Skip to main content

पक्षांची सकाळ (भाग - १)

लेखक जागु यांनी मंगळवार, 29/11/2011 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
दर रविवरी मी सकाळी कॅमेरा घेऊन टेरेसवर, अंगणात किंवा आमच्या बेडरुमच्या खिडकीत बसते. कारण ह्या वेळी पक्षी कोवळे उन अंगावर घेण्यासाठी झाडांच्या फांद्यांवर बसायला येतात. इतर दिवशी फांदिवर बसायला आणि कॅमेरा हातात असायला योगायोग जुळून आला तर एखादा पक्षी कॅमेर्‍याच्या पिंजर्‍यात अडकतो. माझ्याबरोबर माझी मुलगीही तोंडावर बोट ठेउन निरिक्षण करते. कारण तिला माहीत आहे जर आपण आवाज केला तर पक्षी उडून जाणार. तर ही थोडक्यात पक्षांची सकाळ सुरुवात पुष्पदेऊन म्हणजेच सोनकुसुमाने करते (इनरव्हिलच्या लागोपाठच्या कार्यक्रमांचा परीणाम :हाहा:) १) २) उठा उठा सकाळ झाली. ३) उठलो उठलो. ४) बाकीचे उठले का ? ५) धनेश ६) पोपट ७) निबंध लिहाव का ह्याच्यावर ? ८) हळद्या ९) काय म्हणताय राव ? घुबड १०) आमच सकाळच भांडण झालय. - कोकिळ ११) मी नाहीच बोलणार. १२) पाणकोंबडीची पिल्ले १३) पाणकोंबडी १४) १५) १६) ढोक / पेंटेड स्टॉर्क हे पक्षी कोकणातल्या सकाळचे. १७) पारवा १८) सातभाई १९) खाटीक (रूफस बॅक्ड श्राईक) आमच्या घरासमोरच्या आवारात आला होता. टेरेसवरून फोटो काढला आहे. वेगळाच वाटला. २१) हा ऑफिसला जातानाच्या रस्त्यावरच्या सकाळचा. सुगरण २२) ही माहेरची सकाळ - पाणकावळा/कॉरमॉरंट २३) हा कोतवाल आमच्याच केबलवरचा २४) पनवेलमधील एका रिसॉर्ट मधील बदके २५) हे इमू साहेब कोल्हापुरच्या सकाळचे २६) हे साहेब रोज येतात पण फोटो काढायला भाव खातात. - भारद्वाज २७) ह्या बुलबुलांचे २४ तास आमच्या घरात होते काही महिन्यांपुर्वी अगदी त्यांच्या बाळांसकट २८) ज्यांची मी नावे नमुद केली नाहीत त्यांची जाणकारांनी द्यावीत ही विनंती. अजुन २-३ पक्षी भाव खातात त्यामुळे त्यांचे फोटो टाकायचे राहीलेत. पण किती दिवस भाव खातील येतीलच कधीतरी कॅमेर्‍यात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15189
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

अरे वा... बरेच पक्षी कॅमेर्‍याच्या पिंजर्‍यात कैद झालेले दिसत आहेत. :) पोपटाचा दुसरा फोटो आहे ना तो...झोप अनावर झाली आहे असं वाटतं त्याच्याकडे पाहुन! ;)

सॉल्लिड आहेत फोटो. पहिल्या चित्रात पोपट अंमळ कावल्यासारखाच दिसतोय (उगा सकाळी सकाळी इच्छा नसताना उठल्यासारखा) २८ क्र.चा फोटो नक्की कशाचा आहे?

मदनबाण, जाई धन्यवाद. अन्या ती बुलबुलची पिले आहेत. आमच्या झुंबरामध्ये बुलबुलने अंडी उबवली होती. त्याच्यावरचा लेखही मी आधी टाकला होता. लोकसत्ताच्या वास्तुरंगमध्येही प्रकाशीत झाला होता.

अरे वा ! सगळेच फोटो छान आलेत. इकडे मात्र पाखरे संध्याकाळी बाहेर पडतात. ;-)

जागुताई ,आय एम फिलींग डय़ाम एनव्हियस अबाऊट यू नाऊ !! रानावनात भटकायला तसाही तुला छान वेळ मिळतो आता रानातच घर बांधलंस का ग टुमदार ? :-) ... आम्ही आपले अडकलो आहोत ऑफीसात क्लायंट कोड-डिलेवरीच्या चक्रात :-( तुझा ला लेख मस्तच !! :-)

शिल्पा, कुंदन, गणपा धन्यवाद. वहीदा मी नाही ग कुठे रानात क्वचीत कधीतरीच जाते. आमच्या भवतीच्या परीसरात झाडे आहेत त्यावरच हे पक्षी येतात.

सगळे फोटू मस्त! १६ व्या फोटोतला पक्षी ओपन बिल्ड स्टॉर्क आहे... पेंटेड स्टॉर्क (चित्रबलाक) असा दिसतो -

जबरदस्त फोटो आहेत सगळे, एवढ्या जवळ आहात तुम्ही निसर्गाच्या मला तुमचा प्रचंड हेवा वाटतो आहे. मिपावर आल्याचा हा एक मोठा तोटा झाला आहे, ब-याच लोकांचा हेवा वाटायला लागतो अन आधीच छोटं करुन घेतलेलं हे आयुष्य बरंच काही करायला अजुन छोटं पडेल याची भिती वाटायला लागते, गणपा, वल्ली, सानिकास्वप्निल, मृणालिनी, रामदास काका, गवि, मदनबाण आणि अजुन बरेच, किती नावं घ्यावीत, एवढ्या सगळ्यांचा हेवा करायचा म्हणजे माझं एक आयुष्य कमी पडणार नक्कीच.

वाहवा...तुमच्या आजपर्यंच्या सगळ्या अश्या धाग्यांमधला हा दी बेस्ट आहे जागु ताई...दी बेस्ट तो 'धनेश' म्हणजे कर्ज वसुली अधिकाय्रासारखा व्यक्तिमत्वानीच भेदक दिसतोय,हळद्या,७भाइ आणी सुगरण हे पक्षीसृष्टीमधले व्यक्तिविशेष म्हणावेत असे वाटते...पण कोतवाल बाकी अगदी पक्का कोतवालच हो ... त्याच्या नजरेतनं आणी जरबेतनं कुणी सुटेल....?....काय बिशाद आहे ...? कस्टम ऑफिसवर हा जर का लावला त्या स्वगोत्रजांना हा आधी धरेल,,,मग बाहेर ड्युटी...! वा वा धन्य झालो याच्या दर्शनानी... :-)

इतके सगळे पक्षी दिसतील तिथे येउन प्रत्यक्ष पहावेत अशी इच्छा होते आहे. हर्षदरावांशी(५० फक्त) तर भलताच सहमत. इथं नुसतं वाचूनही, नुसता जागता वावर ठेवूनही खूप काही कमावता येतं हे मला आवडतं.

खुप सुंदर फोटोज आहेत.. माझ्याकडेपण पोपटांचे (आणि नेपाळी म्हणतात त्या पक्ष्याचे, ह्याला गुलाबी झाक असते थोडी) फोटोज होते, पण दुर्दैवाने ते उडाले.. फोटोज, पक्षी नाही.. ;-)

सर्वच पक्षांचे फोटो छान आलेत. तुमच्या घराच्या आसपास इतके पक्षी दिसतात ते पाहून नवल वाटलं.खरच खूप लकी आहात तुम्ही.

हे माझ्या कडे असलेले काही फोटो. कुणाला यांची नावं माहीत असतील तर हवी आहेत. १) २) ३) ४) ५) ६) ७)

In reply to by जागु

अगं नावंच तर हवी आहेत. ईथे अनेक दिग्गज आहेत. म्हटलं कुणी मदत करतय का पाहु. :)

In reply to by जागु

हे परदेशी पक्षी दिसताहेत...४ नंबरचा कोतवाल नसावा, जागुतैंच्या फोटोतल्या कोतवालाची शेपटी बघा आणि ह्याची बघा...फरक लगेच कळेल...(गणपांच्या "कोतवालाने" शेपटीची पिसे गोल कातरुन घेतली असल्यास कल्पना नाही ! :) )

जागु आणि श्री. गणपा ह्यांनी करुन दिलेली पक्षीजगताची ओळख फारच मनोहारी आहे. अभिनंदन. आमच्या हाती कॅमेरा असतो तेंव्हा पक्षी गायब असतात. पक्षी दिसतात तेंव्हा कॅमेरा हाती नसतो. दुर्दैव दुसरे काय....!

सुंदर , फारच छान फोटो. बाकि पक्षांची सकाळ म्हणजे वैताग , बादली भर पाण्याने गाडी धुवुन काढणे एवढच समीकरण होत.

नीडलेस टू से दॅट टेक इट अ‍ॅज अ कॉम्प्लिमेंट :) (मराठीचा अभिमान, प्रेम इ. सारे काही आहे पण हे वाक्य इंग्लिशमधेच भावना पोचवतं !!!)