http://www.misalpav.com/node/2474
आजकाल ऑफीसमध्ये मी सर्व प्राण घातक शस्त्रे माझ्यापासून लांब ठेवतो.पेन , पेन्सील, पेपर नाईफ वगैरे.पालक मंडळी भेटायला येतात.त्यांची मुक्ताफळं ऐकल्यानंतर माझ्या मनात आत्मघातकी विचार येऊ नयेत म्हणून.
मला एक पालक भेटलेआणि मला म्हणाले " मी माझ्या मुलाला न्युरॉलॉजीस्ट करणार आहे."मी दचकलो. मग एक शिरस्ता म्हणून दहावीचे मार्क विचारले.उत्तर आले "फर्स्ट क्लास." सर्वात आधी ऑफीसच्या खिडक्या बंद आहेतयाची खातरजमा करून घेतली.
सुमारे अर्धा तास फर्ड्या इंग्रजीमध्ये मानवी ब्रह्मदेवाशी चर्चा होत असताना चिरंजीव फर्स्टक्लासचे मेडल म्हणून मिळालेल्या मोबाईल वर बिझी होते. कुतुहुल म्हणून किंमत विचारली. सत्तावीसहजार रुपये. सर्व संभाषणात हे साहेब (विद्यार्थी) निर्वीकार आणि मख्ख होते. दहावीचे मार्क आणि त्याचा करीयरशीसंबंध नाही या विधानाचा विपर्यास. देवच भले करो त्या भावी न्युरॉलॉजीस्टच्या पेशंटचे.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दहावी पास चे प्रमाणपत्र मिळून नंतर आय.टी. आय. सारखे कोर्सेस करून उपजिवीका मिळण्यासाठी म्हणून परिक्षेचे केलेले पातळीकरण मला स्वताला योग्य वाटते.
७८% निकाल लागल्यानंतर कट ऑफ वर जाणार हे माहिती असताना फकत मोजक्याच टॉप कॉलेजचा प्रेफरंसचा बालीश हट्ट अनाकलनीय आहे.जास्तीतजास्त अर्ज भरून बेटरर्मेंटची वाट बघा हा पवित्रा निदान पुढच्या वर्षी पालकांनी घ्यावा आणि काळजीमुक्त व्हावे असा माझा सल्ला असेल.
अकरावी बारावीत मिळाले तर कॉलेजच्या नावापेक्षा घराजवळ असलेले अगदी ज्युनीयर कॉलेज केव्हांही चांगले.
वाचने
5168
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला विषय आहे
अनेक गोष्टी आहेत...
आकांक्षा पुढती इथे...
१० वी १२ वी चे मार्क
एकदम पटलं
अकरावी बारावीत मिळाले तर कॉलेजच्या नावापेक्षा घराजवळ असलेले....
In reply to एकदम पटलं by वरदा
संजय,
In reply to अकरावी बारावीत मिळाले तर कॉलेजच्या नावापेक्षा घराजवळ असलेले.... by संजय अभ्यंकर
अगदी खरं
In reply to संजय, by चतुरंग
'लकी ऑर स्मार्ट'
In reply to संजय, by चतुरंग
हे नुसते शिक्षणपद्धतीचे
माझ्या मते..
व्वा तात्या...
स्वतंत्र विचार करण्याची सवय ...
अरे वा मस्तच आठवण!
In reply to स्वतंत्र विचार करण्याची सवय ... by संजय अभ्यंकर