पियुशाची फर्माईश होती पनीर बटर मसाला ची पाकृ द्यायला....तीच देत आहे :)
साहित्यः
१०० ग्राम पनीर चे तुकडे हलक्या सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घेणे. (तुम्हाला जर का तळायचे नसतील तर तुम्ही असेच वापरु शकता, तळले की चवीत फरक पडतो .)
२ मध्यम कांदे उकडून घेणे व त्याची वाटून पेस्ट करणे.
३ मध्यम टोमॅटो उकडून घेणे व त्याची प्युरे करणे.
३ टेस्पून काजु गरम पाण्यात भिजवून त्याची घट्टसर पेस्ट करुन घेणे.
१ टेस्पून आले+लसूण पेस्ट.
३ टेस्पून काश्मिरी लाल-मिरची पावडर.
२ टेस्पून गरम-मसाला.
१ टेस्पून धणेपूड.
१/२ टेस्पून जीरेपूड.
१ टीस्पून जीरे.
१ टेस्पून कसूरी मेथी.
मीठ चवीनुसार.
४-५ टेस्पून बटर. (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२-३ तमालपत्र, १ मसाला वेलची, २-३ लवंगा, २-३ हिरवी वेलची.
पाकृ:
कढईत बटर गरम करुन घेणे व त्यात जीरे, २-३ तमालपत्र, १ मसाला वेलची, २-३ लवंगा, २-३ हिरवी वेलची घालून परतणे.
त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगले परतणे.
मग त्यात वाटलेली कांदे-पेस्ट घालणे. पेस्ट चांगली ब्राऊन परतली गेली पाहीजे.
त्यात टोमॅटो प्युरे घालून एकत्र करणे. नीट एकजीव झाले की त्यात २-३ चमचे काजु-पेस्ट घालणे. (आपण ह्यात फ्रेश क्रिमचा वापर अजिबात करत नसल्यामुळे काजु-पेस्ट तुम्ही २-३ चमचे घालू शकता त्यामुळे ग्रेव्हीला क्रिमी टेक्सचर येईल.)
आता त्यात काश्मिरी लाल-मिरची पावडर, गरम-मसाला, धणेपूड व जीरेपूड घालून एकत्र करणे. चवीप्रमाणे मीठ घालणे.
त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आणणे.
उकळी आली की त्यात कसूरी मेथी चुरडून घालणे.
त्यात आता तळून ठेवलेले पनीरचे तुकडे घालणे व झाकून ५-६ मिनिटे शिजवणे.
ग्रेव्ही शिजली की त्यात वरून बटर सोडणे.
गार्निशींग करता त्यावर थोडे पनीर किसून घालणे व थोडीशी कसूरी मेथी घालणे. (आवडत असल्यास थोडे फ्रेश क्रिम ही घालू शकता.)
पनीर बटर मसाला तुम्ही नान, रोटी बरोबर सर्व्ह करु शकता....मग वाट कसली बघता येताय ना जेवायला :)
वाचने
14412
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रेसिपी!!!
+ १
In reply to मस्त रेसिपी!!! by कौशी
झकास.. मस्त दिसतेय आणि नेमकी
सहीच... रेसीपी आवडली
सुंदर...आजच आणते पनीर
मस्तच
अरे व्वा ,झक्कास त्रिवार
आणि मग आम्ही काय पाप केलंय,
In reply to अरे व्वा ,झक्कास त्रिवार by पियुशा
मस्तच !!
फोटू दिलखेच.
सेम हियर!!
In reply to फोटू दिलखेच. by गणपा
झक्कास! प्रेझेंटेशन नेहमी
व्हेज. माखनी...
In reply to झक्कास! प्रेझेंटेशन नेहमी by उदय के'सागर
---^---
नेहमीप्रमाणे कॅटरिना
ठार !!!
सानिकास्वप्निल
कसूरी मेथी म्हणजे
In reply to सानिकास्वप्निल by Pain
कसूरी मेथी..
In reply to कसूरी मेथी म्हणजे by सानिकास्वप्निल
कसूरी आणि नागोरी.
In reply to कसूरी मेथी.. by प्रभाकर पेठकर
सहमत.
In reply to कसूरी मेथी म्हणजे by सानिकास्वप्निल
धन्यवाद अजुन काय
पाकृ जाम भारी आहे
वा छान.
वाह... असे त्रिकोणी पनीर
आजच केले.