✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...तर सौदीत कुमारी राहणार नाहीत

च
चिंतामणी यांनी
Sun, 12/04/2011 - 09:18  ·  लेख
लेख
आज ऑन लाईन म.टा. वाचताना अजून एका बातमीने लक्ष वेघले. त्या बातमीतील जावईशोध वाचून मी उडालो. त्यात म्हणले आहे "स्त्रियांनी वाहन चालविले तर सौदी अरेबियात एकही कुमारी महिला शिल्लक राहणार नाही, असा विचित्र दावा सौदी अरेबियातील 'मजलिस अल-इफ्ता अल-आला' या सवोर्च्च धार्मिक संस्थेने एका अहवालात केला आहे. वाहन चालविण्यासाठी स्त्रियांवरील बंदी शिथील केली, तर अनेक स्त्रिया आणि पुरुष समलिंगी बनतील किंवा पोनोर्ग्राफीकडे वळतील, असाही दावा या तथाकथित अहवालात करण्यात आला आहे. आपला अहवाल 'वैज्ञानिक' असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. " स्त्रियांना वाहन चालविण्यास बंदी घालणारा सौदी अरेबिया हा जगातील एकमेव देश आहे. ही बंदी उठवली, तर काय घडेल, याचा मागोवा घेणारा अहवाल मजलीसने प्रसिद्ध केला आहे जेद्दा येथे शैमा जास्तनिया ही ३४ वर्षांची महिला वाहन चालविताना आढळल्याने तिला चाबकाचे दहा फटके मारण्याची शिक्षा नुकतीच देण्यात आली होती. त्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्या अहवालातील इतर तपशील जरूर वाचा. आज महीला अवकाश यानातुन अंतरीक्षात सफर करीत आहेत त्याच बरोबर जगाच्या एका भागात अशीसुद्धा अवस्था आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6266 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

डोके

चिरोटा
Sun, 12/04/2011 - 09:37 नवीन
डोके फिरवणार्‍या बातम्या असतात एकेक. डाय्विंग लायसन देताना जी कुमारी नाही अशा स्त्रियांनाच लायसन द्या की मग.
  • Log in or register to post comments

सौदीतल्या ३ महिन्यांच्या

सोत्रि
Sun, 12/04/2011 - 09:39 नवीन
सौदीतल्या ३ महिन्यांच्या वास्तव्याच्या अनुभवावरून सांगतो, तीथे स्त्रियांच्या बाबतीत काहीही होऊ शकते. स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे, ह्या पलीकडे तीथे तीला काहीही किंमत नाही. प़ण एक चांगली गोष्ट म्हणजे तीथे कायदे कडक असल्यामुळे गुन्हेगारी जवळजवळ नाहीच त्यामुळे स्त्रीया तशा सुरक्षीत आहेत. पण मी तर ब्वॉ ही बातमी ऐकली होती, :) :lol: :) - (हाजी) सोकाजी
  • Log in or register to post comments

लैच भारी रे सोकाजी

चिंतामणी
Sun, 12/04/2011 - 09:43 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

(No subject)

मोहनराव
Mon, 12/05/2011 - 01:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

सोकाजिराव लैच भारी

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/06/2011 - 00:03 नवीन
काट्यानी काटा काढला... सॉरि सॉरि... वाढला ;-) अवांतर-भारि व्हिडिओ दाखवल्या बद्दल आभारी आहे,आणी याच कारणास्तव वाचनखुण साठवली गेली आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

या देशात नक्की कोणाचा कायदा

शिल्पा ब
Sun, 12/04/2011 - 10:14 नवीन
या देशात नक्की कोणाचा कायदा चालतो? तिथले लोकं इतर कोणत्याही देशांबद्दल काहीच जाणुन नाहीत का? काय हा मुर्खपणा!! आणि इथुन परदेशी गेलेल्या लोकांचं याविषयी काय म्हणणं असतं? जर कोणी आपल्या माहीतीत असेल तर विचारुन आम्हाला सांगा. नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक वाचल्यावर ईराणमधील काही गोष्टी समजल्या होत्या. :(
  • Log in or register to post comments

शिल्पातै बिकांनी याबाबतीत

जाई.
Sun, 12/04/2011 - 10:20 नवीन
शिल्पातै बिकांनी याबाबतीत माझं खोबार नावाच्या लेखमालेत सुंदर लिहीलय कृपया कोणीतरी लिँक द्या माझ्या पीसीत प्राँब्लेम येतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

शिल्पातै हे घ्या माझं

सोत्रि
Sun, 12/04/2011 - 10:31 नवीन
शिल्पातै हे घ्या माझं खोबार... बिकांची अतिशय सुंदर लेखमाला आहे ही. - (हेच खोबार याचे देहा याची डोळा पाहिलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ते केंव्हाच वाचुन झालंय हो!!

