Skip to main content

दिवा

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 18/07/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा स्वाती फडणीस यांची "गोडवा" आणि बेसनलाडू यांची "सोडवा" मांडी घालून तसाच ठेउ, खांदा खांदा देत राहू ! खांदेपालटाला तिरडी जरा, खाली उतरवून ठेवू !! काळ्या करड्या लाकडात, जलद आग लाऊ ! धूर ज्वाला निरखत , जीवनाचा अंत पाहू!! चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ! गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू !! ======================= आंबोळी.............. १८-०७-२००८
लेखनविषय:

वाचने 5926
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

ही डेंजर कविता वाचून तुमच्या 'त्या' लय डेंजर कंदीलाची आठवण झाली. ('दिवा'भीत)बेसनलाडू मांडी घालून तसाच ठेउ हे कळले नाही बुवा! (अजाण)बेसनलाडू तुमच्या या कवितेतील एका धूसर तत्त्वज्ञानाने डोळे चुरचुरले;त्यावर विचार करतोय अजून. (तत्त्वज्ञानी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मांडी घालून तसाच ठेउ हे कळले नाही बुवा! बेला, एखादी व्यक्ती मांडी घालूनच "गेली", तर तिरडीवर सरळ करून घालणे कठीण जाते. आंबोळी, गहिरे तत्वज्ञान ! तुमच्या आजच्या तिन्ही विडंबनात हे सर्वाधिक सुंदर विडंबन. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तेव्हा कळले नव्हते/लक्षात आले नव्हते.स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. (आभारी)बेसनलाडू चार्ली चॅप्लिन "गेला" तेव्हा अशाच काहीशा स्थितीत(म्हणजे मांडी घालून असे नाही,तर पाय सोडून बसलेल्या अवस्थेत);ज्यामुळे त्याला कॉफिनमध्ये घालणे कठीण होऊन बसले, व "गेला" तरी लोकांना हसवून/त्यांचे मनोरंजन करून अशी आख्यायिका ऐकल्याचे आठवते. यात कितपत तथ्य आहे,याबाबत कोणास काही माहिती आहे काय? (जिज्ञासू)बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तर तिरडीवर सरळ करून घालणे कठीण जाते.
(मयताला)तिरडीवर मांडी घालुनच ठेवले जाते असे वाटते..

मजेशीर विडंबन आवडले :D -------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी

अंबोळीशेठ, :O तुम्ही सुध्दा ज ह ब ह रा हा... हा हा हा.. संपुर्ण काव्य आवडल...अभिनंदन! (कंदिलाला घाबरणारा)केशवसुमार स्वगतः काल अंबोळीशेठनी कंदिल लावला असणार :B ? त्या शिवाय का आज कवितेची तिरडी बांधली.. :W

गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू घालवण्याची यादी पाहुन , कन्दील माजघरी लावु पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

भारीच !! आयला कंदिल्या .. काय रे यमाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहेस कारे तु मिपावरचा ?? तुझे हे विडंबन पाहुन विडंबन बाई बाटलीतच होते ते काय वाईट होते की तु आता त्याची त्या जोखडातुन मुक्तता करुन मयतापर्यंत आणुन ठेवलेस असे वाटायला लागलेय.

सुंदर विडंबन कंदिल्या! मजा आली वाचून! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

विडंबन फर्मास झाले आहे. मजा आली. अभिज्ञ

विडंबन लै भारी !!! अरे अंबोळ्या*, तुला हे मरणाचं कसं सुचतं, माणूस , निसर्ग, चंद्र, सुर्य, तारे, सोडून ते खांदेकरी, मयत, गेलेल्याच्या आठवणी यात कसा रमतोस कोणास ठाऊक !!! अंबोळी बद्दल आदर आहे. हे सांगने न लगे.

आंबोळीराव चालुध्या !!!! (जय यम देवा) मदनबाण.....

चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ! गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू !! हेच चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ! गेलेल्याच्या आठवणी, कंदिल माजघरी लावू !! असे वाचावे आणि पुन्हा पहिल्या कडव्या पासून रिपीट लूप सुरु करावा. :)

मृताला मांडी घातलेल्या स्थितीत , पद्मासन घालून ,पुरण्याची प्रथा लिंगायतांमध्ये आहे. हिंदू मध्ये दफन करण्याची प्रथा नाही. पण लिंगायतांमध्ये आहे.आता जागेच्या अभावी हा विधी नसावा असे वाटते. नगरला अशाच एका दफनभूमीवर हॉटेल उभे राहीले आहे.

In reply to by रामदास

रामदास, बरोबर आहे तुमचं. नगरला त्या जागेवर "रिद्धी" म्हणुन एक हॉटेल बर्‍याच वर्षांपुर्वी सुरु झालं होतं. ती जागा खर तर अत्यंत मोक्याची आहे. (कारण समोरच एक बाग आहे आणि हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आहे.) परंतु त्या हॉटेलमधे गेल्यावर अतिशय भकास वाटायचं... कदाचित ह्याच जागी दफनभुमी आहे हे माहिती असल्यामुळे असेल. ते हॉटेल अजिबात चालले नाही आणि थोड्याच दिवसात बंद पडले. त्याच्यानंतर अजुन कुठले हॉटेल तिथे सुरु झालय का? http://sucheltas.blogspot.com

चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ! गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू !! अतिशय सुरेख...! आपला, (अंतर्मूख) तात्या.