Ginger चिकन
नमस्कार मंडळी,
दिवाळी संपली, फराळही संपला. म्हंटल एखादी झणझणीत आणि आवडती डिश हाणुया. :) आता गणपा महाराजांसारखा स्टेप बाय स्टेप पाककृती समजावण्याईतका माझा पेशंस नाही, पण तरी एक छोटासा प्रयत्न करतोय.
जिंजर चिकन ड्राय हा माझा फार आवडता प्रकार आहे.
साहित्यः
१. लाल तिखट - सकाळी ऑफिसला जायचे आहे की नाही त्याप्रमाणे.
२. तेल - पोटाच्या घेरानुसार
३. मीठ - ब्लड प्रेशर नुसार
४. कांदा मध्यम - शक्यतो पांढरा (कमी उग्र असतो म्हणून, शक्य तितका बारीक चिरून)
५. आले - खालच्या चित्रावर फुटपट्टी लावून ईंच मोजुन घ्या. सढळ हस्ते वापर करा.
६ गरम मसाला - खुप गरम पडणार नाही याचा विचार करुन त्यानुसार (खडा मसाला नको)
७. बोनलेस चिकन - पाव किलो
८. सुके खोबरे - ऑप्श्नल (मला आवड्तं म्हणून टाकतो)
९. पुदीना - ऑप्शनल
कृती:
१, कढईत तेल तापवून घ्या.
२. तेल तापले की चिमुटभर हिंग टाकून कांदा परतायला घ्या. ("हिंग डाला जाता है, तेल का जायका बढाने के लिये, तेल डाला जाता है प्याज का जायका बढाने के लिये, और प्याज डाला जाता है खाने का जायका बढाने के लिये" - ओळखा हे वाक्य कोणत्या सिनेमातलं आहे ते?)
३. कांदा चांगला परतला गेला की त्यात लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घ्या. यातच आले, खोबरे, पुदीना टाका. आले किसुन टाका, पेस्ट किंवा वाटलेले आले नको.
४. मंद आचेवर थोडा वेळ परता, आता यात चिकनचे बारीक केलेले तुकडे टाका. (त्या भिकारड्या हॉटेलवाल्यांसारखे आधी कुकरमधुन शिजवुन त्यातल सुप पिऊन उरलेला चोथा टाकु नका.)
५. मीठ घाला. बोनलेस आणि बारीक तुकडे असल्याने लवकर शिजेल चिकन. हवेतर थोडं पाणी घालून शिजवा.
६. शक्य तितके कोरडे बनवण्याचा प्रयत्न करा.
७. सजावट करा आणि आपल्या आवडत्या पेयाबरोबर आस्वाद घ्या. ;)
आपला,
मराठमोळा
वाचने
7654
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मस्त मस्त
मस्तय!
गणपा होण्याच्या मार्गावर अजून
मस्त
छान
यम्मी! लेकाला करता येइल.
मस्त
खूपच छान!!
साहित्यापासून
In reply to साहित्यापासून by पैसा
>>परवाचे पेढे सुद्धा लक्षात
वाह वाह... तोंडाला पाणी सुटले
वा... मस्त आहे पाकॄ.... एकद
या विकांतला हेच करावे
झक्क्क्क्क्क्कास
मस्त !!! करायला पण सोपी वाटत
नाद खुळा..... आवडत पेय......
khup chan recipe ahe