सिंहीण

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in जनातलं, मनातलं
10 Nov 2011 - 7:25 pm

खरं तर http://www.misalpav.com/node/19536#comment-348648 इथेच कबूल केलं होतं त्याप्रमाणे लिहीणार होतो पण काही कारणास्तव तेव्हा जमलं नाही. आज सायंकाळी आमच्या दारावरील घंटी वाजली. दरवाजा उघडून पाहिले असता कोणी दिसले नाही परंतू आमच्या पत्रपेटीत खालील कागद आढळला. हा कागद वाचताच माझी एक जुनी आठवण जागी झाली.

साधारण दोन दशकांपूर्वीची हकीगत आहे. तेव्हाही असाच एक कागद आमच्या पत्रपेटीत आढळला होता. फक्त तेव्हा वक्तृत्व स्पर्धा होती आणि स्पर्धेचे आयोजक होते लायन्स क्लब ऑफ निगडी, पुणे. स्पर्धेसाठी विषय होता जातीयवाद - समस्या आणि उपाय.

कागदावरील आवाहनास अनुसरून लगेचच जुळवाजुळव सुरू झाली. दोन दिवसांत भाषण लिहून काढले आणि पुढचा एक आठवडा पाठांतर व सरावात घालवला. स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्या क्रमाने स्पर्धेकरीता नावे नोंदविली गेली होती त्या क्रमाने एकेक जण पुढे येऊन व्यासपीठावर भाषण करू लागला. ती भाषणे ऐकताच माझा उत्साह मावळला. बहुतेक सर्वांनीच जातीयवादाचा संदर्भ चालु घडामोडींशी जोडला होता. जातीनिहाय आरक्षण ठेवल्यामुळे गुणवत्तेला डावलले जाऊन अपात्र लोकांना संधी मिळत असून त्यामुळेच समस्या निर्माण होत आहेत व यावर उपाय म्हणजे जातिनिहाय आरक्षण पूर्णपणे नष्ट करून गुणवत्ता हा एकमेव निकष ठेवला जावा असाच सर्व स्पर्धकांचा सूर होता.

याउलट माझ्या भाषणात मी जातीयवादाचा संबंध प्राचीन काळाशी जोडून त्याकाळी चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे शूद्र ठरविल्या गेलेल्या जातींवर इतर तथाकथित उच्च जातींकडून कसा अन्याय झाला वगैरे मुद्दे मांडले होते. जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले माझ्या भाषणात होते. जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हा संदेशही शेवटी होताच. आपले भाषण आऊड ऑफ डेट आहे हे मला जाणवू लागले तसेच इतर स्पर्धकांच्या तूलनेत माझ्या भाषणात अतिशय साधी व अनाकर्षक वाक्ये होती. इथे स्पर्धकांच्या वाक्यांना टाळ्यावर टाळ्या पडत होत्या आणि माझ्या मनावर निराशेचे सावट पडू लागले होते.

तरीही, त्याच मनस्थितीत माझे नाव पुकारले गेल्यावर मी व्यासपीठावर गेलो आणि पाठ केलेले भाषण एका लयीत म्हंटले. अपेक्षेप्रमाणेच पूर्ण भाषणा दरम्यान व भाषण संपल्यावरही सभागृहात स्मशान शांतता होती. इतर स्पर्धकांना हंशा व टाळ्या यांचा भरघोस प्रतिसाद देणार्‍या प्रेक्षकांनी माझ्या भाषणाला अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतले होते. आपला काय निकाल लागणार हे उमजून मी जागेवर जाऊन बसलो.

त्यानंतर परीक्षकांनी आपले मनोगत ऐकवायला सुरूवात केली. त्यांच्या दृष्टीने लोकानुनय करण्यासाठी इतर स्पर्धकांनी जी टाळ्याखेचक वाक्ये भाषणात वापरली होती ती केवळ जनक्षोभ भडकविण्याच्या लायकीची होती. स्पर्धेत अशी भाषणे बाद केली जात असल्याने त्यांचा विचार गुणांसाठी केला गेलेला नव्हता. त्यामुळे अगदी अनपेक्षितरीत्या परीक्षकांनी मला त्या स्पर्धेचा विजेता घोषित केले. त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजता लायन्स क्लबच्या गेट टुगेदर मध्ये मला पारितोषिक स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले गेले.

