साहित्यः
२ बटाटे उकडून कुस्करून घेणे
साधारण १ वाटी पालक उकडून व पाणी निथळून घेणे
१ वाटी सोया ग्रान्युल्स गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवून, हाताने दाबून पाणी काढून घेणे
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ टीस्पून लसुण बारीक चिरून
१ टीस्पून आले बारीक चिरून
२ टेस्पून पंढरपुरी डाळ कोरडीच भाजून घेणे
२-३ टेस्पून ब्रेड क्रम्बस
१/२ टीस्पून चाट-मसाला
१/२ टीस्पून जीरे
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
मिक्सरच्या भांड्यात उकडलेला पालक, सोया ग्रान्युल्स, आले, लसुण, हिरव्या मिरच्या, पंढरपुरी डाळ, जीरे, चवीप्रमाणे मीठ, चाट-मसाला एकत्र करून वाटून घेणे. (चाट-मसाल्यात ही मीठ असते त्याप्रमाणे मीठ घालावे).

वाटलेले मिश्रण उकडून कुस्करलेल्या बटाट्यात घालणे, ब्रेड क्रम्बस घालून चांगले एकजीव करावे.

मिश्रणाचे गोळे करुन टिक्की बनवावी व नॉन-स्टीक पॅनमध्ये तेल तापवून शॅलो-फ्राय करावी.

तयार सोया-पालक टिक्की तुम्ही टोमॅटो सॉस, चटणी बरोबर सर्व्ह करु शकता. ही टिक्की नुसती ही खायला छान लागते. आवडत असल्यास मिश्रणात थोडा गरम-मसाला ही घालू शकता.
प्रतिक्रिया
फोटो अॅज युज्वल .. कातिल
पाहताच त्या सोया-पालकाला...
मस्त
मुलाच्या लंचबॉक्सला अजून एक
भारी
८ आणि ७?
त्यातली एक खाल्ल्या गेली
In reply to ८ आणि ७? by प्रभाकर पेठकर
मस्त दिसतायत
नाय
In reply to मस्त दिसतायत by गणपा
मेल्या चाळीशी लाव जारा.
In reply to नाय by परिकथेतील राजकुमार
=)) =))
In reply to मेल्या चाळीशी लाव जारा. by गणपा
जबरा !!!!
मस्त! झकास.
कातिल टिक्की... - (झटक्यात
अतिशय
नेहमीप्रमाणे अतिशय नीट, सुंदर
प्रेझेँटेशन आणि पाककृती अतिशय
अल्टिमेट!
सहीच..... माझ्या सासुबाई ही
मस्त... चमच्यात पदार्थ इतके
टिक्की मस्त. स्वगतः कित्ती
फो टो का ति ल
काही बार मध्ये हीच पाकृ फक्त
>>>>>>विलासराव, काही आठवतंय
In reply to काही बार मध्ये हीच पाकृ फक्त by यकु
आता फक्त तो मिक्सर फिरवत
मस्तं !
सगळ्यांना धन्यवाद
निषेध निषेध निषेध.