आठवू नये असा पराभव....

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in क्रिडा जगत
26 Nov 2011 - 5:50 pm

आठवू नये असा पराभव....
मुंबई, क्रिकेट पंढरीत...
पश्चिम इंडीजच्या वीरांनी इंडियन संघाला रडवत रडवत हरवले...
टेक्निकली ड्रॉ झाली तरी कसोटीत आपण जिंकलो नाही म्हणून हारलो...
पहिल्याडावातील धावांचा ढीग... हुकलेली शतके...
त्यात २६ / ११ च्या भीषण मुंबई कांडाचे सावट.... क्रॉफर्ड मार्केटपाशी घडलेले जळीत...
२ धावांचा पराभव ... आठवू नये असा आजचा दिवस... २६ नोव्हेंबर २०११...

क्रिकेट

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

26 Nov 2011 - 6:02 pm | विनायक प्रभू

२६/११, आग आणि क्रिकेट मधील सो कॉल्ड पराभव एकाच तागडीत?

सुहास झेले's picture

26 Nov 2011 - 6:18 pm | सुहास झेले

कैच्याकै....

चिंतामणी's picture

26 Nov 2011 - 6:23 pm | चिंतामणी

अती क्रिकेट बघावे कशाला.|( \( :angry:

आत्मशून्य's picture

26 Nov 2011 - 7:56 pm | आत्मशून्य

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2011 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालचा खेळ संपला तेव्हा कसोटी अनिर्णीत राहील असे वाटले होते. आणि कसोटी अनिर्णीतही राहीलीही.
पण आपण नेहमीप्रमाणे जिंकता जिंकता सामना अनिर्णीत ठेवला. जिंकण्याची सर्वात चांगली संधी आजच्या सामन्यात आपल्याला होती. पण क्षणाक्षणाला सामना रंग दाखवत गेला. एक क्षण असे वाटायला लागले की, आपला आता पराभव होतो. एकदा वाटायला लागले की आपला विजय सहज आहे. पण मजा आली. कसोटी क्रिकेट रंगतदार होईल असे वाटत नसते. पण काही क्रिकेट कसोटी सामने मजा आणतात. दोन दिवसापूर्वी आफ्रिकी आणि ऑष्ट्रेलियाचा सामना असाच रंगतदार झाला. आजचा सामना असाच होता. पण, आज खर्‍या अर्थाने जिंकले ते विंडीज.

आपण जिंकु शकलो नाही त्याची माझी कारणे अशी :

१) सेहवागचा बेजवाबदारीने मारलेला रिव्हर्स स्वीप. बॅटीच्या कडेला बॉल लागला. पण गरज नव्हतीच.
२) लक्ष्मणचा बेजवाबदार फटका. ऑफ साईडचा चेंडूला जाग्यावरुन फाईन लेगला खेळण्याचा अजब फटका.
३)अश्विनने शेवटच्या काही षटकादरम्यान ष्ट्राइक स्वतःकडे ठेवायला पाहिजे होते.
४)तीन षटकात तीन खेळाडू बाकी होते आणि फक्त नऊ धावा हव्या होत्या. अशा वेळी टुचुटुचु खेळण्याची अवसान घातकी फलंदाजी.
५) शेवटच्या चेंडुवर मोठ्या फटक्याची गरज असतांना दुसरी धाव घेण्यासाठी अश्विन पिसाळलेला कुत्रा मागे लागला आहे, असे समजून धावला असता तर दुसरी धाव पूर्ण करुन विजय मिळवला असता. पण क्रिकेटमधे जर तरला तसंही काही महत्त्व नसतं.

असो, कसोटी क्रिकेटने मजा आणली.

-दिलीप बिरुटे

शेखर काळे's picture

27 Nov 2011 - 2:07 pm | शेखर काळे

पराभव ? अनिर्णित सामना जिंकू शकलो नाही म्हणून ?
आणि एक साधा खेळ आणि २६/११ चा भीषण हल्ला या दोन गोष्टी एकाच मापाने कशा तोलू शकता येतात?

शशिकांत ओक's picture

28 Oct 2021 - 11:28 am | शशिकांत ओक

रविवार २४ ऑक्टोबर २०२१ ची टी२० स्पर्धेतील पाकिस्तान भारत लढत
पहिल्या ओव्हरमधे रोहित शर्मा आणि के एल राहूलची दांडी गुल झाली... खेळाचे तंत्र बिघडले ते बिघडले... पंड्या आला न खांदा चोळत परतला... गोरटेल्या शाहीन आफ्रीदीने विराटला खाकोटीला मारले... १५१ मधे संपला डाव...
नाबाद १५२ रन्स काढून भारतीय गोलंदाजीची पिसे काढली... आणि १० विकेट्सनी भारताचा दारुण पराभर झाला खरा...