व्याडेश्वराच्या मंदिरा बाबत फक्त ऐकुन होतो,पण कधी दर्शनाचा योग येईल असे वाटले नव्हते.मंदिर पाहुनच फार प्रसन्न वाटले.
देवळाच आत गेलो...शांत आणि एक प्रकारचा वेगळाच गारवा अनुभवायला मिळाला.
व्याडेश्वराचे शांतपणे दर्शन घेतले.
परशुरामचे शिष्य व्याड मुनींनी स्थापना करुन त्यावर वाडा बांधला म्हणून व्याडेश्वर किंवा वाड म्हणजे तबेल्याजवळ हे लिंग सापडले म्हणून त्याला व्याडेश्वर नाव पडले, अशा आख्यायिका या देवळा संदर्भात ऐकायला मिळतात.
समोर धष्ट पुष्ट नंदी महाराज विराजमान झाले होते,त्याच्या गळ्यातील घंटा अतिशय सुरेख दिसत होत्या...पण त्या ऑइलपेंट नी रंगवलेल्या होत्या ! :( का इतक्या सुंदर शिल्पाची सुंदरता रंग फासुन का नष्ट करतात? ते अजुन मला कळत नाही !
ही आहे देवळाची मागची बाजु.
कोकणातल्या देवळांमधे देव पंचायतन हा प्रकार पहायला मिळतो...मंदिराच्या आवारात श्री सूर्यनारायण,श्री गणपती,श्री देवी,श्री लक्ष्मीनारायण,आणि श्री व्याडेश्वर अशी पांच मंदिरे आहेत याला शिवपंचायन म्हणतात.
यातलेच हे श्री सूर्यनारायणाचे मंदिर.
श्री सूर्यनारायण,यांनाही ऑइलपेंटनी सजवुन ठेवण्यात आलेले दिसले.
श्री देवी, यांचीही अवस्था पेंटमयच !
श्री गणपती.
एव्हढी रंगरंगोटी पाहुन लक्ष्मीनारायण पहिले,पण फोटो टिपायची इच्छा मेली ! :(
दीपमाळ.सिमेंटच्या दीपमाळे पेक्षा दगडांनी बांधलेली दीपमाळ मला जास्त भावते.
पुढच्या भागात श्री व्याडेशवरी (दुर्गा देवी) दर्शन पहायला मिळेल.
(हौशी फोटोग्राफर) :)
मदनबाण.....| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
17002
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मागच्या लेखात गुहागरला
अवांतरः व्याडेश्वर मंदिराच्या
In reply to मागच्या लेखात गुहागरला by अन्या दातार
मस्त फटु रे बाणा!
धन्यवाद रे!
आम्हा कोकणातल्या बापट लोकांची
In reply to धन्यवाद रे! by पैसा
धन्यवाद!
In reply to आम्हा कोकणातल्या बापट लोकांची by मदनबाण
कल्पना नाही
In reply to धन्यवाद रे! by पैसा
बरोबर
In reply to कल्पना नाही by चित्रा
एकविरा देवी...
In reply to कल्पना नाही by चित्रा
बरोबर
In reply to एकविरा देवी... by प्रभाकर पेठकर
भरपूर आहेत.
In reply to बरोबर by चित्रा
मस्त रे बाणा.
मस्त फोटो रे पुन्हा एकदा
आनदो ऑर भी मामु
फोटू आवडले.रंगरंगोटीचं फारसं
सहमत...
लाल फुल
इथे लाल फुले शंकराला वाहिलेली
वाहव्वा...छान रे बाणा...
महादेवाला लाल फुले??
कोणि या बद्दल माहिति देउ शकेल