✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मोघेकाकू..!

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 07/15/2008 - 18:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18799 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

प
प्राजु Tue, 07/15/2008 - 18:25 नवीन

त्या

त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची! आता कुणाला हातावर पटकन बेसनाची वडी मिळणार नव्हती की मोतीचुराचा लाडू मिळणार नव्हता! नाना आठवल्यांना कुठल्याही औषधापेक्षा गुणकारी ठरणारी मायेची, आपुलकीची आल्याची वडी मिळणार नव्हती! सांत्वन तरी कोण कुणाचं करणार आणि पिठलंभाताचा कडूघास तरी कोण कुणाला देणार? चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही! वा तात्या... अतिशय सुंदर. हा शेवटचा पॅरा सुन्न करून गेला. खूप छान लिहिलं आहे तुम्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ आवांतर : व्यक्तीचित्र कशाशी खातात हे प्राजूला दाखवतो या इराद्याने ताबडतोब पोस्ट नाहीना केलं?? (ह्.घ्या.)
  • Log in or register to post comments
स
साती Tue, 07/15/2008 - 18:34 नवीन

छान आहे.

व्यक्तीचित्र छान रंगवले आहे. साती
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 07/15/2008 - 18:42 नवीन

आवडले

सुंदर व्यक्तिचित्र रंगवले आहे. "शेजार"आणि "घरोबा" या शब्दांशी निगडीत अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या....
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/15/2008 - 19:01 नवीन

असेच म्हणतो

सुंदर व्यक्तिचित्र रंगवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
वरदा Tue, 07/15/2008 - 18:43 नवीन

मस्तच तात्या

डोळ्यात पाणी आलं एकदम... अरे काही नाही रे, आमच्या राधाबाईंच्या सुमनचं लग्न ठरलंय. राधाबाईंनी नशीब काढलं हो! जावई चांगला मिळालाय म्हणत होत्या. माझ्याकडे गेली तीन-चार वर्ष मदतीला येताहेत, त्यांना आणि त्यांच्या मुलीला मी घरी जेवायला बोलावून केळवण करणार आहे. साडीचोळी, आहेराचंही थोडंफार काही देईन म्हणत्ये! मग त्याकरता पैसे नकोत का?!" खरच किती चांगले विचार्....खूप शिकण्यासारखं आहे ह्यांच्याकडून.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
र
राधा Tue, 07/15/2008 - 18:56 नवीन

खुप छान......

छान लिहिलत्........मोघेकाकुंच अस जाणं मनाला चटका लाउन जात.........
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/15/2008 - 18:58 नवीन

खूप छान

खूप छान जमलय व्यक्तीचित्र तात्या.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Wed, 07/16/2008 - 07:09 नवीन

असंच म्हणते!

एकदम मस्त जमलंय व्यक्तिचित्र तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/15/2008 - 19:02 नवीन

व्यक्तिचित्र

तात्याची व्यक्तिचित्र जीवाला चटका लाउन जातात. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 07/16/2008 - 11:16 नवीन

उत्तम

तात्याची व्यक्तिचित्र जीवाला चटका लाउन जातात
१००% सहमत थेट भिडलं तात्या तुमचं हे चित्रण . -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मनस्वी Tue, 07/15/2008 - 19:05 नवीन

आवडल्या मोघेकाकू!

आज अशी माणसे बघायला मिळणे दुर्मिळच.. त्यांचा सहवास तर दूरची गोष्ट.
परंतु त्यांचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व, वागणं नेहमी इतकं छान नी मनमोकळं असायचं की त्या सुरेखच दिसायच्या!
आम्ही सगळे आहोत चाळीत. काही काळजी करू नका! अहो, इतक्या वर्षांचा शेजार आपला, आम्ही कुणी परके का आहोत? आता जरा बरं वाटतंय का?
मोघेकाकू कोणताही गाजावाजा न करता, अगदे शांतपणे देवाघरी गेल्या!
दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाणार्‍या, प्रेमळ अन् निरागस मोघेकाकूंना देवही अलगद काही त्रास न होउ देता घेउन गेला! आवडल्या मोघेकाकू! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 07/15/2008 - 19:05 नवीन

जमलंय!!

