✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमच्या या कल्पनेबद्दल काय वाटते?

अ
अंबाजोगाईकर यांनी
Fri, 11/25/2011 - 23:38  ·  लेख
लेख
आम्ही काही मित्र मिळुन एक मराठी मोबईल मॅगझिन सुरु करन्याच्या विचारात आहोत. पण आम्ही थोडे साशंक आहोत याला प्रतिसाद कसा मिळेल. म्हणुन आम्ही मिपा करांना याविषयी काय वाटते हे जाणुन घेणार आहोत. तर मग आपल्याला आमच्या या कल्पनेबद्दल काय वाटते? आपल्या मताची आणि सुचनांची आम्ही वाट पाहत आहोत. लवकर रिप्लाय द्या. आम्हाला या आधि मोबईल कंटेंट डाउनलोअडींग साइट्स् चा अनुभव आहे. कामापुरती PHP, CSS, xHTML येते. तर मग मिपा करांचा आणि मराठी ब्लॉगर लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय यावर आम्हि पुढिल कार्यक्रम ठरवू. वि.सु. आमचे शुध्धलेखन बरे नाही ते आम्ही सुधराण्याचा प्रयत्न करत आहोत आणी आमच्या बीडच्या (अगा बाबो) मराठी चा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जाइल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6194 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

कल्पना छान आहे.

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/25/2011 - 23:41 नवीन
कल्पना छान आहे.
  • Log in or register to post comments

कंटेंट चांगला असेल तर

अन्या दातार
Fri, 11/25/2011 - 23:48 नवीन
कंटेंट चांगला असेल तर कुठल्याही कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. (मराठी मोबईल मॅगझिन म्हणजे मोबाईलवरुन वाचता येण्याजोगे प्रकाशन असे गृहित धरले आहे) >>आमचे शुध्धलेखन बरे नाही ते आम्ही सुधराण्याचा प्रयत्न करत आहोत हे आधीच डिक्लेअर केलेत ते बरे झाले. ;) >>आमच्या बीडच्या (अगा बाबो) मराठी चा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जाइल. असे करु नका. जर लोकांना बीडची बोलीभाषा कळूदेत. मग भले सुद्दलेखनाला फाट्यावर का मारायला लागेना. :)
  • Log in or register to post comments

आपले गृहितक बरोबर आहे.

अंबाजोगाईकर
Fri, 11/25/2011 - 23:52 नवीन
आपले गृहितक बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/25/2011 - 23:49 नवीन
हे पहा काय असेल ते सुरु करा. ते किती उपयोगाचे आहे, आणि नाही त्याबद्दल आम्ही प्रतिक्रिया कळवूच. तेव्हा अंबाजोगईकर आपल्यालाला मनःपूर्वक शुभेच्छा. >>>> आमचे शुध्धलेखन बरे नाही इथं कोणाचंच शुद्धलेखन बरं नाही. काळजी करु नये. बिंधास्त लिहा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

दादा कोंडके
Sat, 11/26/2011 - 00:22 नवीन
उपक्रमास शुभेच्छा! असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उदाहरणार्थ

अंबाजोगाईकर
Fri, 11/25/2011 - 23:58 नवीन
http://DainikLatur.Com हे पहिले मराठी मोबाईल दैनिक आहे.
  • Log in or register to post comments

अरे व्वा.....

निवेदिता-ताई
Sat, 11/26/2011 - 17:38 नवीन
http://DainikLatur.Com हे पहिले मराठी मोबाईल दैनिक आहे. --------------------------------------------- हा छान प्रकार आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंबाजोगाईकर

पण मला एक सांगा, तुमच्यापैकी

अंबाजोगाईकर
Sat, 11/26/2011 - 00:01 नवीन
पण मला एक सांगा, तुमच्यापैकी कितीजण मोबाईल वर इंटरनेट वापरता?
  • Log in or register to post comments

मी मोबाईलवर इंटरनेट वापरतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/26/2011 - 00:16 नवीन
मोबाईलवर मी मिसळपाव, जीमेल, फेसबूक, बातम्या-बितम्या, न्युज-बीज, टीव्ही च्यायनल-बियनल, वगैरे-बिगैरे सर्व जवळजवळ मोबाईलवरच आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंबाजोगाईकर

पण मला एक सांगा, तुमच्यापैकी

यकु
Sat, 11/26/2011 - 00:17 नवीन
पण मला एक सांगा, तुमच्यापैकी कितीजण मोबाईल वर इंटरनेट वापरता?
मला नेमका हा प्रश्न तुमच्याबद्दल पडला होता.. म्हणजे तुम्ही अंबाजोगाईकर आणि बीड जिल्ह्यातले म्हणून हो.. म्हणजे तुमचा टार्गेट सबस्क्रायबर असणार बीड जिल्ह्यात (किंवा धरुन चला तुमचं मॅगझीन फार लोकप्रिय ठरलं तर अख्ख्या महाराष्ट्रात.. ) तर बीड जिल्ह्यातले किती लोक मोबाईलवर* इंटरनेट वापरतात? नंतर महाराष्ट्रातले किती जण मोबाईलवर इंटरनेट वापरतात? मुळात प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्यातले किती लोक इंटरनेट वापरतात? हे सगळे प्रश्न पडले ते तुमचं मोबाईल मॅगझिन आहे म्हणून, तुम्हाला हतप्रभ करायचं म्हणून नव्हे हे लक्षात घ्या, कारण मी सुद्धा बीड जिल्ह्यातलाच आहे. हां, बडींग पीपल्स बिझिनेस असेल तर मग काहीही विचार न करता अगदी बिन्धास्त सुरु करा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंबाजोगाईकर

यकु, अंबाजोगाईकर आपल्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/26/2011 - 00:23 नवीन
यकु, अंबाजोगाईकर आपल्या गावाकडचा दिसतो तेव्हा त्यांना उगाच प्रश्न विचारु नका. आपून फूल्ल सपोर्ट करु. काय विदा-बिदा लागेल तो (सगळा) सॉरी सर्व किंवा सर्व ती माहिती देऊ. अट फक्त येकच. जरा तुमच्या अंबा़जोगाईबद्दल आणि तेथील मुंकुंदराज, विवेकसिंदु आणि अंबेमातेबद्दल जरा ऐतिहासिक माहिती येऊ द्या. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

आता प्रा.डाँ. नी प्रश्न

यकु
Sat, 11/26/2011 - 00:33 नवीन
आता प्रा.डाँ. नी प्रश्न विचारु नका म्हणल्यावर काय म्हणायचं?? अंबेजोगाईकर, होऊ ना जाऊ द्या... जे काय होईल ते होईल तिच्यायला!! पाहून घेऊ म्हणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर बीड जिल्ह्यातले किती लोक

अंबाजोगाईकर
Sat, 11/26/2011 - 09:41 नवीन
तर बीड जिल्ह्यातले किती लोक मोबाईलवर* इंटरनेट वापरतात? मि अंबाजोगाई चा असुन देखिल गावात राहुन कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता मोबाइल वेब डेव्हलपर आहे. यावरुन अंदाज घ्या. ईकडे गेल्या २-३ वर्षामधे इंटरनेटचा (दोन्ही प्रकार) किती वढला आहे. अहो मोबाईल इंटरनेट प्लान्स ३ रु. पासुन सुरु होतात, BSNL 3G, Idea 3G सुरु झाले आहे. प्रत्येकाकडे चांगला हँडसेट आहे. आहो दस्तगिरवाडी सारख्या छोट्या खेड्यातिल ३०% तरुण मोबाईल वर इंटरनेट वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अरे वा. आनंद वाटला की कुठलेही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/26/2011 - 09:50 नवीन
अरे वा. आनंद वाटला की कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता आवडीने आपण आपला छंद जोपासला आहे. आता बीडचे किती लोक इंटरनेट वापरतात ते काही माहिती नाही. पण मोबाईलवर लोकप्रभाचे अंक वाचता येतो. न्युज हंट द्वारे सामना,सकाळ, वगैरे दैनिकं वाचताही येतात. मोबाईलवर मासिकं वाचायला मिळणे ही एक केवळ सुविधा होईल त्यात नवीन काय देणार ? यकु, प्रश्न विचारायला नाही म्हणत नाही. प्रोत्साहान देणारे प्रश्न विचारा असे म्हणायचे आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंबाजोगाईकर

मोबाईलवर मासिकं वाचायला मिळणे

अंबाजोगाईकर
Sat, 11/26/2011 - 10:56 नवीन
मोबाईलवर मासिकं वाचायला मिळणे ही एक केवळ सुविधा होईल त्यात नवीन काय देणार ? ह..... अम्हि काय नविन देवु शकतो? त्यपेक्शा आम्हि काय देउ शकणार नाहित हे सांगतो. जातिवादि लेख, फाल्तु राजकारण्यांचे गुणगाण करणारे लेख. नको त्या विषयाला गरजेपेक्षा जास्त महत्व देणारे लेख. कालबाह्य तत्वज्ञान, आणी गांधीवाद म्हणुन काहिही खपवणारे लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कल्पना चांगली आहे.

पैसा
Sat, 11/26/2011 - 00:22 नवीन
पण हेच की टार्गेट ग्रुप कोणता आहे? प्रसिद्धी कशी करणार? जाहिराती वगैरे असणार का? आणि मला वाटतं, जावा मोबाईल्स आणि अ‍ॅण्ड्रॉईड वगैरे वेगवेगळ्या सिस्टीम्सवर चालणार्‍या मोबाईल्ससाठी साईट्स एकच चालतात का? फॉण्ट्सचा प्रॉब्लेम कसा सोडवणार वगैरे बरेच प्रश्न विचारात घ्यावे लागतील नवीन कल्पनेबद्दल अभिनंदन आणि प्रकल्पाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

टार्गेट= चालता बोलता कुठेही

अंबाजोगाईकर
Sat, 11/26/2011 - 10:06 नवीन
टार्गेट= चालता बोलता कुठेही कधीहि एक बटण दाबताच वाचायला मिळावे अशी इच्छा करणारा मराठी वाचक. जाहिरात प्रसिद्धी= त्यासाठी आपण आहातच कि..... :) डिवाइसेस= सगळे ज्याच्यावर मराठी फॉन्ट सपोर्ट आहे, आणी जर नसेल तर खास मोडिफाइड ओपेरा मिनि हे मोबाइल वेब ब्राउजर आम्हि पुरवु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

टारगेटचा आर. एन. डी नसेल तर....

आत्मशून्य
Sat, 11/26/2011 - 01:01 नवीन
संकल्पना फ्लॉप जाइल. मूळातच अंतरजालावरती सगळं हे केवळ मार्केटिंगवर चालतं. कल्पकता असेल तर त्याशिवायही चालतच चालत पण, देन यो सिरीअस्लि नीड दॅट अपिल. कारण इथे किंमत केवळ संकल्पनेलाच जास्त आहे. तांत्रिक कौशल्य हा बराच गौण मूद्दा आहे. विचार करा चालूक्षणी तूम्हाला मोबाइल वर मराठी का वाचावसं वाटेल, अथवा तूमची सर्व्हीस चालू केल्यानंतर साधारण १ वर्षांनी लोकांना कोण कोनती कारणे मिळतील की ते तूमचच मोबाइल मॅगझिन वाचण जास्ति जास्त प्रेफर करू लागतील ? आणी हो जर यातून व्यवसायच करायचा असेल तर मब बिझनेस मॉड्ल हवच हव. यात जरका खरच फायदा वाटत असेल व तूमचं सर्व अचूक आहे याची खात्री होत असेल (जर तरला फारशी जागा नसेल) तर सरळ व्हि.सी. गाठा व सध्या आहे त्याच्या भव्यदीव्य स्वरूपात सर्विसचं दणक्यात लॉचींग करा, व्यावसायीक यश मिळवायचा हाच राजमार्ग आहे. (किम्बहूना व्हि.सी. फंडिगला तयार झाला यातच तूम्ही ६०% लढाइ जिंकली आहे समजा)
  • Log in or register to post comments

आम्ही पण...

कोदरकर
Sat, 11/26/2011 - 01:26 नवीन
अंब्याचेच आहोत... मोबाईल वर लोक चारोळी वाचणे पसंत करतात.. साहित्य छोटे आणि लळा लावणारे असेल तर कल्पना यशस्वी होईल.. चालु करुन द्या... जास्त जोखीम नाही यात... आपल्याला योगेश्वरी प्रसन्न आहेच.... -कोदरकर....
  • Log in or register to post comments

धन्यवाद. आपण किरण कोदरकर?

