साहित्य व तयारी : चिकन करी:
५०० ग्राम चिकन साफ करुन तुकडे करुन घेणे.
त्याला २ टेस्पून आले+लसुण+ हिरवी मिरची+ कोथिंबीर पेस्ट, १/२ चमचा हळद, १-१/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा गरम-मसाला, १ चमचा धणे पावडर आणी २ टेस्पून दही लावून १ तास मॅरीनेट करून ठेवणे.
दिड कांदा उभा चिरून घेणे
३-४ लसुण पाकळ्या चिरून घेणे
३-४ टेस्पून सुके खोबरे
४ लवंगा
एका नॉन- स्टीक पॅनमध्ये १ चमचा तेल तापवून लवंगा, लसूण व चिरलेला कांदा परतून घ्यावा.
कांदा परतल्यावर त्यात सुके खोबरे घालून खमंग परतणे. मिश्रण गार झाले की मिक्सरमधून थोडेच पाणी घालून वाटून घ्यावे.
मॅरीनेट केलेले चिकन
तयार केलेले वाटप
१ मध्यम टोमॅटो बारीक चिरून घेणे
१ टेस्पून आले+लसुण पेस्ट
१ टीस्पून हळद
२-३ टीस्पून लाल-तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
१-१/२ टीस्पून बेडेकर संडे मसाला
२ टीस्पून धणे पावडर
१-१/२ गरम-मसाला
मीठ चवीनुसार
तेल
पा़कृ:
एका भांड्यात तेल तापवून त्यावर आले+लसुण पेस्ट नीट परतणे.
आले+लसणाचा कच्चा वास गेल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परतावा.
त्यात तयार केलेले कांदा-खोबर्याचे वाटप घालून चांगले परतावे. त्यात हळद, लाल-तिखट, धणे पावडर, गरम-मसाला, बेडेकर संडे मसाला व मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
आता त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालणे व रस्सा किती हवे ताप्रमाणे पाणी घालणे.
झाकण लावून मध्यम आचेवर चिकन शिजवावे. चिकन शिजले की वरून बटर सोडून नीट एकत्र करावे.
चिकन करी तयार :)
साहित्य आणी तयारी: स्पंज डोसा:
२ वाटया उकडे तांदूळ
१/४ वाटी मध्यम पोहे
३-४ वाटया आंबट ताक
वरील सर्व साहित्य एकत्र करुन ७-८ तास भिजु ध्यावे.
पाकृ:
वरील तांदुळ्-पोह्याचे मिश्रण मिक्सरमधून थोडे-थोडे पाणी घालून बारीक वाटून घेणे. (नेहेमीच्या डोश्याच्या पीठापेक्षा जरा जाड वाटले गेले पाहिजे.)
वाटलेले मिश्रण तुम्ही आंबवण्यासाठी ठेवू शकता म्हणजे पीठ फुगून दुप्पट होईल, पण इथे थंडीत पीठ आंबवणे कठीण जात असल्यामुळे मी पीठ लगेच वाटून त्यात चवीपुरते मीठ व १/४ चमचा खायचा सोडा घातला व एकत्र केले. तुम्ही सोड्या ऐवजी ईनो फ्रुट सॉल्ट ही घालून शकता.
नॉन-स्टीक तव्यावर १ चमचा तेल तापवून त्यावर डावाने हा डोसा घालावा, जरा जाडसरच ठेवावा म्हण्जे छान जाळी पडते. (नेहेमीचा डोसा बनवतो तसा डावाने पसरवायचा नाही)
झाकून मध्यम आचेवर शिजु ध्यावा.
गरमा-गरम स्पंज डोसा तयार आहे. तुम्ही हा कोणत्याही चटणीसोबत सर्व्ह करु शकता. मी हा चिकन करीसोबत सर्व्ह केला आहे :)
वाचने
16712
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
खल्लास !
चला आता इथे बेडेकर संडे मसाला
In reply to खल्लास ! by परिकथेतील राजकुमार
+ १
In reply to खल्लास ! by परिकथेतील राजकुमार
अखंड डोसा
In reply to खल्लास ! by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to अखंड डोसा by चित्रा
झक्कासच आहे एकदम चिकनकरी अन
_/\_ _/\_ _/\_
कूल.
छानच!
हं
In reply to छानच! by स्मिता.
हं...
In reply to हं by श्रावण मोडक
हं
In reply to हं... by स्मिता.
हं
In reply to हं by श्रावण मोडक
चिकन करीची पाकृ छान
ही पाकृ म्हणजे करीना कपूर!
का जीव घेता??
अप्रतिम... आता लगेच तांदुळ
छान आहे
याबरोबर चालेलशी एखादी
रेवती, ह्या सोबत काळ्या
In reply to याबरोबर चालेलशी एखादी by रेवती
चांगली लागेल की! पण काळे
In reply to रेवती, ह्या सोबत काळ्या by Mrunalini
ह्या घ्या पाकृ
In reply to चांगली लागेल की! पण काळे by रेवती
धन्यवाद चिंतुकाका! आधी शिकते
In reply to ह्या घ्या पाकृ by चिंतामणी
खल्लास. मार डाला.
मस्त
कस काय जमत बाई हे तुला
खल्लास..
चिंतुकाकांनी दिलेल्या दोन
In reply to खल्लास.. by प्रभाकर पेठकर
काळ्या वाटाण्याची उसळ.
In reply to चिंतुकाकांनी दिलेल्या दोन by रेवती
फक्कड!
In reply to काळ्या वाटाण्याची उसळ. by प्रभाकर पेठकर
अगदी..
In reply to फक्कड! by पैसा
प्रभाकर- वाह वा.
In reply to काळ्या वाटाण्याची उसळ. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to प्रभाकर- वाह वा. by चिंतामणी
व्वा!!
In reply to काळ्या वाटाण्याची उसळ. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद पेठकरकाका! लगेचच काळे
In reply to काळ्या वाटाण्याची उसळ. by प्रभाकर पेठकर
तुमच्या कृतीप्रमाणे डोसे आणि
In reply to काळ्या वाटाण्याची उसळ. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाका, तुम्ही दिलेल्या
In reply to काळ्या वाटाण्याची उसळ. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद..
In reply to पेठकरकाका, तुम्ही दिलेल्या by रेवती
अगदी अगदी!
In reply to धन्यवाद.. by प्रभाकर पेठकर
खल्लास !
In reply to पेठकरकाका, तुम्ही दिलेल्या by रेवती
प्र.का.टा.आ.
In reply to पेठकरकाका, तुम्ही दिलेल्या by रेवती
फोटू एकदम खंगरी आलाय.मीही आज
In reply to पेठकरकाका, तुम्ही दिलेल्या by रेवती
छे !
In reply to फोटू एकदम खंगरी आलाय.मीही आज by गणपा
नशीबवान आहात. मला दिसतोय आणि
In reply to छे ! by परिकथेतील राजकुमार
दिसत नाहीये
In reply to छे ! by परिकथेतील राजकुमार
रेवती आणी गणपाभौ फोटू एकदम
In reply to फोटू एकदम खंगरी आलाय.मीही आज by गणपा
अत्याचार
In reply to फोटू एकदम खंगरी आलाय.मीही आज by गणपा
मस्तच! मी ही उसळ केल्यानंतर
In reply to फोटू एकदम खंगरी आलाय.मीही आज by गणपा
सहिच!
In reply to पेठकरकाका, तुम्ही दिलेल्या by रेवती
धन्यवाद पेठकर काका
In reply to खल्लास.. by प्रभाकर पेठकर
जरूर करून पाहा.
In reply to धन्यवाद पेठकर काका by सानिकास्वप्निल
सानिका, मस्त पाकृ. थंडी वाढली
रेवती (ताई/काकू), इकडे
इंडियन ग्रोसरीत मिळाले. मलाही
In reply to रेवती (ताई/काकू), इकडे by दिपाली पाटिल
मूळ पाकृ आणि पेठकरकाकांची
वा झक्कास.