राम राम मंडळी,
सकाळचे साडे सात वाजलेत. सकाळची पाळी असल्यामुळे हापिसात येउन अर्धा तास झाला आहे. क्लायंटचं घडयाळ भारताच्या घडयाळाच्या साडेचार तासांनी मागे असल्यामुळे क्लायंट लोकं साखरझोपेत असतील. त्यामुळे आमच्या साखरझोपेचं जरी खोबरं झालं असलं तरी त्याचा नारळीपाक झालेला नाही.
सारं कसं शांत शांत आहे. त्यामुळे काय करावं असा प्रश्न पडला असतानाच आम्हाला बैलाचे सोनार ऑफ थॉट्स आठवले. पब्लिकने भरभरुन प्रतिसाद देउनही परीक्षक मिळत नव्हते. त्याच धाग्यावर आवाहन करुनही परीक्षक मिळेनात. अगदी स्पर्धकांना तुम्हीच परीक्षक शोधा अशी गळ घालून झाली. परंतू त्याचाही काही उपयोग झाला नाही.
आणि अचानक नाशिकनिवासी प. पू. पाभेमहाराज सातपूर यमायडीशीकर यांनी गैरसमजातून आम्हाला आम्ही न केलेल्या पापास दोषी धरले. आम्हास अत्यंत क्लेष झाले. परंतू या क्लेषातून आम्ही सावरलो आणि त्यांच्या तंगडया त्यांच्याच गळ्यात टाकण्याचा निर्णय घेतला. तांत्रिकदृष्ट्या त्यांची कविता स्पर्धेत नसल्यामुळे आम्ही त्यांनाच परीक्षक होण्याचे आवाहन केले. आणि काय आश्चर्य... महाराजांनी एक नितांत सुंदर प्रतिसाद त्या धाग्यावर दिला. सार्याच कविता छान असल्यामुळे त्यांनी दहा कविता एक ते दहा या क्रमाने चिकटवून त्यातली कुठली तरी एक कविता रँडमली निवडावी असे सुचवले. आणि हे जालावर करण्यासाठीचा पर्यायही सुचवला.
... आणि ते सत्कार्य आम्ही आज करुन टाकले. खाली चित्र चिकटवले आहे."सिक्रेट", "यु कॅन विन" वगैरे पुस्तके आम्ही वाचली होती खरी. पण त्यामध्ये मांडलेल्या विचारांवर आमचा कधीच विश्वास बसला नाही. म्हणे तुमची ईच्छाशक्ती असेल तर काहीही अप्राप्य नाही. आम्ही तर "च्यायला आम्ही उदया म्हणू की आमची विल पॉवर स्ट्राँग आहे आणि रंभा, उर्वशी, मेनका यापैकी ज्या कुठल्या अप्सरेकडे फ्री बँडविड्थ आहे ती अप्सरा आता या क्षणी आमच्या समोर यायला हवी. असं होईल का बोला." अशा शब्दांत खिल्ली उडवत असु.
पण या निकालाने आमचे डोळे खाडकन उघडले आहेत. चक्क रेवती आज्जींचीच कविता पहिल्या क्रमांकावर आहे. येस, यू कॅन विन... इफ यू थिंक सो !!!
रेवती आज्जींचे अभिनंदन !!!!
तर मंडळी, आम्ही स्पर्धा सुरु करताना "बाकी शुन्य" हे पुस्तक उपलब्ध असल्यास बक्षिस म्हणून देण्यात येईल असे म्हटले होते. परंतू हे पुस्तक आउट ऑफ प्रिंट असल्यामुळे आम्ही याच धाग्यावर दिलेल्या प्रतिसादानुसार विजेत्याला हवे असलेले पुस्तक देण्यात येईल. ते पुस्तक रेवती आज्जींपर्यंत कसे पाठवायचे हा पुढचा प्रश्न आहे. तुर्तास रेवती आज्जींनी कुठले पुस्तक हवे ते प्रतिसादात सांगावे.
असो. पुन्हा एकदा रेवती आज्जींचे अभिनंदन करुन मी माझे दोन शब्द संपवतो.
जय आळंदी जय ज्ञानेश्वरी !!!
रेवती आज्जींचे अभिनंदन !!!!
तर मंडळी, आम्ही स्पर्धा सुरु करताना "बाकी शुन्य" हे पुस्तक उपलब्ध असल्यास बक्षिस म्हणून देण्यात येईल असे म्हटले होते. परंतू हे पुस्तक आउट ऑफ प्रिंट असल्यामुळे आम्ही याच धाग्यावर दिलेल्या प्रतिसादानुसार विजेत्याला हवे असलेले पुस्तक देण्यात येईल. ते पुस्तक रेवती आज्जींपर्यंत कसे पाठवायचे हा पुढचा प्रश्न आहे. तुर्तास रेवती आज्जींनी कुठले पुस्तक हवे ते प्रतिसादात सांगावे.
असो. पुन्हा एकदा रेवती आज्जींचे अभिनंदन करुन मी माझे दोन शब्द संपवतो.
जय आळंदी जय ज्ञानेश्वरी !!!
वाचने
5781
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
रेवती आज्जेचे हार्दिक
!!! हबिणंदन !!!
काय म्हणता धनाजीराव! माझा
रेवेती तै,
In reply to काय म्हणता धनाजीराव! माझा by रेवती
चला, आयोजक कामाला लागले तर!
In reply to रेवेती तै, by किसन शिंदे
अरे, तुम्ही सगळे माझा
In reply to चला, आयोजक कामाला लागले तर! by अन्या दातार
म्या तर नाय बोल्लो बाबा. माझी
In reply to अरे, तुम्ही सगळे माझा by रेवती
रेवती तै अभिनंदन!!
In reply to काय म्हणता धनाजीराव! माझा by रेवती
(स्पर्धेचा मुळ धागा येथे
मालक, आमच्याकडूनही हा प्रकार
In reply to (स्पर्धेचा मुळ धागा येथे by पाषाणभेद
>>> मालक, आमच्याकडूनही हा
In reply to मालक, आमच्याकडूनही हा प्रकार by धन्या
पाभे, त्या धाग्यावर मी
In reply to (स्पर्धेचा मुळ धागा येथे by पाषाणभेद
जर आयोजकांची तयारी असेल तर मग
In reply to पाभे, त्या धाग्यावर मी by वपाडाव
हम्म्म
In reply to जर आयोजकांची तयारी असेल तर मग by धन्या
हाबिणंदण
डिसेंबरात पुण्याला जाणार आहेस
In reply to हाबिणंदण by पैसा
अर्थात रेवतीला!
In reply to डिसेंबरात पुण्याला जाणार आहेस by धन्या
ध. वा., ही सगळी गंमत
In reply to डिसेंबरात पुण्याला जाणार आहेस by धन्या
रेवतीज्जी
In reply to ध. वा., ही सगळी गंमत by रेवती
रेवती अभिनंदन.
अभिनंदन... रेवतीताई,
अहो गवि, आपल्याकडं सरपंच
In reply to अभिनंदन... रेवतीताई, by गवि
लई भारी, रेवतीतै अभिनंदन.
'ज्ञानदेवे रचिला पाया तुका
In reply to लई भारी, रेवतीतै अभिनंदन. by ५० फक्त
धन्यवाद मंडळी! धमकी दिल्यावर