सिंदबाद...
सिंदबाद...
एक वेडा खलाशी.समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची,प्रवाशाची.
अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं.
हरेक सफरीत काहितरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतय " शिडांच्या जुळजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठया.
वादळातून नाव काढल्यावर "वाचलो", "सुटलो" असे म्हणण्यापेक्षा "कस्ला थरार होता हा." असे म्हणून रोमांचित होणारा व रूढ जगाच्या दृष्टीने गाढव. कधी गलबत उलटे होउन बुडताना छोटी अरूंद नौका सोबत्यांसाठी ठेवून नजिकच्या बेटापर्यंत पोहत जायची हिम्मत ठेवणारा धाडसी सिंदबाद. ह्या सगळ्या प्रवासात चित्रविचित्र अनुभव घेतलेला, तिलिस्मी तलवार सापडलेला, डाकूंशी आणि चाच्यांशी लढलेला, प्रसंगी घाव झेलून आपल्या सहकार्यांना वाचवणारा हा सिंदबाद.
कधी अद्भुत जादूच्या, मायावी बेटावरून त्या दुष्ट जादूगाराच्या जाळ्यात त्यालाच अडकवत वठणीवर आणणारा चतुर सिंदबाद. कधी अजस्त्र माशांनी किंवा ड्रॅगनसदृश प्राण्यांनी गलबत घेरले गेले असताना गलबत वाचवणारा एक धाडसी, रोमांचवेडा,अल्पकालातच कंटाळणारा सिंदबाद.
प्रत्येक सफरीत आजवर कुणी न घेतलेले असे चित्रविचित्र पण समृद्ध अनुभवविश्व घेउन, जीवाशी खेळ करून शेवटी सिंदबाद घरी येउन पोचतो. ह्या अनुभवानंतर शहाण्याने तर प्रवासाचे पुन्हा नावच काढायला नको.
पण हा मात्र लागलिच "इथे राहून रोजच्या आयुष्यात करायचे काय" असे म्हणत उप्लब्ध असलेल्या चारचौघांसारख्या स्थिर पण चौकटीबद्ध आयुष्याला कंटाळत पुन्हा लागलिच पुढच्या प्रवासाची बांधाबांध करू लागतो.
एकाच सफरित भरपूर धनवान झाल्यानंतर तो घरी थांबू शकला असता,पण "घर" हे ही त्याच्यासाठी "बेट"च होते.
बेटावर फक्त काहीकाळ मुक्काम करायचा असतो; तो केवळ पुढल्या भ्रमणाला निघायला हेच पायाला भिंगरी लावलेल्या अस्सल खलाशाला समजते. तो पुढचीही सफर पूर्ण करून पुन्हा त्या "बेटावर" यायचं ठरवतो आणि तयारीला लागतो.
आपल्या सगळ्यातच हा सिंदबाद असतोच. जितके लहान वय तितका तुमच्यात सिंदबाद जास्त. एकाच ठिकाणचं स्थिरत्व त्याला जडात्व वाटतं, कंटाळवाणं वाटतं. नाही ती संकटं अंगावर ओढवून घ्यायची आणि मग स्वतःच लढून ती सोडवायची आणि वर ह्यानं खुश, उत्तेजित, रोमांचित होत पुढल्या संकटात घुसायचं एवढच त्याला समजतं. बालपणी नाही का "बाउ आहे हां तो" म्हटले तरी चटका बसल्याशिवाय बाळाला अक्कल येत नाही, किंवा रोज खरचटून,धडपडून घेतलं तरी खेळायचा उत्साह काही कमी होत नाही तसच.
अशा सिंदबादना सुरक्षित आणि सामान्य प्रवासच मंजूर नसावा. त्यांना हवे ते अंगावर येनारे roller coaster सारखे आयुष्यात येणारे अनुभव.
संथ व शांत आयुष्यात ह्यांची अवस्था एकच....
"`आहे मनोहर तरी गमते उदास"....
आहे ते उत्तम आहे, पण अजून काही तरी हवय. सोबतच्यांना ते "तुम्ही चांगले आहात, पण तुम्ही मला आता हवे आहात तसे नाही आहात" असे म्हणत ते मांडलेला डाव सोडून दुसर्या भिडूशी नव्याने भिडतात. कोण वाइट, कोण चांगले, कोण शहाणे कोण पागल असा विचार "शहाणी" माणसे करतात, करतच राहतात आणि ह्या "वेड्याचे" तेव्हढ्यात सात प्रदीर्घ समुद्रसफरी पूर्ण होतात देखील.
Good bye Cognizant. माझ्यातला सिंदबाद उचकलाय.
सफरीतून जगलो वाचलो तर पुन्हा तुला भेटायला येइनच.
तू छानच आहेस. दोनेक महिन्यात नव्या सफरिला निघतोय, नवीन बेटाच्या ओढीने.
--मनोबा.
प्रतिक्रिया
वा. क्या बात है..
तुम्ही कंपनी बदलत आहात का ?
होय.
बेस्ट्च रे, कंपनीनं आपल्याला
<<अतिअवांतर - वरचं अवांतर
“A ship is safe in harbor,
मस्त मुक्तक. आवडले.
मनोबा नव्या सफरीसाठी
जास्तही इकडुन तिकडे उड्या
उड्यांचं असं आहे बघा....
अस्सय होय!!
सुंदर! भावि आयुश्यासाठि
नवीन सफरी दरम्यान खर्या
मुक्तक आवडलं
शुभेच्छा......
क्या बात है! शुभेच्छा,
आभार...
मस्तच....
छानच लिहिलंय. आयुष्याला जीवन
शुभेच्छा
प्रकाटाआ
सुंदर लिहलय हो मनराव. आवडेश.
चांगले मनोगत (अवांतरः
पुढल्या प्रवासासाठी खूप खूप
पुढील सफरीसाठी
अनोखी पध्हत..
छान लेख आहे
:)
नवीन नवीन बेटांवर आपल्याला
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा !
सल्ला आणि आभार.
माझं स्वत:चंच चित्र