सायंकाळी मी कार्यक्रमाला निघण्याआधी आई मला म्हणाली, "नेहमीप्रमाणे बोरिंग कपडे घालु नको. तुझ्याकरिता मी नवीन ड्रेस आणलाय तो घालुन जा." हा नवा कोरा ड्रेस म्हणजे गुलाबी रंगाची बॅगी जीन्स पॅन्ट, जिला गुडघ्यावर खिसा, खिशाला एक फ्लॅप, फ्लॅप वर बोटभर लांबीची पट्टी आणि ती पट्टी अडकविण्यासाठी पुन्हा खिशावर एक स्टील ची रिंग आणि या पॅन्ट सोबत भडक काळ्या रंगाचा टीशर्ट, टीशर्ट वर पोटाजवळ अगदी मधोमध कांगारूच्या पोटपिशवीची आठवण व्हावी इतका मोठा खिसा. हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या. पण आईच्या मते क्लबातल्या पार्टीत जायचे म्हणजे असाच "मॉडर्न" ड्रेस हवा. शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला. त्यानंतर माझ्या चेहर्‍यावर बळेच कुठलीशी पावडर थोपली गेली आणि कपड्यांवर परफ्युम शिंपडण्यात आले. कहर म्हणजे पायांत हिरव्या पांढर्‍या रंगातील स्पोर्ट शूज. कारण पार्टीत फॉर्मल शूज बरे दिसत नाहीत. अशा प्रकारे एकदाचा मी माझ्या मातोश्रींच्या अपेक्षेप्रमाणे पार्टी ऍनिमल दिसू लागल्यावरच मला घराबाहेर जाऊ देण्यात आले.

तर अशा अवतारात मी एकदाचा गेट टुगेदरच्या स्थळी ठीक आठ वाजता पोचलो. अर्थात तेव्हा तिथे चिटपाखरूही हजर नव्हते. साडेआठ नंतर हळूहळू एक एक करून मंडळी येऊ लागली. हे सर्व क्लबचे सदस्य होते. त्यांच्या आपसात गप्पा रंगु लागल्या. माझ्या ओळखीचे कोणीच नसल्याने मला अवघडल्यासारखे होऊ लागले.

थोड्या वेळाने एका व्यक्तिने ओरडून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. हा एक मध्यमवयीने इसम दिसत होता. त्याने हातात एक मोठे कापड घेतले होते. दुसर्‍या हातात सीझ फायर सारखे एक उपकरण होते. अर्थात त्याच्या या वस्तुचे नाव वेगळे होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे उपकरण त्याच्या वर्कशॉपमध्ये बनले होते आणि आग विझविण्यासाठी सीझ फायरपेक्षा अनेक पटींनी जास्त कार्यक्षम व स्वस्त ही होते. म्हणजे थोडक्यात तो तिथे त्याच्या उत्पादनाची जाहिरात करीत होता. तरी आता वेळ घालवावा म्हणून मी त्याचा उपद्व्याप पाहत होतो. त्याने बराच गाजावाजा करून आधी ते कापड पेटविले आणि डाव्या हातात धरले. नंतर लोकांचे आपल्याकडे पुरेसे लक्ष आहे ह्याची खात्री करून घेत उजव्या हातातील फायर एक्स्टिन्ग्विशरने त्यावर फवारा सोडण्यास सुरूवात केली. भरपूर फवारा सोडूनही ती आग काही आटोक्यात येईना. नंतर त्याच्या डाव्या हाताला चटके बसू लागले. शेवटी लोक ओरडू लागल्यावर त्याने ते जळते कापड खाली फरशीवर सोडले आणि शेवटी त्यास बुटांच्या साहाय्याने विझविले. त्याची फजिती पाहून लोक फिदीफिदी हसत कुजबुजू लागले.

एक शॉर्ट फिल्म संपली. चला आता पुन्हा कंटाळवाणी प्रतिक्षा असा विचार करून मी एका रिकाम्या जागी जाउन बसू लागलो तोच मला कोणीतरी "हॅल्लो हॅल्लो" करून बोलावते आहे असे जाणविले. आवाजाच्या दिशेने पाहिले असता, एक तरूणी हात करून मला तिच्या जवळच्या रिकाम्या आसनावर बोलावत असल्याचे दिसले. तिने गरबा/दांडिया खेळताना वापरतात तसा भडक जांभळ्या रंगाचा पोशाख (त्यास चणिया चोली का कायसे म्हणतात. अर्थात हे मला तेव्हा ठाऊक नव्हते) परिधान केला होता. तशाच जांभळ्या रंगाची लिपस्टीक व चेहर्‍यावरही खुपसा मेक-अप केला होता. पापण्या व भुवयांसोबतच डोक्यावरचे केसही रंगविलेले होते. तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. अर्थात तेव्हा मी राणी मुखर्जीचा आवाज ऐकला नव्हता). त्या अमराठी तरूणीने मला स्वत:च्या शेजारी बसवून हिंदी-इंग्रजी मिश्र भाषेत संवाद सुरू केला जो मी इथे मराठीत देत आहे.