अंबाजोगाईकर
Sat, 11/26/2011 - 10:09 नवीन
धन्यवाद. आपण किरण कोदरकर? कि..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोदरकर

नवीन कल्पना.

रेवती
Sat, 11/26/2011 - 06:54 नवीन
नवीन कल्पना.
  • Log in or register to post comments

मित्रांनो आमचि एकच इच्छा आहे,

अंबाजोगाईकर
Sat, 11/26/2011 - 10:31 नवीन
मित्रांनो आमचि एकच इच्छा आहे, कि आमच्यासारख्या ग्रामिण भागातिल नवोदित लेखकांना, ज्यांना अजुन ब्लॉगींग वगैरे वेब पब्लिशींग पध्धती वापरता येत नाहित किंवा काहि काराणास्तव जमत नाहित (उदा. मराठी टायपींग येत नाही, कंप्युटर नाही) अशा सर्वांना समान संधी देणारे एक मुक्त माध्यम जे की त्याचे लेखन महाराष्ट्रातिल प्रत्येक कोपर्यापर्यंत पोहचवु शकेल. मग तो नवोदित लेखक कोनिही असो एखादा कॉलेजकवी असो कि संत वाङ्मयावर लिहिणारे एखादे रिटायर्ड शाळामास्तर असो. प्रत्येकाला आपले लेखन वाचकांपुढे ठेवण्याची संधी मिळेल.
  • Log in or register to post comments

तुमच्या या उपक्रमास शुभेच्छा,

जोशी 'ले'
Sat, 11/26/2011 - 11:31 नवीन
तुमच्या या उपक्रमास शुभेच्छा, मोबाईल मासिकाचा बेस 'न्युजहंट' aplication सारखा असावा म्हणजे fonts चा प्रोब्लेम येनार नाही व copy - pest पन करता येनार नाही
  • Log in or register to post comments

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/26/2011 - 11:31 नवीन
आमचे काही मित्र फक्त आंतरजालावरील खास खास फटू बघायला इंटरनेट वापरतात.
  • Log in or register to post comments

तुम्ही टेक्निकल गोष्टी नीट

आशु जोग
Sat, 11/26/2011 - 14:08 नवीन
तुम्ही टेक्निकल गोष्टी नीट सांभाळा बाकी भाषेची काळजी फार करू नका ! पुण्याची भाषा म्हणजे स्टँडर्ड असे मानणारे मानू देत. तुम्हाला जी भाषा नीट जमते ती वापरा. बाकी टेक्निकल गोष्टींकडेच नीट ध्यान द्यावे, तिथे कमी पडू नका म्हणजे झाले
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

चिरोटा
Sat, 11/26/2011 - 14:41 नवीन
आम्ही थोडे साशंक आहोत याला प्रतिसाद कसा मिळेल
प्रतिसाद चांगला मिळेल. मोबाईलवर मराठी वाचणार्‍यांची संख्या खूप् आहे. content कुठले निवडायचे हे कठिण काम असते.
टेक्निकल गोष्टींकडेच नीट ध्यान द्यावे,
सहमत आहे. साधारण दहापैकी नऊ startup पडतात. बर्‍याच वेळा कारण टेक्निकल असते. आपली कल्पना चांगली आहे. टेक्निकल गोष्टींत काही प्रॉब्लेम नाही आला तर मॅगझीन जोरात चालेल.
आम्हाला या आधि मोबईल कंटेंट डाउनलोअडींग साइट्स् चा अनुभव आहे
हे एक मोठे upcoming क्षेत्र आहे असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments

चिंता नको!

धमाल मुलगा
Sat, 11/26/2011 - 15:44 नवीन
बिन्धास्त उडी मारा. तसाही काही फार अवाढव्य खर्च येणार नाही. त्याबाबतची काळजी नसेल. फारतर काय होईल? अगदीच वाईटात वाईट म्हणलं तर प्रकल्प फसेल. हरकत नाही, हा अनुभव गाठीशी घेऊन त्यामधल्या चुका पुढच्या प्रकल्पात दुरुस्त करुन जास्त ताकदीने नवा प्रकल्प उभा करता येईल. आणि हा प्ल्यान चांगला चालेल असं मला तरी वाटतं. काही मदत लागलीच तर बिन्धास्त संपर्क साधा. :) मराठीचा जेवढा प्रसार करता येईल तेव्हढा करा. अवांतर: येता जाता भेटलेच तर भंडारीसरांना आमचा रामराम सांगा हो :)
  • Log in or register to post comments

अंक पाहिला. चांगला

गणपा
Sat, 11/26/2011 - 15:46 नवीन
अंक पाहिला. चांगला झालाय. प्रकल्पासाठी आमच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

कुठेय अंक ??

निवेदिता-ताई
Sat, 11/26/2011 - 17:41 नवीन
कुठेय अंक ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

ओह जे उदाहरण दिले आहे, मला

गणपा
Sat, 11/26/2011 - 21:44 नवीन
ओह जे उदाहरण दिले आहे, मला वाटले की ते त्यांचेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

ठिक ठिक ठिक... निर्णय झाला

अंबाजोगाईकर
Sat, 11/26/2011 - 20:02 नवीन
ठिक ठिक ठिक... निर्णय झाला आहे. आम्ही काम सुरु केले आहे... आता फक्त या मॅगझिन ला काय नाव द्यावे याबद्दल काही सुचवा नाव सुचवताना या गोष्टी ध्यानात घ्या १) जास्त लांब नको २) किचकट स्पेल्लिंग होईल असे नको.
  • Log in or register to post comments

काय हो

परिकथेतील राजकुमार
Mon, 11/28/2011 - 13:28 नवीन
ह्या अंकात काही 'पेज ३' वैग्रे असणार आहे का नाही ? गेला बाजार आमच्या मटा सारखी 'फटू गॅलरी' वैग्रे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंबाजोगाईकर

चांगली कल्पना

फारएन्ड
Sun, 11/27/2011 - 10:46 नवीन
शुभेच्छा! असे काही करू शकाल का - लेख, कविता वगैरे "कंटेंट" तयार असले की ते एका फॉर्म मधे वेब साईटवर व थोड्या वेगळ्या फॉर्ममधे मोबाईलवर वाचता येतील. तसे करू शकलात तर दोन्ही प्रकारचे वाचक मिळतील. वाचकांनाही फक्त मोबाईलवर वाचण्याची सक्ती राहणार नाही. मी कदाचित छोटे लेख मोबाईलवर वाचेन पण दीर्घ लेख वेबवर वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

अहो

विनोद१८
Sun, 11/27/2011 - 23:20 नवीन
अहो अम्बाजोगाईकरानो...... .........तुमच्या या उपक्रमास मझ्या १०१ शुभेच्छा.....!!!! ..चले चलो....... चले चलो..........चले चलो.......... (मोबईल् वाचक) विनोद१८
  • Log in or register to post comments

माझ्या मोबाईल ( नोकिया इ ६३ )वर चेपु वरिल मराठी नीट दिसत नाही

विटेकर
Mon, 11/28/2011 - 13:12 नवीन
माझ्या मोबाईल ( नोकिया इ ६३ )वर चेपु वरिल मराठी नीट दिसत नाही...म्हणजे कधी कधी ???? तर कधी कधी देव नागरी अक्शरे आणि काही चिन्हे अशी सरमिसळ दिसते .. अर्थबोध करता येत नाही. मात्र जी मेल वरचे मरठी अगदि व्यवस्थित वाचता येते! काय कारण असेल ? काय करावे लागेल ? - विटेकर
  • Log in or register to post comments

तसेच मिपा मोबाईलवर वाचता येते...

विटेकर
Mon, 11/28/2011 - 13:21 नवीन
काही अडचण नाही.. मिपावर मोबाईल वरुन लिहण्याचा कधी प्रयत्न केला नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

कल्पना चांगली आहे. शुभेच्छा!

ऋषिकेश
Mon, 11/28/2011 - 13:34 नवीन
कल्पना चांगली आहे. शुभेच्छा माझ्याकडून तांत्रिक मदत कितपत करता येईल साशंक आहे, मात्र लेखन जरूर पाठवेन, आवडलं तर करा प्रकाशित :)
  • Log in or register to post comments

अंबाजोगाईकर .. आम्ही किरण चे

कोदरकर
Wed, 11/30/2011 - 02:00 नवीन
अंबाजोगाईकर .. आम्ही किरण चे काका... म्हणजे.. नुस्ते नात्याने.. वयाने मित्र.... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा