(मलाही आवडलेली काही वाक्ये)
लेखनप्रकार
प्रेम
तो
रस्त्यावर तो फिरत होता,
त्याचे कपडे फाटके होते.
कोट उसवलेला होता आणि
त्याला ठिगळे होती.
त्याच्या उसवलेल्या बुटातून
पाणी ठिबकत होते,
तो म्हणाला, 'होतो.'
मी विचारले,'प्रेमात?'
'नाही'. तो म्हणाला. 'आयटीत'.
अडाणी.
तुम्ही जर चांगली पुस्तके वाचत नसाल,
तर अभिनंदन.
तुम्ही बहुमतात आहात.
तुम्ही जर वाचतच नसाल,
तर, वेल,
मला तुमचा हेवा वाटतो.
दिशाहीन
कुठे जायचे हे ठरले नसेल तर
प्रत्येक रस्ता हा आपलाच आहे
शेवटी
प्रत्येक रस्यावर कुठे ना कुठे बार असतोच.
श्रीमंत
निसर्ग आणि स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर
तुम्हाला जगता येणे अवघड आहे.
जगाच्या मतांप्रमाणे चालत राहिलात तर मात्र
तुम्ही आता जसे जगता तसेच जगत राहाल.
दिनचर्या.
सकाळी प्रयत्न कर
दुपारी पुन्हा प्रयत्न कर
संध्याकाळी चांगल चुंगलं जेव
रात्री इसबगोल घे
दुसर्या दिवशी सकाळी तरी होईलच.
खलाशी
दिवस लहान होते आणि रात्री मोठ्या होत्या.
सूर्यप्रकाश जवळ्जवळ नव्हताच.
बोटीवरच्या केबीन्समधे
वातावरण उदासवाणे होते.
हिवाळ्यात हे असे असतेच.
त्यात विशेष ते काय?
प्रेम
जास्त अंदाज, तर्क,
कमी प्रेम !
जास्त प्रेम,
संशय, निव्वळ संशय!
घर
ज्यात तुम्ही रहाता
त्याला तुमचे घर म्हणता येतेच असे नाही.
कधी कधी तुम्ही
भाड्याच्या घरात राहात असता.
नष्टचर्य.
मुले आणि संशोधन यांच्यात विलक्षण साम्य आहे.
दोन्हीत तुम्ही गुंतवणूक करता. पुढे काय होणार याची तुम्हाला कल्पना नसते,
आणि ते तुम्ही सांगूही शकत नाही.
काही कारणांमुळे तुम्ही दोन्हीही बंद करू शकता.
(असे तुम्हाला वाटते)
संशोधन फसले की
तुमचा धंदा बंद होऊ शकतो
मुलांचे बंद करणे फसले
की थोरलीच्या लग्नात धाकटा पाचवीला असतो.
मित्र.
माणसाच्या आयुष्याचे चांगले आणि वाईत असे दोन भाग केले तर -
चांगला भाग चांगला आणि वाईत भाग वाईत असतो.
किंवा
वाईत भाग वाईत आणि चांगला भाग वाईबाहेर असतो.
यश
जर तुम्हाला एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल
किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचे स्वप्न बघत असाल तर त्या दिशेने लगेच पाऊल टाका.
संध्याकाळपर्यंत थांबू नका
संध्याकाळी तुम्हाला पाहिजे त्यी दिशेलाच तुमचे पाऊल पडेल,
याची हल्ली खात्री नसते.
वाचने
7750
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
मलाही आवडलेली काही वाक्ये
//चांगला भाग वाईबाहेर
In reply to //चांगला भाग वाईबाहेर by जयंत कुलकर्णी
ओ प्यारे१
In reply to //चांगला भाग वाईबाहेर by जयंत कुलकर्णी
आमच्या 'वाई'त काही वाईट नाहीच आहे मुळी
In reply to आमच्या 'वाई'त काही वाईट नाहीच आहे मुळी by वाहीदा
ओ आपा, हम भी हय ना वाई के....
In reply to ओ आपा, हम भी हय ना वाई के.... by प्यारे१
म्हणून तर तिला बोलावले ...
In reply to म्हणून तर तिला बोलावले ... by वाहीदा
आधी पुण्यावर फोकस होता आता
In reply to ओ आपा, हम भी हय ना वाई के.... by प्यारे१
तशी पुणेकर आहे पण वाईला दोन
विडंबन आवडले!
In reply to विडंबन आवडले! by पैसा
असंच म्हणतो
मस्त मस्त मस्त, मुळ
मस्त
आवडले
ठ्ठो!!!!!
हा:... हा:....
एक्क नम्बर!!
मूळ वाक्ये आणि विडंबन
In reply to मूळ वाक्ये आणि विडंबन by विसुनाना
सहमत
In reply to मूळ वाक्ये आणि विडंबन by विसुनाना
+ १
In reply to मूळ वाक्ये आणि विडंबन by विसुनाना
असेच म्हणते
झकास !
__/\__
मान गये !!
दे दणादण!! मस्तच!!
भारीच आहे..
भारीच आहे..
एकदम जबरदस्त
कमाल
जबराच!!
आई शप्पथ!!! हहपुवा!!
:)
घ्या मग...
In reply to घ्या मग... by वपाडाव
लै
In reply to घ्या मग... by वपाडाव
काही रितभात आहे की नाही?