मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शोध रेसिपी चा

फोलपट · · पाककृती
गदग ला गेले असताना तान्दुळ आणि उडिद डाळिबरोबर चुरमुरे घालुन केलेले जाळिदार डोसे / आम्बोळ्या खाण्यात आले. पाकक्रुति शोधत आहे. कोणाला माहित आहे का?

वाचने 9109 वाचनखूण प्रतिक्रिया 23

पैसा Mon, 11/28/2011 - 20:01
http://misalpav.com/node/19884#comment-355554 फक्त यात पोह्यांऐवजी चुरमुरे घालतात, तसंच कलिंगडाचा पांढरा भाग, शिळा भात, खवलेलं खोबरं वगैरे पोह्यांऐवजी/पोह्यांबरोबर घालून वेगवेगळ्या प्रकारचे पोळे करतात.

In reply to by प्रास

शिल्पा ब Tue, 11/29/2011 - 12:12
झुमीन झुमौट केलं पण काहीच समजलं नै...कुठं करायचं ते माहीती नको? मग गदग टैप केल्यावर समजलं. या फोलपटने सुद्धा गदग जगप्रसिद्ध असल्यासारखं लिहिलंय!!

In reply to by शिल्पा ब

पियुशा Tue, 11/29/2011 - 12:33
शिल्पा तै ,कर्नाट्क वर क्लिक कर तिथे आहे गदग ;) बर झाल्ल बै प्रास ने सान्गितल ते ,नै तर मला अन शिल्पाला कळ्ल्च नसत फोलपट कशाबद्द्ल बोलतोय / बोतलेय ;)

In reply to by पियुशा

५० फक्त Tue, 11/29/2011 - 15:03
गद्ग कर्नाटकात आहे, पण सोलापुर गदग ग्रँड आहे, तिथं डोसा आणि मेदुवडा लै भारी मिळतो, पियुशा, तु हुरडा पार्टीचं नक्की कर मग मी तुला पार्टी देईन, सोलापुरात गदग ग्रँड मध्ये.

In reply to by पियुशा

५० फक्त Tue, 11/29/2011 - 18:21
''सगळयाच्या सोइनुसार ठरवा अन मग कळ्वा आम्हा'' - आम्ही हाडाचे आर्गनायझर आहोत, सग़ळ्यांना घेउन येउ अन मग तुम्ही सांगाल, अरे आमच्या शेतात यावेळी ज्वारी लावलीच नाही यावर्षी, असो आलाच आहात तर चला उसं तोडायला, आणि मग बाकी सगळे मला त्याच उसानं मारतील ' वेळ आताच सांगतो, दुसरा शनिवार रविवार ठरवा, किती लोकांची सोय होईल ते कळवा. मोठा कट्टा करु. यापुढील पत्रव्यवहार व्यनित केला तर जास्त उत्तम. उगा हा दोनोळीचा धागा खफ व्हायला नको. 'जानेवारीचा सिझन बेस्ट आहे हुरडा पार्टीकरीता '' - आमचे काका, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा असे कुणीही शेतकरी नसले तरी हुरडा जानेवारीत असतो एवढं ज्ञान आम्हाला आहे धन्स टू आमचा खादाडपणा.

निवेदिता-ताई Tue, 11/29/2011 - 13:49
डोश्यामध्ये चुरमुरे घालतात ऐकून होते..... पण जाळीदार डोसा होण्यासाठी त्यात एक मध्यम आकाराचा कांदा वाटून घालावा, डोसा जाळीदार व कुरकुरीत होतो...

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर गुरुवार, 12/08/2011 - 01:43
हया माझ्या प्रश्नाला, व्यक्तीगत संदेश पाठवूनही, काहीच उत्तर मिळाले नाही. त्यामूळे हिरमुसलो आहे. की हे कांदा प्रकरण असेच ऐकिव आहे??

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा गुरुवार, 12/08/2011 - 12:54
काका नक्की प्रमाण मलाही माहित नाही. पण मी प्रयोग करुन पाहिला दोन वाट्या तांदुळ + १ वाटी उडदाच्या डाळीच्या प्रमाणात एक लहान कांदा( भारतीय लिंबापेक्षा किंचीत मोठा.) घेतला होता. डोसे - उत्तपे एकदम मस्त झाले होते.

फोलपट Sun, 12/04/2011 - 18:27
@ज्योती - धन्यवाद. उडीद डाळ पण घालतात का? नक्की करुन बघणार. @पियुशा : गदगवरुन बराच गोन्धळ उडाला. गदगासी आता जावुन याच. ;) सोलापुर गदग नविनच कळले. आपली, शिल्पा.. :)