलतेस ओठ तुझे बन्द का? जणु पारिजात खुलुन त्याचा सुगन्ध मंद का? तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्द का? जणू पहिला पाऊस मातीत पडून त्याचा असा दुर्गंध का? तुझ्या ह्रदयामध्ये आहे पण तुझा हा नकार का? जणू इतका उजेड असताना अंधाराचा आधार का?
  • Log in or register to post comments

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/09/2011 - 15:33 नवीन
तो सुन्द बहूदा सुन्दोपसुन्दी मधला सुन्द असावा. जाणकार अधीक प्रकाश ५५५ टाकतीलच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

अहो, सुन्द नसून सुन्न असावा.

अशोक७०७
Fri, 12/09/2011 - 15:46 नवीन
अहो, सुन्द नसून सुन्न असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मलाही "सुन्न"च असावा असं

गवि
Fri, 12/09/2011 - 16:00 नवीन
मलाही "सुन्न"च असावा असं वाटतं. मी पुन्हा नीट लिहायचा प्रयत्न करतो. : ओठांवरती शब्द सारे, तरी अशी तू अबोल का? नदी वाहते खळखळा, तरी डोह तिचा खोल का? डोळेच सारे बोलती, तरी ओठ तुझे बंद का? दारी पारिजात फुलला, तरी सुगंध मंद का? तुझ्या मनात सर्वकाही, तरी अशी तू सुन्न का? पहिला पाऊस पडूनही मातीस हा दुर्गध का? ह्रदयात तुझ्या होय आहे तरी तुझा नकार का? प्रकाशदिवा उजळला तरी अंधाराचा आधार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुझ्या मनात सर्वकाही, तरी अशी

प्रचेतस
Fri, 12/09/2011 - 18:02 नवीन
तुझ्या मनात सर्वकाही, तरी अशी तू सुन्न का?
'सुन्न' हेच जर येथे गृहित धरले आहे तर कवीला हा प्रश्न का बरे पडला असावा? मनातल्या मनातच सर्व काही असल्यानेच ती सुन्न झाली असावी. जर मनात न ठेवता तिने मनातील गोष्टी बोलण्याद्वारे बाहेर आणल्या असत्या तर ती सुन्न राहिली नसती.
दारी पारिजात फुलला, तरी सुगंध मंद का?
शिवाय दारी पारिजात फुलला त्याचा सुगंध मंद का होईना पण तो सुगंध आहेच पण पहिल्या पावसाचा मातीचा गंध कवीस दुर्गंध का वाटावा? रेल्वेरूळांशेजारील माती तर त्याच्या दृष्टीस पडत नसेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कविला बरेच प्रश्न पडलेले

गणपा
Fri, 12/09/2011 - 15:51 नवीन
कविला बरेच प्रश्न पडलेले दिसताय. मिपावरच्या काही उत्तम रचनांचा गाईड म्हणुन उपयोग करावा. बरीच कोडी उलगडतील. ;) सुरवात म्हणुन ह्या घ्या काही. ये र बालां वसा , मीही कवि होणार, झोका... डुडुळगावचा गोलंदाज खाटिक दारासमोरचा रस्ता गंध मायेचे.. मन माझं गोगलगाय ! ढिष्क्लेमरः वरील मला आवडलेल्या काही कविता. यादी बरीच लांब लचक आहे. वेळे अभावी तुर्तास इथेच थांबतो. यात मुद्दामच विडंबन घेतली नाहीत. चांगला 'माल' मिळाल्यास मिपाकरांच्या काव्यप्रतिभेची त्सुनामी कशी उठते (एका दिवसात एकाच कवितेची २५ - २७ विडंबन आली होती) त्याचा साक्षिदार आहे. (त्सुनामीग्रस्त) - गणा
  • Log in or register to post comments

गोमटेशभाउ कुठे गेले?

मन१
Fri, 12/09/2011 - 15:59 नवीन
गोमटेशभाउ कुठे गेले? कुणी हलवा, उठवा,चालवा अन् इथे आणा त्यांना.
  • Log in or register to post comments

अवांतर -- जबडोबा

मैत्र
Fri, 12/09/2011 - 19:57 नवीन
मागे एकदा कोणी तरी जॅबरवॉकीचं अप्रतिम मराठी रुपांतर केलं होतं. त्याची खूण मिळेल का... खूपच मस्त प्रकार होता...
  • Log in or register to post comments

जॅबरवॉकीच्या अनुवादाचा दुवा.

गणपा
Fri, 12/09/2011 - 20:09 नवीन
जॅबरवॉकीच्या अनुवादाचा दुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

अशुद्ध...

प्रभाकर पेठकर
Sat, 12/10/2011 - 19:20 नवीन
कवीच्या अशुद्ध लेखनाने थबथबलेल्या कवितेमुळे आणि (कविता) दुर्लक्षित ठेवण्याच्या वृत्तीने प्रेयसी अशी नकारात्मक अवस्थेस पोहोचली असावी. शुद्धलेखन सुधारल्यास कदाचित प्रेयसीत 'नवचेतना' जागृत होईल असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

तुज्या ऑथन्वर्ति अहे पण तु

विजुभाऊ
Sat, 12/10/2011 - 20:36 नवीन
तुज्या ऑथन्वर्ति अहे पण तु अशी अबोल का? जणु नंदि भ्रुन वाहुन त्याचे पणि खोल का? डोळ्याने बलतस आऊट तुझे बद्द का? जणु पारिजात खुलुन त्याचा सुगनद मद्द का? तुज्या मणामध्ये आहे पन मण असे सुन्ध का? जणु पहिला पऊस मतित पडून त्याचा असा दुर्गध का? तुज्या ह्रदयामध्ये आहे पण तुझा हा नकार का? जणु इतका उजेड असताना अन्धरचा आधर का? हे क्से वततय म्रित्राणो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा