चित्रमय कोकण दर्शन (भाग १)
कोकणात जाण्याची माझी ही पहिलीच वेळ नाही...पण ट्रेन ने प्रवास करुन जाण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग होता.
मुंबई -मडगाव .मांडवी एक्स्प्रेस ने या वेळी कोकणात जाण्याचा योग आला,अगदी धावता दौरा केला...धावता केला कारण सुट्टी मिळायचे वांदे ! ;)
तर वरच्या फोटुत दिसतय, ते आहे ठाणे स्टेशन... जरा लवकरच फलाटावर येउन पोहचलो होतो, आपल्या देशात संप,रि़क्षा बंद,दंगल,ट्रॅफिक जॅम हे कधीही होउ शकते, त्यामुळे लवकर पोहचुन फलाटावर वेळ काढलेला परवडेबल वाटतं.लवकर पोहचलो... मग वेळ काही जाईना ! इस्टेशन भैयामय झालं होतं,कारण गोरखपुर एक्स्प्रेस यायची होती,ती शेवटी आली ! मगं जमेल तसा तिचा फोटु टिपला (वरचा) भैया मंडळींची ट्रेन मधे चढण्यासाठी झोंबाझोंबी सुरु झाली... हमार तोहार... बिटुवा...ठीक बा ! असे अनेक आवाज कोलाहलातुन कानावर आदळत होते...बोगीत शिरण्यासाठी २ दरवाजे असुन सुद्धा हे सर्व लोक एकाच दरवाज्याने का चढत होते ते मला काही केल्या समजेना !
ती ट्रेन शेवटी तुडंब भरुन रवाना झाली...मग परत मढगाव एक्स्प्रेसची वाट बघणे सुरु झाले... तो पर्यंत करायचे काय ? मग एका विक्रेत्या कडुन वर्तमानपत्र विकत घेतले...पण ते तिर्थरुपांच्या हातात गेले ! माझ्या हातात कॅमेरा...मग विचार केला मागच्या त्या धाग्यात (एक प्रवास लोकलचा) इथल्या काका मंडळींना गर्दी दिसली नाही ! जरा गर्दी टिपुया... (म्हणुन हा वरचा फोटो) ;)
शेवटी एकदाची आमची एक्सप्रेस आली आणि आम्ही स्थानापन्न झालो... दिव्या मार्गे हा प्रवास पुढे चालु झाला...मी या मार्गावरुन पहिल्यांदाच प्रवास करत असल्याने या मार्गाचा फोटो काढायची लहर आली...:)
प्रवास व्यवस्थीत झाला,कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही...चिपळुन स्टेशनला उतरलो तर समोरच गुहागरला जाणारी एसटी उभी होती...पटकन जाउन बसलो त्यात... आत पाहतो तर स्वामी समर्थांचे दर्शन झाले. :) मागच्या वेळी गणपतीपुळ्याला प्रवास करताना घड्याळ पहायला मिळाले होते...
बस निघाली तेव्हढ्यात जवळ असलेल्या एका मंदिरावर नजर गेली "झोलाई देवी" असे नाव दिसले ! च्यामारी मी काही चुकीचे वाचले असावे असं क्षणभर वाटलं...कारण झोल्,झोलर हे आमचे मुंबईछाप शब्द आणि देवीचे नाव काही ताळमेळ बसेना, परत वाकुन वाचले तर "झोलाई देवी" असेच लिहलेले दिसले; म्हणजे ३३ कोटी देवां मधे यांचा पण नंबर लागतो अशी माझ्या ज्ञानात भर पडली !
थोडेसे अंतर एसटी ने कापल्यावरच मला या सुंदर नदीचे दर्शन झाले...खडखडणार्या एसटी मधुन कसा बसा कॅमेरा सावरला आणि तिला टिपले...प्रवास चालु होता...छोटो मोठे थांबे घेउन एसटी धावत होती...
मग एक सुंदर शाळा दिसली..इतक्या निसर्ग रम्य शाळेत शिकणार्या विद्यार्थांच्या मला जरा हेवा वाटला... मला माझ्या शाळे बद्दल फार प्रेम आहे...शाळेतले दिवस हे आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस असतात असं माझं ठाम मत आहे.
बस धावत होती,आणि मी बाहेर दिसणार्या गोष्टी पाहत होतो...आवडते ते टिपत होतो...
त्या दिवशी शनिवारचा बाजार भरलेला दिसत होत...रस्त्यावर गर्दी असल्याने बसचा वेग जरासा कमी झाला... तेव्हढ्यात मला एक बाई विवध पदार्थ (धान्य) घेउन बसलेली दिसली.येणार्या जाणार्या ग्राहकांवर तिची व्यवस्थीत नजर होती...
गुहागरला पोहचलो...जरा पोटपुजा आटोपली आणि एसटी स्टॅडच्या अगदी जवळ असलेल्या व्याडेश्वराच्या मंदिरात प्रवेश केला...
कसा ते आता पुढच्या भागात पहा... :)
(हौशी फोटोग्राफर)
मदनबाण.....लेखनविषय:
वाचने
16973
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
वा बाणा!
In reply to वा बाणा! by पैसा
पण मुंबईहून निघताना मांडवीला
In reply to वा बाणा! by पैसा
अरे अजुन फोटो येउ देत की जरा
In reply to अरे अजुन फोटो येउ देत की जरा by पियुशा
कोकण दर्शन मुक्त हस्ताने
In reply to कोकण दर्शन मुक्त हस्ताने by मदनबाण
ठीक हे ,ठीक हे अपुन वेट
मस्त फोटो आणि झकास
अरे वा!
In reply to अरे वा! by मेघवेडा
शृंगारतलीवर आंगुली केलांव्त
मस्त आलेत रे फोटो, जमलं तर
सगळेच फोटो मस्त रे बाणा! आता
In reply to सगळेच फोटो मस्त रे बाणा! आता by यकु
ठाण्याच्या ठेसनावर उत्तरेकडे
वा, वा, छान फोटो आणि
बाणा जरा अजून फोटू येऊदेत.. -
हे फोटू सहल ष्टार्ट केल्याचे
In reply to हे फोटू सहल ष्टार्ट केल्याचे by रेवती
सध्या सगळ्यांना कोकण फिव्हर झालाय काय?
कोकणरेल्वेत सारे प्रवाशी
वाह.. अजुन येऊ द्यात
मस्त सुरवात
प्रवास चांगला सुरु केला आहे!!
मस्त रे!
निषेढ!
सुंदर.