संसारी माणसाची पाककृती: संडे स्टार्टर्स
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर!!
यापुर्वी आम्ही बॅचलर पाककृती लिहिली होती. या पाककृतीच्या नावात बॅचलर लिहिता येणार नाही अशी तंबी आम्हाला स्वयंपाक घरात जायच्या आधीच मिळाली. तसेही आम्हाला आज नव्याने कळलेला नियम म्हणजे " नीट आवरलेले स्वयंपाकघर ही नवर्याने स्वयपांक केल्याची खूण आहे"! तुम्हाला काय वाटले?? नवर्याने स्वयंपाक घर आवरले? अहो त्याने स्वयंपाक केल्यावर पुर्ण स्वयंपाकघरच ओट्यावर असते तर मग आपोआप आवरल्या जाणार नाही का??? ;) ;)
तर आमच्या अशाच क्लृप्त्यांमुळे आम्ही आमच्या साठी स्वयंपाक घरात नो एंट्रीचा बोर्ड लाऊन घेतला आहे. आहोत ना आम्ही हुशार? तसे आम्ही एक नंबरचे आळशी आहोत त्यामुळे आम्हाला अशा कल्पना सुचतातच. आमच्या बॅचलर काळात आमच्या रुमवर रविवारच्या सकाळी (गेले ते दिवस....) आमच्या साठी खास चहा आणि वडापावची होम डिलीव्हरी पार्सल यायचे. पण आता रविवार सकाळी ७.३० पासुनच कचरावाला, कामवाली बाई, पेपरवाला सगळे दार बडवतात. तर मंडळी रविवारी अशा पहाटे पहाटे उठल्या नंतर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आम्हाला पडला होता आणि आमच्या समोर टिव्ही वर अवतीर्ण झाले फूड्फूड (ज्याला आम्ही करतो हुडहुड) नावाचे चॅनल. याआधी बायकोला हजारोवेळा टोमणे मारुन झाले असल्यामुळे आणि आज नको तितका उत्साह ओसांडुन वाहात असल्यामुळे आम्ही आज स्वयंपाक घरावर चाल करुन जायचे ठरवले.
असो नमनाला घडाभर तेल ओतून झालेले आहेच. या डिश ला काय म्हणायचे ते म्हणा बुवा आम्हाला तर याचे नाव माहित नाही. वेगवेगळ्या हॉटिलात आम्ही हे वेगवेगळ्या नावाखाली स्टार्टर म्हणून खाल्लेले आहे. तर आता आपण या नापाककृती साठी लागणार्या घटकांकडे एक दृष्टीक्षेप टाकूयात.
१. मायक्रोव्हेव विथ ग्रील अॅण्ड बार्बेक्यु स्टीक्स (आमच्या कडे आहे ;) जाहीरातच समजावी.)
२. एक बायको/ गर्लफ्रेंड ( भाज्या चिरायला. आधी मारे ऐटीत (आयटीत नव्हे) चल आज मी तुला खाऊ घालतो असे म्हणालो तरीही हिच्या मदती शिवाय तुमची पाकृ पुर्ण होणार नाहीच. (बायकोला यासाठी कसे पटवायचे याच्या टिप्स उत्सुकांना व्यनी द्वारे दिल्या जातील.) सर्व काम बायकोनं केल्यावर आपण फक्त क्रेडिट घ्यायला मोकळे ;) )
आता प्रत्यक्ष स्वयंपाकघरात असणारे साहित्यः ( सगळे घरात सापडेलच, जरा शोधा म्हणजे सापडेल. नसल्यास बायकोला बाजारात पिटाळा.)
मुख्य साहित्यः कोणत्याही रंगीबेरंगी भाज्या.
उदा. १. दोन मध्यम आकाराचे टोमॅटो (आकार मध्यम की कसा आहे, हे बायकोवर सोडावे कारण शेवटी भाज्या तिलाच चिरायच्या असतात)
२. दोन मध्यम आकाराचे बटाटे.
३. दोन सिमला मिरच्या
४. एक कांदा
५. दोन चमचे घट्ट दही(मॅरिनेट करण्यासाठी. म्हणजे काय म्हणून विचारले तर बायकोने गणपाला विचार असं सांगितलंय. त्यामुळे इच्छुकांनी थेट तिकडेच संपर्क साधावा)
६. स्वयंपाकघरात मिळतील ते मसाले: पिझ्झ्यासोबत आलेले ओरॅगिनो-चिली फ्लेक्स, धने-जिरे पूड, सासरवाडीहून आलेले मसाल्याचे तिखट, इ.
७. चवीपुरते मीठ(असे लिहायचे असते नाहीतर इथे पाकृ प्रकाशित होत नाही म्हणे.) आणि हो, जSSराशी साखर. बस्स.
कृती: दह्यात सगळे मसाले-मीठ-साखर घालून नीट मिक्स करा. त्यात चिरलेल्या भाज्यांच्या फोडी घालून सर्व फोडींना मसाला लागेल असे ढवळा. हे मिश्रण असेच वीसेक मिनिटे राहू द्या.
नंतर या फोडी बार्बेक्यू स्टिक्सना लावा. या स्टिक्सची टोके जाम टोकदार असतात तेव्हा जपून. किंवा हलकंसं टोचवून घेऊन तिथं आलेलं रक्त बायकोला दाखवा. पुढचं काम ती करते.)
त्यानंतर आपापल्या अनुभवाप्रमाणे आणि आवडीप्रमाणे ग्रिल्+मायक्रोवेव्ह किंवा नुसते ग्रिल करा. आम्ही पाच मिनिटे ग्रिल्+मायक्रोवेव्ह आणि नंतरची पाच मिनिटे फक्त ग्रिल केले.( हे काम मात्र मी एकट्याने केले हो!)
तर हे सगळे मायक्रोव्हेव मधे टाकल्यानंतर... बायकोला चल मी आता थोडी रेस्ट घेतो तो पर्यंत तु हे आवरुन घे असे म्हणावे आणि स्वत: सोफ्यावर तंगड्या पसरुन टिव्ही चा आस्वाद घ्यावा. मायक्रोव्हेव ने आवाज केलेला एकुन स्वयंपाक घरात यावे आणि बायकोला अजुन तुझे आवरुन झाले नाही का असे विचारुन घ्यावे. बायकोचा पारा एवढ्यावर चढला असेलच. वर आणखी आज मी अशी अशी पाकृ केली असे चार पाच मित्रांच्या बायकांना फोन करुन सांगावे.
तर अशा प्रकारे आमची रविवारची सकाळ सार्थकी लागली.

वाचने
17782
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
धम्माल!
In reply to धम्माल! by पैसा
हा हा हा .....
स्टार्टर्स
In reply to स्टार्टर्स by स्मिता.
मायक्रोव्हेव मध्ये वापरता
In reply to मायक्रोव्हेव मध्ये वापरता by निखिल देशपांडे
अमेरिकन स्टोर
संपले का तुमच्या नवलाईचे नऊ
चलाऽऽऽ.... अजून एक मिपाकर नीट
In reply to चलाऽऽऽ.... अजून एक मिपाकर नीट by रेवती
तोंडीलावणे
In reply to तोंडीलावणे by कुंदन
मध्यंतरी दुबईहून पाककृत्या
In reply to तोंडीलावणे by कुंदन
अरे देवा
In reply to अरे देवा by चित्रा
दृष्य डोळ्यासमोर आले. हसून
In reply to दृष्य डोळ्यासमोर आले. हसून by रेवती
होय
In reply to होय by चित्रा
हॅ हॅ हॅ मी दूध पिते असं
In reply to हॅ हॅ हॅ मी दूध पिते असं by रेवती
तसे असल्यास
In reply to तसे असल्यास by चित्रा
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! आता
In reply to स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! आता by रेवती
एका गरीब बिचाऱ्या पुरषाच्या
In reply to एका गरीब बिचाऱ्या पुरषाच्या by गणपा
अरे अरे
In reply to अरे अरे by चित्रा
कृपया
In reply to एका गरीब बिचाऱ्या पुरषाच्या by गणपा
पुरुष मुक्ती वाले, शन्वारी
सॉलीड
छानचं
च्यायला !
हॅ हॅ हॅ!
उत्तरे..
In reply to उत्तरे.. by मस्त कलंदर
फिस्स्स
In reply to फिस्स्स by परिकथेतील राजकुमार
मग
In reply to फिस्स्स by परिकथेतील राजकुमार
पर्या
In reply to पर्या by स्मिता.
हा हा हा
In reply to पर्या by स्मिता.
खी खी खी स्मिता, टोला बरोबर
(संसारी म्हणुन )पाकृ ठीक-ठाक
उत्तम! पाकृ आवडली!
छान ...
वा वा वा डॉनकाकांची प्रगल्भ
प्रगती आहे
मस्त
इतके दिवस मिपावर दिसला नाही निख्या
In reply to इतके दिवस मिपावर दिसला नाही निख्या by चतुरंग
.
आयडीया छान आहे...ओमलेट खाऊन कंटाळा आलाय....