नेहमीसारखंच फर्मास जमलंय व्यक्तिचित्र. सामान्य माणसांतला असामान्यपणा अशा दिलखुलास व्यक्तिचित्रांनीही खुलतो असं वाटतं. मोघेकाकूंना चांगला मृत्यू आला.
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Tue, 07/15/2008 - 19:07 नवीन

तात्या

तुम्ही होम पीचवर असताना लेख रंगला नसता तरच नवल होते. व्यक्तिचित्रे रंगवण्याची खसियत आवडली. लेख वाचताना स्वत: तेथे असल्याचा भास झाला. यातच सर्व काही आले. आपला (वाचक)विद्याधर अवांतर: गटण्याचा लेख कधी पाडताय? :W
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 07/15/2008 - 19:08 नवीन

फस्क्लास

तात्या श्टाईल व्यक्तीचित्र .. छान लिहलय तात्या, नेहमीप्रमाणे आवडले.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 07/16/2008 - 00:28 नवीन

सहमत

आहे. व्यक्तिचित्र आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ड
डोमकावळा Tue, 07/15/2008 - 19:18 नवीन

झकास....

एकदम आवडलं तात्या.... छानच...
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 07/15/2008 - 19:26 नवीन

जीवन त्यांना कळले हो !

...तुमचे व्यक्तिचित्र वाचून असेच म्हणावेसे वाटते. त्यांना कधी आपल्या "मिशन" बद्दल प्रश्न पडले नसतीलच. अशी माणसांचे आयुष्य हेच एक मिशन असते. तात्या , पुन्हा एकदा धन्यवाद ! लिखाण खूप आवडले. (तुमची बिल्डींग पहावीशी वाटते आहे !) :-)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/15/2008 - 23:07 नवीन

मिशन

..तुमचे व्यक्तिचित्र वाचून असेच म्हणावेसे वाटते. त्यांना कधी आपल्या "मिशन" बद्दल प्रश्न पडले नसतीलच. अशी माणसांचे आयुष्य हेच एक मिशन असते. अगदी बरोबर ! सुंदर चित्रण, तात्या. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Tue, 07/15/2008 - 19:27 नवीन

तात्या, हा तर

मोतीचुराचा लाडूच होता! :) (अगदी मोघेकाकूंनी केल्यासारखा वाटला!) सर्वसामान्य माणसांकडे एका वेगळ्याच नजरेने तुम्ही बघू शकता आणि मुख्य म्हणजे जे काय भावलं आहे ते शब्दात मांडू शकता हे पुन्हा एकदा सिद्ध केलंत! जियो!! (स्वगत - एवढं चांगलं लिखाण मिपावर भरभरुन येत असताना हा तात्या ट्रॅफिक जॅमची काळजी का करतो? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Tue, 07/15/2008 - 19:38 नवीन

खुप छान

मस्त लिहिले आहे..तात्या...असे वाटले ह्या फ्लॅट संस्क्रुतीतुन बाहेर पडुन परत चाळीत किंवा पुण्याचा वाडा संस्क्रुतीत जावे..जिथे पैश्यापेक्षा माणुसकीला महत्व होते... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/15/2008 - 20:00 नवीन

अगदी सुंदर

अगदी सुंदर लिहलय तुम्ही तात्या.. मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/15/2008 - 20:03 नवीन

जमलंय...

मोघे काकू छानच. इतकं सुंदर जीवन आणि त्याहूनही सुंदर मरण, भाग्यवान होत्या. बिपिन.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 07/15/2008 - 20:07 नवीन

सुंदर

अतिशय सुंदर व्यक्तिचित्रण. खास संग्रहि ठेवावा असा लेख! अभिनंदन. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 07/15/2008 - 20:49 नवीन

ह्म्म

तात्याशेठ, व्यक्तीचित्रांची भट्टी बाकी तुम्हाला बेष्ट जमते यात वाद नाही.. नेहमी प्रमाणेच सुंदर लेख.. (वल्ली)केशवसुमार स्वगतः साले हे लेखक व्यक्तीचित्राचा शेवट नेहमी दु:खीच का करतात? :/
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 07/15/2008 - 22:34 नवीन

तुम्ही

व्यक्तीचित्राचं विडंबन म्हणून हसता विनोदी शेवट असणारं एखादं व्यक्तिचित्र लिहाच केसु...:)))) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 07/15/2008 - 21:03 नवीन

सुंदर व्यक्तिचित्र

अशा मोघेकाकू मला वाटते प्रत्येक चाळीत किंवा वाड्यात असतातच. तात्याची वर्णनशैलीही अगदीच खास. आमच्या वाड्यात पण आहेत अशा एक काकू, वाड्यात त्याना सगळे 'विनयच्या आई' म्हणतात. खरोखर अजातशत्रू व्यक्तिमत्व असतात. वाडा गेला ओनरशिप घरे आली पण या नवीन 'दार'बंद संस्कृतीतही 'विनयच्या आईंचे दार कोणाच्याही मदतीसाठी सताड उघडे असते. त्यांचे यजमान त्याना दादा म्हणतात ते म्हणजे तर अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व. तात्या खरोखर तुझ्यामुळे आठवण झाली बघ त्यांची. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 07/15/2008 - 21:32 नवीन

तात्या ऍट हिज बेष्ट (ऍज युज्वल)!!

अशी माणसे फक्त जुन्या चाळीतच पाह्यला मिळायची. आत्ताच्या फ्लॅट स॑स्कृतीत फारच अवघड आहे. शिवाय मदत करायला गेल॑ तर चो॑बडेपणा वाटण्याची शक्यता अधिक! प्रायव्हसी डिस्टर्ब होते ना! तात्या, कालच सई परा॑जपे॑चा 'कथा' चित्रपट (कितव्या॑दा कुणास ठाऊक) पाहात होतो. त्यातला राजाराम (नसिरूद्दिन शाह) अगदी तुमच्या मोघेकाकू॑सारखा आहे!
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 07/15/2008 - 21:35 नवीन

वा! तात्या...

व्यक्तिचित्र आवडले... खास तात्या टच!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 07/15/2008 - 22:27 नवीन

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू शेवटचे वाक्य तर फारच टोचले. (भावुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
भ
भाग्यश्री Tue, 07/15/2008 - 22:21 नवीन

मोघेकाकू

मोघेकाकू खूप आवडल्या! :)
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 07/15/2008 - 22:21 नवीन

मनात घर करून राहणा-या मोघे काकु.

तात्या , मोघे काकुचा सहवास तुम्हाला लाभला हे खुप छान आहे, अशी लोक फार कमी असतात जी सदैव दुसर्याच्या मदतीला धावुन येतात आणि स्वत:च्या दुखाचा बाऊ न करता इतराच्या सुखात , आनदात रमतात. पण खरच मरण ही खुप छान आले पण त्याना अजुन आयुष्य लाभले असते तर बरे झाले असते असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 07/15/2008 - 23:32 नवीन

मस्त!

आता आणखी काही जास्त लिहून डोह डुचमळवत नाही.... -पिडा
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 07/16/2008 - 01:01 नवीन

क्या बात है !

>> याला म्हणायचं आनंदाने जगणं, दुसर्‍याच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधणं! क्या बात है तात्या ! तू व्यक्तिचित्रण लिहितोस तेव्हा असं असं वाटतं की ती व्यक्ती आपल्याही खूप ओळखीची आहे. -------- ईश्वर मोघेकाकूंच्या प्रेमळ आत्म्यास शांती देवो ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 07/16/2008 - 07:44 नवीन

झकास

व्यक्तीचित्र खूप छान लिहीले आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/16/2008 - 07:50 नवीन

व्वा !!!

मोघेकाकूंचं व्यक्तिचित्र आवडले, संपुर्ण लेखन वाचतांना मोघेकाकू डोळ्यासमोर वावरत होत्या, त्यांची लगबग दिसत होती. आणि शेवटचा प्रवास मात्र अगदी शांत, जीवाला हळहळ करायला लावणारा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 07/16/2008 - 09:53 नवीन

मस्त

मस्त व्यक्तिचित्र. आमची आजची पिढी नक्किच दुर्दैवी ज्यांना चाळीतील एकोपा, मोठ्या माणसांचे मार्गदर्शन , दुसर्‍यांना मदत करण्याची , त्यांच्या अडीअडचणींना धावुन जाण्याची वृत्ती अनुभवायला नाही मिळाली अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Wed, 07/16/2008 - 10:18 नवीन

वाह !!!

