Skip to main content

मनातली घालमेल

लेखक सचिन भालेकर यांनी गुरुवार, 01/12/2011 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
विषय थोडा वेगळा असेल कदाचित............... माझी चुक नसताना पण माझ्याकडुन खुप मन दुखवली जाणार असेल तर................ माफी कशी मागावी हेच समजत नाहिये............... मदत हवी आहे तुमच्या सल्ल्याची..............

वाचने 2934
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

काहि प्रोबलेम आहे का?? (ता.क) लिहा ईथे. आणी फळाची अपेक्षा न करता, कर्म करा व निश्चिन्त व्हा. 'कर्माचा सिद्धान्त' वाचलय का? नक्की वाचा, मुळ लेखक हीराभाई ठक्कर. मराठी अनुवाद बळवन्त शन्कर काशीकर. खुप उपयोगी आहे, मनाला उमेद देणारे.

वाह.. एकदम हटके विषय. अश्या विषयांवर मुद्देसूदपणे चर्चा होणे अपेक्षित आहे. जागा राखून ठेवतो.... ;) पुलेशु !!! :)

बाप रे....कसे होणार.... धडधडित चूक केलेली असतानाही ती मान्य न करणार्‍यांच्या ठार संवेदनाहीन जगात, चूक न करताही माफी मागणार्‍यांचे कसे होणार? तुम्हाला जीझस प्रमाणे "देवाचे कोकरू" व्हायची हौस आहे काय? जगाचे मरण स्वतःच भोगायची इच्छा/तयारी आहे काय?

चूक नसतानाही माफी कशाला मागताय. तुमच्या मनात न्यून गंड आहे. याला काही लोक गिल्ट कोंन्शननेस म्हणतात. जर तुम्ही काहिही चुकीचे केलेले नसेल तर माफी मागायच्या भानगडीत पडू नका.

माझी चुक नसताना ........................... माफी कशी मागावी एक लांब पल्ल्याचा सल्ला देतो. माफी मागणं कितीही चांगलं असलं तरी ती चुकीची कबुलीही असते. चूक नसताना चुकूनही "माफी" शब्द वापरु नका.. नेहमी "दिलगिरी" किंवा "खेद" व्यक्त करा.

असं अर्धवट काय सांगताय? एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे ते सांगा ना, मग इथे सर्व प्रकारचे सल्ले मिळतील.

धन्यवाद......... तुम्हा सर्वाचे धन्यवाद.........

अरे !!!! इतक्यात धन्यवाद ? अजून कितीतरी सल्ले यायचे आहेत .... माझा सल्ला : - माफी मागवीशी वाटत असेल तर मागून टाका ... म्हणजे "सॉरी ... " म्हणून टाका ना ... त्यात काय अवघड आहे? (म्हणजे मग तुम्हाला परत असे 'माफी मागवी असे वाटते आहे.." असे वाटेपर्यंत तुम्ही मोकळे )