शिल्पा ब
Sun, 12/04/2011 - 11:05 नवीन
ते केंव्हाच वाचुन झालंय हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

शासन आणि इस्लामिक दिशांचे कायदे

तर्री
Sun, 12/04/2011 - 11:34 नवीन
शासन आणि इस्लामिक देशांचे कायदे ह्यांचा तसा काही संबंध नाही . आपण ह्या अनुभवातुन सावध व्हायला हवे. निधर्मी भारतातील ऊत्तर पूर्वे कडचे एक राज्य एका माजी पंतप्रधानानी "एका" धर्माचे आहे असा दावा केला होता. ह्या "एका" धर्माच्या जागी "दुसरा" धर्म असता तर त्या राज्यात एवाना "असे" कायदे गरजेचे आहेत अशी चर्चा सुरु झालेली असती. मागच्या आठवड्यात एका धाग्याचा "बालमृत्यु" झालेला पाहिला आहे. माला वाटते तो शिल्पा ब यांचा धागा होता. म्हणून येथेच थांबतो.
  • Log in or register to post comments

"स्त्रियांनी वाहन चालविले तर

गवि
Tue, 12/06/2011 - 13:17 नवीन
"स्त्रियांनी वाहन चालविले तर सौदी अरेबियात एकही कुमारी महिला शिल्लक राहणार नाही" "वाहन चालविण्यासाठी स्त्रियांवरील बंदी शिथील केली, तर अनेक स्त्रिया आणि पुरुष समलिंगी बनतील किंवा पोनोर्ग्राफीकडे वळतील, असाही दावा या तथाकथित अहवालात करण्यात आला आहे. आपला अहवाल वैज्ञानिक असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. " दोन्ही विधानांवर अवाकच झालो होतो. तरीही दोनतीन दिवस वेळ घेतला. मोकळ्या वेळात सर्व प्रकारचे वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, लैंगिक, तांत्रिक, मांत्रिक, रापचिक असे सारे सारे तर्क लावून पाहिले. पण पराभव वाट्याला आला. कोणत्याही रूटवरुन विचारांना नेऊनही : १) स्त्रियांनी वाहन चालवणे आणि २) ती कुमारी न राहणे, शिवाय अनेक स्त्री अन पुरुषही समलिंगी बनणे. या दोन चिजांचा संबंध नाही जोडू शकलो... आमची हार धरा. खेरीज, ही परिस्थिती पाहून उलट वाटतं की अशा ठिकाणी आदुगरच खरोखर किती कुमारी आहेत किंवा किती समलिंगी आहेत याचा खराखुरा सर्व्हे झाला तर जे निकाल येतील ते या नियमकर्त्यांच्या डोक्यात मुंग्या आणणारेच असतील हे नक्की.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

अन्या दातार
Tue, 12/06/2011 - 13:29 नवीन
गवि तुम्हारा चुक्याच! अहो 'ते' म्हणतील ते विज्ञान. जगात रुढ असलेलं विज्ञान 'त्यांना' मान्य असेलच असे नाही ना. मूळ गृहितकच चुकीचे धरल्याने तुम्हाला नापास करण्यात येत आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे घ्या अजून....आज फेसबुकवर

Pain
गुरुवार, 12/08/2011 - 05:28 नवीन
हे घ्या अजून....आज फेसबुकवर पाहिले- http://bikyamasr.com/50403/islamic-cleric-bans-women-from-touching-bananas-cucumbers-for-sexual-resemblance/
  • Log in or register to post comments

खलास.

चिंतामणी
गुरुवार, 12/08/2011 - 07:56 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

ही घ्या अजून एक लिंक.

चिंतामणी
गुरुवार, 12/08/2011 - 16:08 नवीन
http://bollywood.bhaskar.com/article/ENT-MM-islamic-cleric-bans-women-from-touching-bananas-cucumbers-for-sexual-resemblance-2622509.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

नाही हं ! तिकडे माहिती

नर्मदेतला गोटा
Fri, 12/09/2011 - 00:00 नवीन
नाही हं ! तिकडे माहिती नाही पण आपल्याकडे हवीत काही बंधनं. होण्डा दियो वरून वेगात जाणार्‍या मुली कायनेटीक होण्डावरच्या काकवा यांना कुणाचीच पर्वाच नसते आणि बाइकवर मित्राला लटकलेल्या पोरी सगळेच विचार करण्याजोगे --
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा