✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

'पत्रिका'

क
किचेन यांनी
Tue, 11/22/2011 - 14:10  ·  लेख
लेख
'पत्रिका' या विषयाने जेवढ माझ डोक खालालय तेवढ कोणाच खाल्लं नसणार. खर तर पत्रिका, गुणमिलन, शांती वगैरे गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही. या सर्व विषयाबद्दल माझ न्यान्ही तोकड्च आहे.पण माझ क्षेत्र अस आहे कि मला ह्याबाबत माहिती करून घ्यावी लागतीये. यात सगळ्यात जास्त वैताग आणतो तो मंगळ मंगळ,मंगळाचा प्रभाव, सौम्य मंगळ, मंगळाची शांती, आणि नागबली बद्दल मला माहिती हवी आहे. शांती केली किवा नागबळी दिला कि मंगळ जातो का? वैवाहिक जीवनात मंगळाचे दुष्परिणाम काय? मंगळ फक्त वैवाहिक बाबतीत त्रास देतो कि आणखीनही काही दुष्परिणाम आहेत? आपणास काही मंगळाचे चांगले -वाईट अनुभव आलेत काय? (न्यान -हा शब्द कसा लिहावा?)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20274 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

अर्रर्र!

आनंदी गोपाळ
Fri, 11/25/2011 - 21:35 नवीन
डॉक्टरांनी त्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत नीट पोहोचवलं नाही, किंवा तुमची गफलत झाली ऐकताना.
इंजेक्शन दिले नाही तर, 'भविष्यातील गरोदरपणात बाळाच्या आईच्या जीवास धोका संभवतो'
असे सांगितले असेल, किंवा सांगवयास हवे होते. किंवा ऐकावयास हवे होते. असो. जे झाले ते झाले, पण चिरंजीवांना भावंडं असण्याची तुमची इच्छा असून ते केवळ या कारणास्तव झाले नाही, असे असेल- तर वाईट वाटले. (आधीच ठरवून एकाच कन्यारत्नाचा बाप असल्यामुळे आनंदी) गोपाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

न्यानात भर

वपाडाव
गुरुवार, 11/24/2011 - 15:46 नवीन
छान माहिती..... योग्य प्रकारे संकलित करुन दिल्याने वाचताना भिरभिर न होता थेट पोचल्या गेली आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

प्रकाटाआ

वपाडाव
गुरुवार, 11/24/2011 - 16:35 नवीन
--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

प्रकाटाआ

वपाडाव
गुरुवार, 11/24/2011 - 16:36 नवीन
टिब्बल झाल्यामुळे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

याचा अर्थ आईने +ve रहाणे कित्ती महत्वाचे आहे !

वाहीदा
गुरुवार, 11/24/2011 - 15:54 नवीन
जर आई +ve बाप -ve, अडचण नाही. पण जर स्त्री -ve व पुरुष +ve असेल तर प्रॉब्लेम येतो याचा अर्थ आईने बाळासाठी +ve रहाणे कित्ती महत्वाचे आहे ! (विचारात हि अन रक्तातही ....) असो, अतिशय महत्वाची माहीती साठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

:)

मन१
गुरुवार, 11/24/2011 - 22:36 नवीन
आणि आनंदीबाई अन् गोपाळरावांचा प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

माझ्या मावशीचा रक्तगट -ve

शिल्पा नाईक
गुरुवार, 11/24/2011 - 16:11 नवीन
माझ्या मावशीचा रक्तगट -ve होता. तीने दोन्ही बाळंतपणात ते injection घेतलं होत. ते कसलं होत ते तुमच्या मुळे कळल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

साध्या सोप्या भाषेत शब्दबद्ध

गणपा
गुरुवार, 11/24/2011 - 16:24 नवीन
साध्या सोप्या भाषेत शब्दबद्ध केलेली माहिती आवडली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अतिशय उत्तम माहिती अतिशय

मृत्युन्जय
Sat, 12/03/2011 - 11:03 नवीन
अतिशय उत्तम माहिती अतिशय साध्या सोप्या शब्दात करुन दिल्याबद्दल धन्यवाद. गचाळ धाग्यांवर सुद्धा उत्तम प्रतिसाद येउ शकतात त्यामुळे सगळेच धागे वाचावे असे वाटु लागले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

य्ये बात!

स्मिता.
Tue, 11/22/2011 - 17:02 नवीन
विशाखा, प्रतिसाद फार आवडला. आज काय पिवून ऑफिसला आलियेस? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

कडक चहा

विशाखा राऊत
Tue, 11/22/2011 - 17:07 नवीन
साधा सोप्पा कडक चहा.. ५ मिनीटात होणारा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

आँ?

स्मिता.
Tue, 11/22/2011 - 17:56 नवीन
आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

नाडी बघत जावा

शाहिर
Tue, 11/22/2011 - 16:24 नवीन
मुला-मुलींची नाडी बघा ..
  • Log in or register to post comments

माझ पण अगदी हेच म्हणन आहे.काय

किचेन
Tue, 11/22/2011 - 16:30 नवीन
माझ पण अगदी हेच म्हणन आहे.काय आहे माझा पत्रिकेवर विश्वास नाही.मी स्वतःच्या लग्नातही पत्रिका बघितली नव्हती.त्यामुळे या बाबतीत मी अगदी अडाणी!तर लोक महा हुशार! त्यामुळेच हा मंगळ काही मंगलमय होत नाहीये! इथे काही माहिते मिळेल अस वाटल पण इथे सगळ्यांना 'शुक्राच चांदण' आवडतंय!;)
  • Log in or register to post comments

आरारा ... जरा धागे चाळुन बघा

शाहिर
Tue, 11/22/2011 - 17:08 नवीन
नाडीचा मिसळ-पावीय ( व्वा !! काय शब्द आहे ...) अर्थ वेगळा आहे हो .
  • Log in or register to post comments

नाडीला ban केलाय न मिपावर?

किचेन
Tue, 11/22/2011 - 17:54 नवीन
नाडीला ban केलाय न मिपावर? ऐकून होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

बाकी, मंगळ बिंगळ काय नसतं हो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/22/2011 - 18:41 नवीन
बाकी, मंगळ बिंगळ काय नसतं हे वर अनेकांनी प्रतिसादात सांगितले आहेच. दोन इच्छुकांचा स्वभाव जमला आणि आयुष्यात तडजोड जमली की पुरे झालं. देवाच्या नंतर केवळ यांच्याच पत्रिका उत्तम जुळल्या आहेत असे अनेक वधु-वर सापडतील पण त्यांचेही जगणे इतरांप्रमाणेच असते, ग्रहाब्रिहामुळे वेगळे घडते असे काही नसते. पण कुटुंब म्हटले की इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. काही वाईट घडलं की आपण ग्रह तार्‍यांवर भार टाकून मोकळे होतो, यातली एकही गोष्ट काही खरी नसते हे तुमच्याकडे येणार्‍या वर-वधु पित्यांना आणखी चांगल्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगितले तर मंगळवाल्यांच्या पत्रिका सहज जुळतील. बाकी, ’मंगली दोष और उसके उपाय’शोधायचा आदेश गुगलबाबाला दिल्यावर त्यांनी ही माहिती दिली. :) आपले जेष्ठ मिपाकर श्री प्रकाश घाटपांडे यांनी ”ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी..प्रश्नोत्तरातून् सुसंवाद” आणि ’ यंदा कर्तव्य आहे’ असं पुस्तक लिहिल्याची आठवण आहे, ते पुस्तक मिळतं का बघा. आमचा एक जालमित्र म्हणायचा चिखला मातीचे गोळे म्हणजे ग्रह ते आपले काय करणार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मुला

चिरोटा
Tue, 11/22/2011 - 18:52 नवीन
मुला-मुलीला एकमेकांची नाडी ओळखता आली की बास्स. पण मंगळ असणार्‍या मुलाचे मंगळ असणार्‍या मुलीशीच लावून द्यावे असे अनेक वेळा वाचले आहे. मंगळ 'कडक' असल्यामुळे तसे झाले नाही तर वधु/वर पक्षातील जवळच्या व्यक्तीचा मंगळ गेम करतो असेही ऐकले आहे.
  • Log in or register to post comments

कर्तव्य

प्रकाश घाटपांडे
Tue, 11/22/2011 - 18:56 नवीन
कीचेन ताई/ माई/ अक्का आपण यंदा कर्तव्य आहे हे मिपा वरील भाग वाचावेत
  • Log in or register to post comments

आवशीचो घोव!

धमाल मुलगा
Tue, 11/22/2011 - 20:04 नवीन
काय शॉल्लेट दंगा घातलाय पब्लिकनं. नुसतं आपलं धर की आपट्..धर की आपट! लै लै मज्जा! :D पण एक लफडं कोणी लक्षातच घेतच नाहीए असं दिसतंय. किचेन ह्यांनी स्वतःचा पत्रिकेवर वगैरे विश्वास नाही हे स्पष्ट केलं आहेच. त्यांच्या व्यवसायाचा भाग म्हणून एखादं चांगलं स्थळ दुसर्‍या स्थळाशी अनुरुप असूनही केवळ काही खर्‍या/खोट्या समजुतींपायी नाकारलं जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करणं हा असणारच की. आता, त्या काही प्रत्येक जोडीच्या पत्रीका घेऊन ज्योतिषांकडे हिंडू शकणं अव्यवहार्य दिसतं. तर मग, लोकांचं सर्वसाधारण शंकानिरसन करण्यासाठी त्यापैकी काही गोष्टींची माहिती करुन घेण्यासाठी त्या इथे मदत मागत आहेत असं दिसतंय. ज्याआधारे त्यांना 'प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स' शी योग्य रितीने डिल करता येईल. नो बिग डिल भाईलोक्स... किचेन, तुम्ही प्रकाश घाटपांडे ह्यांच्याशी बोला ह्याविषयावर. पकाकाकांचा पत्रिकेमुळं अडणारी लग्नं जुळवुन देण्यात हातखंडा आहे. :)
  • Log in or register to post comments

किचेन ह्यांनी स्वतःचा

रेवती
Tue, 11/22/2011 - 21:56 नवीन
किचेन ह्यांनी स्वतःचा पत्रिकेवर वगैरे विश्वास नाही हे स्पष्ट केलं आहेच. मला हेच म्हणायचय. किचेनबैंचं स्वत:चं लग्न त्यांनी फक्त अनुरूपता पाहून केलय पण त्यांच्या कामाचं स्वरूप असं आहे की ही माहिती असणं जरूरीचं वाटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

खरे आहे

विशाखा राऊत
Tue, 11/22/2011 - 21:59 नवीन
तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे पण ताईंनीच दंगा घालायला सुरवात केली, मंगळापेक्षा लोकांना शुक्र आवडतो बोलल्या मग काय करणार... अब बोला तो सुनना तो पडेगा ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

इनो

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/23/2011 - 11:19 नवीन
मंगळापेक्षा लोकांना शुक्र आवडतो बोलल्या मग काय करणार...
इनो द्यायचे ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

इनोने शुक्रावर फरक पडेल अस

किचेन
Wed, 11/23/2011 - 22:39 नवीन
इनोने शुक्रावर फरक पडेल अस खरच वाटत तूम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ...अहो रेवतीआज्जी, या

शिल्पा ब
Wed, 11/23/2011 - 11:24 नवीन
हॅ हॅ हॅ...अहो रेवतीआज्जी, या कीचेनतै खरोखर तै आहेत का, खरोखरंच त्या लग्न जमवायचा व्यवसाय करतात का? का एखादा नविन झगा घालुन इथं कोणी मिरवतंय हे कसं कळणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/23/2011 - 11:45 नवीन
प्वाईंटाचा मुद्दा आहे. शिनचॅन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मि नविन प्लेट्मधिल शिळि मिसळ

किचेन
Wed, 11/23/2011 - 22:45 नवीन
मि नविन प्लेट्मधिल शिळि मिसळ आहे अस इथे अनेकंना वाटतय. का कळेल का? ;?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ष्ट्यांडर्ड सवय

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/24/2011 - 13:46 नवीन
ष्ट्यांडर्ड सवय आहे ती. नवा कुणी येऊन बोलू लिहू शकतो यावर यांचा बसतच नाही. मग फुक्काट टोपी उडवणे सुरू होते. तुम्ही आपलं काम चालू द्या. त्यांचा इस्वास बसत नै तर र्‍हाऊ देत हुबा! तुम्ही टेन्शन घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

व्वाह !! व्वाह !! म्हणजे

वपाडाव
गुरुवार, 11/24/2011 - 13:50 नवीन
व्वाह !! व्वाह !! म्हणजे आपणही याच क्याटेगिरीतले म्हणायचे...... असो.... चालु द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

कशाला कलायला हवं?

मन१
गुरुवार, 11/24/2011 - 11:31 नवीन
कशाला कलायला हवं? माणूस जसाजसा अनुभावी होतो, तसा तसा तो अधिक संशयी,skeptic का होउ लागतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ज्योतिश्यांकडे लोक स्वतहाच

किचेन
Wed, 11/23/2011 - 22:53 नवीन
ज्योतिश्यांकडे लोक स्वतहाच जातात.पण मुलगि पसंत आहे,फक्त तिला मंगळ आहे/ नाडि एक येते/गुण कमि जुळ्तात/ गण जुळत नाहि आशा लोकांना जरा ४ ज्ञानाचे (आल एक्दच टंकता) सन्गावे यासाथि हा धागा काढ्ला.जेणेकरुन लोकांन माझ म्हणण पटेल.तरि आता अभिशेक -एश्वर्या माझि खुप मदत कर्ताय्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अभिशेक -ऐश्वर्या माझि खुप मदत

वपाडाव
गुरुवार, 11/24/2011 - 10:41 नवीन
अभिशेक -ऐश्वर्या माझि खुप मदत कर्ताय्त
अरे वा !! एकाच वर्षात ..... बरंय बरंय.... तसं काय-काय करतात ही दोघं तुम्हाला मदत करण्यासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मिपावरील लोक सोडणार नाहीत

तिमा
गुरुवार, 11/24/2011 - 19:28 नवीन
लोक जातात. पण पसंत आहे फक्त तिला मंगळ आहे एक येते, गुण जुळत लोकांना जरा ज्ञानाचे टंकता हा धागा जेणेकरुन पटेल आता मदत यावेळेस फक्त शुद्ध शब्दच वाचायचे ठरवले आणि असं झालं! -- तिरशिंग शाळामास्तुरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

तुम्ही सरळ ज्यांच्या पत्रिकेत

अमोल केळकर
गुरुवार, 11/24/2011 - 11:40 नवीन
तुम्ही सरळ ज्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे अशांचाच ' वधू -वर मेळावा ' भरा. नक्की लग्ने जमतील तिथे :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

+१ पण...

मन१
गुरुवार, 11/24/2011 - 12:21 नवीन
सहमत. पण येक शंका:- मंगल ह्या ग्रहाला असे अ-मंगल का समजतात? जर मंगळ हा अपशकुक्नी असेल, तर अ-मंगल ह्या शब्दाचा अर्थ शुभशकुन असा व्हायला नको का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

किचेनताईंचा धागा भलताच पॉपुलर

मोहनराव
गुरुवार, 11/24/2011 - 17:03 नवीन
किचेनताईंचा धागा भलताच पॉपुलर झालाय बुवा!! मंगळ रॉक्स!! ;)
  • Log in or register to post comments

विषय पत्रिका

अन्या दातार
गुरुवार, 11/24/2011 - 18:23 नवीन
आहे. पण किचेनतैंचा मंगळ भलताच स्ट्राँग दिसतो. टोट्टल पत्रिकेतून फक्त मंगळच रॉकतोय. शुक्र आपला मधुनच थोडी टिवटिव करुन गेला, पण मंगळाची पॉप्युलॅरिटी काय त्याच्या नशिबी आली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

शुक्र..

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 11/24/2011 - 19:23 नवीन
शुक्र आपला मधुनच थोडी टिवटिव करुन गेला 'शुक्र', चार लोकांत नाही, एकांतात आपला प्रभाव दाखवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अस काय नाय

प्रकाश घाटपांडे
Fri, 11/25/2011 - 19:36 नवीन
शुक्र', चार लोकांत नाही, एकांतात आपला प्रभाव दाखवतो.
....... न भयम न लज्जा नुसार चारचौघात बी दाखवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मंगळ ??????????

सचिन भालेकर
Sat, 12/03/2011 - 00:48 नवीन
मंगळ ग्रहाच टेन्शन नका घेवु...... दाते पनचान्ग वाचा... २६ रुपयाना भेटत..... मंगळ ग्रहाच आक्रमक असतो.... नव-यान जर कप फोडला तर बायकोने बशी तरि फोडायला हवी.... नाही तर एकाचे हाल होनार न............... म्हनुन दाते पनचान्ग वाचा... नाय समझलच तर मी सान्गेन.... मी सुध्दा ज्योतिषी आहे.........
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा