Skip to main content

स्वातंत्र्य संपले????????

लेखक चिंतामणी यांनी मंगळवार, 06/12/2011 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
मगाशी विविध वाहीन्यांवर मा. कपील सिब्बल (मा. चा योग्य अर्थ घेणे) यांचे आकांडतांडव चालु होते. केंद्र सरकारने गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्या, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी हटविण्यास सांगितले आहे. तसेच सरकारने या सर्व साईट्सवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे. थोडक्यात सेन्सॉरशीप येणार आहे. आत्ता या साईटसवर "सिब्बल" हा "मोस्ट हॅपनींग" विषय झाला आहे. या साईटसवर फक्त "मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी" असतात का? इतर वेळी सोशल पोलिसिंग च्या नावाने गळे काढणा-यांना सेन्सॉरशीपची गरज का भासावी?? वाचून हसावं की रडावं...? केंद्र सरकारनं इंटरनेट कंपन्या आणि सोशल नेटवर्किंग वेबसाईटसवर 'सेन्सॉरशीप' आणायचं ठरवलंय. कोणताही कन्टेन्ट प्रसिद्ध करण्यापूर्वी 'प्री स्क्रिनिंग' व्हावा आणि 'चुकीचा' कन्टेन्ट काढून टाकावा, असा फतवा काढण्याची पावलं केंद्र सरकार टाकतेय...!!! फेसबुक, गुगल, याहूला सरकारकडून ताकीद http://www.esakal.com/esakal/20111206/5411406916295255938.htm सरकारची सोशल नेटवर्किंग कंपन्यांना धमकी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11003772.cms

वाचने 13298
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन , भ्रष्टाचारावर अंकुश मिळवण्यासाठी जनलोकपाल विधेयकाचा त्यांचा आग्रह व त्याला जनसामान्यांकडून मिळालेला वाढ्ता पाठींबा ,रामदेव यांचे काळ्यापैशा संदर्भातील जनआंदोलन , सुब्रमण्यमस्वामी यांनी वैध मार्गाने लढा लढून सरकारच्या अनेक नेत्यांचा भ्रष्टाचारातला सहभाग पुराव्यानिशी न्यायालयात सिद्ध करुन मिळवलेले यश ...काँग्रेसचे वाचाळ नेते दिगविजय यांच्यामार्फत प्रसंगी केली जाणारी असंबद्द विधाने ..आणि त्यातच भर म्हणुन वेळोवेळी काँग्रेसप्रणित युपिए सरकारने घेतलेले एकांगी निर्णय व त्यांच्या मार्फत सुरु असलेला अजागळ कारभार ....यासगळ्याचा परिपाक म्हणुन सोशल नेटवर्किंग संस्थळावर सुज्ञ सदस्यांनी काँग्रेसपक्षावर व गांधी घराण्यावर ओढलेले ताशेरे आणि शाब्दिक आसुड सहन न झाल्यानेच काँग्रेसच्या दुरसंचार मंत्र्यांनी आता सोशल नेटवर्किंग संस्थळावर टाच आणण्याचा निर्णय घेत सरळ सरळ हिंदुस्थानी जनतेच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरच घाला घालायचा प्रयत्न केलाय......... २००९च्या निवडणूकांमधे काँग्रेसपक्षाला मिळालेल्या अनपेक्षित यशाने काँग्रेसी निर्ढावलेत........गांधी घराण्याची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणार्‍या व निव्वळ आपल्या मालकांना खुश करण्यासाठी अशाप्रकारे जनतेच्या मुलभुत हक्कावर सिब्बल यांचे वागणे हे उद्दामपणाचे आहे-- माझ्याकडे सत्ता आहे आणि मी काहीही करु शकतो हि भावना काँग्रेसपक्षाचा माजोरडेपणाच दर्शवते .

सत्ताधार्‍यांकडून अपेक्षित असा प्रकार... राहिला प्रश्न हा की नेमकं काय होणार? "सेन्सरशिप" की फक्त "स्क्रिनींग" .. तर हे जाणून घ्यायला इतिहासाचं पारायण (पुन्हा) करायला हरकत नसावी. नाही..जास्त मागे जाण्याची गरज नाही..फक्त ईस्ट ईंडीया या कंपनीच्या आगमनापर्यंत (१६१२) मागे गेलं तरी पुरेसं ठरावं [हो.. ईस्ट ईंडीया ही कंपनी भारतात फक्त व्यापार करायला आली होती.. रेस्ट इज हिस्ट्री :) ]

In reply to by चिंतामणी

काल बहूदा काही प्रॉब्लेम असावा :) आज सकाळपासून पेज व्यवस्थीत चालू आहे. https://www.facebook.com/IndiaArmyFans

हल्ली फक्त पाकीस्तानबद्दलच्याच नाहि तर दाउदजि साहेबा बद्द्लच्या चान्ग्ल्या प्रतिक्रिया देखिल 'अवान्तर' म्हणून उडवल्या जातात........