नमस्कार, वाह तात्या छान . हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 07/16/2008 - 11:04 नवीन

मानलं

तात्याराव, आपल्याला मानलं.सुरवाती पासून शेवट पर्यंत मन लावून वाचलं.खूप आवडलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 07/16/2008 - 13:08 नवीन

सुंदर ...

सामान्यांचे असामान्यत्व एका सामान्याच्या नजरेतुन टिपण्याचे "आख्यान" उत्तम जमले आहे ... रोजच्ज्या व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो , त्यांच्याशी व्यवहार करतो पण कधीतरीच त्यांच्यातले "असामान्यत्व" आपल्या लक्षात येते. गावाकडे अशी खुप माणसे पाहिली लहानपणी, त्यांच्या आठवणी आजही येतात ... त्यांनी दिलेल्या "प्रेमाची आठवण" म्हणुन असा लेख लिहणे यातच त्याची थोडीशी का होईन "परतफेड" होय ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 07/16/2008 - 13:41 नवीन

सुंदर

सुंदर व्यक्तिचित्रण रंगवले आहे, तात्या. मोघेकाकू डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. शेवट चटका लावून गेला. ईश्वरी
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Wed, 07/16/2008 - 17:26 नवीन

बाकी ठीक...

व्यक्तिचित्र. सुरवात 'नारायण'चा भास करून देणारी. पण... होळी? "त्या रात्री होळी पेटली..." हे काय लिहून गेलात विसोबा? पटलं नाही. अजिबात नाही. मोघेकाकूंच्या चितेची होळी? काही तरी गडबड आहे. एक तर आमच्या आकलनात किंवा लेखनात तरी. होळी अमंगलाची करतात ही धारणा चुकीची असेल तर लेखन बरोबर आहे. ही धारणा बरोबर असेल तर मोघेकाकूंच्या चितेची होळी होऊ शकत नाही. आमचं चुकत असेल तर आधीच शब्द मागं घेऊन ठेवतोय.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 07/16/2008 - 19:20 नवीन

नेहमीप्रम

नेहमीप्रमाणेच बेष्ट. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/17/2008 - 09:10 नवीन

आभार...

आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मन:पूर्वक आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 07/17/2008 - 09:18 नवीन

जबरदस्त

तात्या, जबरदस्त हा एकच शब्द तुमच्या हया लेखाला योग्य ठरेल. जाताना जीवाला अगदी चटका लाऊन गेल्या मोघेकाकू. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2008 - 22:51 नवीन

भावस्पर्षी....

त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची! नारदाचार्यांशी सहमत. चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही! मन सुन्न करून गेले हे वाक्य. मनाला स्पर्ष करणारे लिखाण. अभिनंदन तात्या. अशा व्यक्तींचा सहवास, त्यांच्या आठवणीत रमण्याचे भाग्य तुम्हाला लाभले, नशिबवान आहात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/18/2008 - 09:31 नवीन

आभार..

सुचेल तसं, प्रभाकरशेठ, आपले मनापासून आभार... या असभ्य, असंस्कृत, व शिवराळ माणसाने केलेले वेडेवाकडे लेखन आपल्या सगळ्यांनी वाचले व कौतुक केले त्याबद्दल सर्वांचेच पुनश्च एकदा आभार...! असो, तात्या.
  • Log in or register to post comments
श
शिंगाड्या Fri, 07/18/2008 - 13:33 नवीन

अप्रतीम!

अप्रतीम व्यक्तिमत्व..अन तेव्हढ्याच ताकदीचे लेखन... अवांतरः २,४ दिवसांपसुन वमिसळपाववर चाललेल्या 'ऐतिहासिक' लेखनानंतर आलेला हा लेख फार सुखवुन गेला! वळीवाच्या पावसानंतचे निरभ्र आकाशासारखा!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 07/18/2008 - 13:40 नवीन

मोघेकाकू..

मोघेकाकू आवडल्या तात्या, डोळे पाणावले. स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Fri, 07/18/2008 - 17:25 नवीन

खूपच छान

लगबगीत असलेल्या मोघे काकू थेट डोळ्यासमोर उभ्या केल्यात तात्या. सुंदर. आंबोळी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/18/2008 - 17:29 नवीन

धन्यवाद,

शिंगाड्या, स्वाती आणि कंदिलराव, सर्वांना धन्यवाद... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा