Skip to main content

अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस सतत धावतो आयुष्यभर वयाचं भान न राखता?

लेखक एक अनामी यांनी गुरुवार, 17/11/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस सतत धावतो आयुष्यभर वयाचं भान न राखता? . . . . माणूस आयुष्यभर कशा ना कशाच्या मागे धावतच असतो... . . अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस सतत धावतो? . . . . पैसा...? प्रसिद्धी...? . नाही पैसा, प्रसिद्धीला वय आड येतं, निरागस बालवयात या दोन्हीचा गंधही नसतो. अन् उतारवयात ह्याचा मोह सुटतो... . . अहो... जास्त गंभीर होऊ नका... आयुष्याभर माणूस ज्याच्यामागे धावतो, अगदी वयाचं (अन् तब्येतीचंही) भान न ठेवता... ती गोष्ट आहे.. . . "Local Train..." . पहा कसे आजी- आजोबाही मुला-नातवंडांसह धावतात ते...! . . अजून काय असू शकेल मिपाकरांच्या मते...?

वाचने 6034
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

In reply to by कुंदन

तु ओनसैट साठी धावतोस ना ? हे उलट आहे...मी ओनसैट साठी नको म्हणतो... पण हे लोक पाठवायचा प्रयत्न करतात ! पण मी काही जात नाही. ;)

In reply to by मदनबाण

"मला जायचे नव्हते पण कंपनीनेच पाठवले" हे ऑनसाईट गेल्यावर म्हणायचे असते.आधीच जायचे नाही म्हंटलेत तर पत्ता कट.

In reply to by चिरोटा

आधीच जायचे नाही म्हंटलेत तर पत्ता कट. असं काही नाही ! कंपनीला पाठवायचे असेल तर ते त्यासाठी काहीही करतात हे मला पहिल्याच ऑनसाईटने शिकवले. तुमचे क्लायंट बरोबर अगदी मस्क्या सारखे संबंध असतील तर तुम्हाला पाठवण्यात त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो... मला माझ्या जुन्या क्लायंटकडे (युरोपात) एक आठवडा शेअर पॉइंटचे ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवण्यात येणार होते, क्लायंटने देखील माझ्याच नावाचा आग्रह धरला होता...पण त्या प्रोजेक्ट मधुन काहीही झाले तरी मला बाहेर पडायचे होते ! मी जर गेलो असतो तर परत त्याच प्रोजेक्ट मधे अडकुन बसावे लागेल हे मला माहित होते,त्यामुळे मी तिथे जाण्यास नकार दिला व माझ्या निर्णयावर ठाम राहिलो... परिस्थीती नुसार ऑनसाईट जाण्याचा निर्णय घेता आला पाहिजे ! ते कठीण असते पण... तसा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा ! मॅनेजमेंटवाले त्यांचे कार्य साधण्यासाठी बरेच खेळ खेळतात त्यात ऑन साईटचे गाजर हे त्यांच्या साठी हुकमी एक्का असतो...कुठल्या तरी फडतुस कामासाठी सुद्धा ते तुम्हाला ऑनसाईटवर पाठवण्यासाठी तयार असतात कारण मिळणारे कॉन्ट्रॅक्ट आणि पैसा ! मला ३ वर्षासाठी मलेशियाला पाठवण्यासाठी बराच दबाव आणला होता... एक क्षण असा होता की मला हे लोक नोकरीवरुन काढुन टाकतील अशी भीती वाटली होती.... पण ते काम करण्यास मी नकार दिला आणि शेवट पर्यंत माझ्या निर्णयाला धरुन राहिलो... जितकी तुम्हाला कंपनीची गरज असते त्या पेक्षा कित्येक पट जास्तीने कंपनीला तुमची गरज असते हे लक्षात ठेवावे.

पुलंची "लन्सिपे" ची गोष्ट आठवली. एका कोड्याचे हे उत्तर असते आणि हे खुपच गमतीशिर आहे असा "कोडं"कर्त्याचा दावा असतो. (अवांतरःवरिल कोडे फक्त मुंबई साठी आहे का ?)

In reply to by मराठी_माणूस

(अवांतरःवरिल कोडे फक्त मुंबई साठी आहे का ?) फक्त मुंबई साठी म्हणजे? मुंबई सोडून इतरत्र काही असते यावर मुंबईकरांचा विश्वास नसतो

In reply to by विजुभाऊ

मुंबई सोडून इतरत्र काही असते यावर मुंबईकरांचा विश्वास नसतो अजुन एका गावाकडे दुर्लक्ष होतेय :)

'स्ततुस उप्दते' केल्याबद्दल धन्यवाद. 'लिके' व 'शरे' करण्यात आले आहे. अजून येऊ द्यात. @ शाहिर - आपला मोक्ष आणि निर्वाण क्रम चुकला आहे, अर्थात वैयक्तिक मत ;)

वर्षाअखेरीस अनेक मिपाकर जरा जास्तच सेंटी होतात असे माझे निरिक्षण आहे. हा धागाही त्याला अपवाद नाही.

आशानाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला बध्यन्ते यया प्रधावन्ति.; मुक्ता तिष्ठति सः

जागा राखून ठेवत आहे.

In reply to by मोहनराव

>>अति घाई संकटात जाई!! कोणत्या विशिष्ट आयडीबद्दल बोलताय? ;) आमी तर "अति घाई संकटात नेई" असं वाचलं होतं

In reply to by गणपा

त्याला एक नाही दोन नंबर म्हणतात. मोठे व्हा हो गणपाशेठ. ;-)

In reply to by शुचि

चुक! याला वयाची अट आहे :P घाईची लागली की मोठी माणसे करत असतील धावपळ.. लहान मुले मात्र त्या फंदात पडत नाहित.;) त्यांचा जिथल्या तिथे गोष्टी असण्यावर फार विश्वास असतो ;)

खरडफळा फुटला काय?