Skip to main content

विरूचा दणका

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 08/12/2011 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या एक दिवसीय मॅचमधे विरूने २१९ रन्स कुटल्या. भारताने ५० षटकात ४१८ धावा केल्या. विरूचे अभीनंदन. त्याचे द्विशतक झाले तो क्षण

वाचने 31446
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या. आवांतर : सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही. हॅट्स ऑफ टु यु विरु.

In reply to by गणपा

मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या. सहमत आहे. सच्याच्या नावातलं नुसतं 'स' जरी दिसलं असतं तर कौतुकात किती लिहू आणि किती लिहू नको असं मिपाकरांना झाल असतं. एकाच विषयावर दुसरा धागाही असून सेहवाग मिपावर काही चालेना. :) सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही. अगदी सहमत आहे. -दिलीप बिरुटे

विरूचे अभिनंदन. भारताकडून कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यातही सर्वोच्च धावा करणारा एकमेव खेळाडू.

हा जो कोणी विरु आहे त्याचे मनापासुन अभिनंदन. मला क्रीकेटातलं कै समजत नै पण चांगली कामगीरी केली आहे तर कौतुक का नको करायला?

In reply to by शिल्पा ब

>>>मला क्रीकेटातलं कै समजत नै कशातलं समजतं? ;) - प्यारे ढ ;)

In reply to by प्यारे१

कशातलंच समजत नै कारण मी कै तुमच्यासारखी विद्वान नै!! ;)

In reply to by शिल्पा ब

ओ श्या द्याचं काम नाय आदीच सांगून ठिवायलोय. इद्वान कुनाला म्हनतासा? ;) ;)

शिर्षक पाहून फार अपेक्षेने धागा उघडला होता. तद्दन फालतू, भिकार, चोर, फसव्या, दरेडेखोर लोकांच्या खेळाविषयी काही वाचायला मिळेल असे मात्र वाटले नव्हते. असो... आता विरुने २०० रन्सा मारल्या म्हणजे देशासमोरचे २०% प्रश्न सूटायला हरकत नाही.

ज्याची खरीच योग्यता आहे (अ‍ॅग्रेसीव खेळ) त्याच्या नावावरच आता(तरी) हा विक्रम अस्तित्वात राहील हे बघूनच खूप बरं वाटलं...