ती : हाय. नवीन सभासद का?
मी : नाही. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळालेय, ते घ्यायला आलोय.
ती : व्वॉव! अभिनंदन! काय विषय होता?
मी : जातीयवाद - समस्या आणि उपाय.
ती : ????
मी : (घसा खाकरून) जातीय...
ती : बरं ते जाऊ दे. आज रात्री काय प्रोग्रॅम आहे?
मी : रात्री? आता रात्रच नाही काय? आता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपला की सरळ घरी जाऊन झोपणार.
ती : (माझ्या डावीकडून स्वत:चा उजवा हात माझ्या उजव्या खांद्यावर ठेवत) बोरिंग! काहीतरीच... ही काय रात्र थोडीच आहे? ही तर सायंकाळ आहे. आणि आताशी सव्वानऊ वाजतायेत. हा कार्यक्रम साडे अकरा आधी संपत नाही. तू काही दहा वाजता घरी पोचू शकत नाहीस.
मी : (तिने ज्या पद्धतीने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला वेढून घेतले होते तो अनुभव मला एकदम नवीनच होता. त्यामुळे अतिशय गडबडून) काय? छे! इतका उशीर. मला घरी रागावतील. मला निघायलाच हवे. (मी उठून उभा राहू लागलो)
ती : (हातांनी माझा खांदा दाबून मला खाली बसवत) बस रे! असा कसा जातोस? तुझं प्राईझ नाही का घेऊन जाणार? आणि इतका भितोस काय? साडे अकरा म्हणजे काही उशीर नाही. मी तर त्यानंतर एका डान्स पार्टीला जाणार आहे. इन्फॅक्ट मी तुला तेच विचारणार होते. मला कुणी पार्टनर नाहीये. तू होतोस का माझा डान्स पार्टनर?
मी : पण मला दांडिया खेळता येत नाही.
ती : (हसत) तूला कोणी सांगितलं मी तिथ दांडिया खेळणार आहे म्हणून?
मी : तुमच्या ड्रेस कडे पाहून मला वाटलं तसं...
ती : (आणखी मोठ्याने हसत) अरे मला तुम्ही काय म्हणतोस. कॉल मी XYZ (तिने तिचे नाव सांगितले).
मी : बरं, पण मला कुठलाच डान्स येत नाही (मला आता तिथून माझी सुटका करून घ्यावीशी वाटत होती).
ती : अरे त्यात फारसं काही अवघड नसतं, आणि त्यातूनही काही अडचण आलीच तर मी आहेच की तुझ्याबरोबर. बाय द वे तुझं नाव काय?


चे त न


खरं तर माझ्या घशाला इतकी कोरड पडली होती की त्यातून एखादा शब्द मोठ्या मुश्किलीने कुजबुजण्याइतपत आवाजातच निघाला असता. अचानक माझा आवाज इतका मोठा कसा झाला? अर्थात मला जास्त वेळ आश्चर्य करावेच लागले नाही कारण पुन्हा तितक्याच मोठ्याने माझ्या नावाचा पुकारा करणारा आवाज आला आणि माझ्यासह इतर अनेकांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. माझे वडील माझ्याकडे अतिशय रागाने पाहत सभागृहाच्या प्रवेशद्वारातून आत येत होते.

मी चटकन त्या तरूणीचा माझ्या खांद्यावरील हात झटकून टाकीत वडिलांपाशी पोचलो. मला घेऊन ते कार्यक्रमाच्या आयोजकांपाशी गेले आणि म्हणाले, "मी चेतनला इथून घेऊन चाललोय." आयोजक उद्गारले, "अहो, असं काय करता? सकाळी स्पर्धेच्या वेळी आमचे सभासद हजर नव्हते. आता सर्वांनाच चेतन त्याचं सकाळचं भाषण ऐकवेल. मग आम्ही त्याला पारितोषिक देऊ." " हे पाहा. तुम्हाला वेळेवर कार्यक्रम सुरू करता येत नाही की संपवता येत नाहीत. तिकडे सगळे त्याची घरी वाट पाहतायेत आणि इथे तुम्ही अजून त्याला थांबवून ठेवायची भाषा करताय. तुमचं बक्षीस बिक्षीस काही नको आम्हाला. हा मी त्याला घेऊन चाललो." माझ्या वडीलांचा उग्र आवेश पाहून आयोजक बावरले. त्यांनी लागलीच पारितोषिकाची ट्रॉफी माझ्या हाती ठेवली आणि मी वडिलांसोबत घरी निघालो.

घरी पोचेपर्यंत आणि त्यानंतरही वडील घडल्या प्रसंगाबद्दल काहीच बोलले नाहीत. परंतु जे घडले ते त्यांना निश्चितच आवडले नसणार. त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

10 Nov 2011 - 7:49 pm | कपिलमुनी

तुम्ही पिकनिकलासुद्धा फॉर्मल घालता म्हणजे कमाल आहे ..

शाहिर's picture

10 Nov 2011 - 7:52 pm | शाहिर

बाकी जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख : हे पुर्ण पणे चुकिचे आणि एकांगी मत आहे ..
तुम्हाला आवडले नाही म्हणुन त्या पोषाखाला ( जगात बर्याच देशात आवडीने घातला जातो ) सरसकट " विदुषकी" म्हणने चुकिचे आहे ..

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 7:57 pm | चेतन सुभाष गुगळे

<< बाकी जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख : हे पुर्ण पणे चुकिचे आणि एकांगी मत आहे ..
तुम्हाला आवडले नाही म्हणुन त्या पोषाखाला ( जगात बर्याच देशात आवडीने घातला जातो ) सरसकट " विदुषकी" म्हणने चुकिचे आहे .. >>

हो पण आपल्या देशात असा पोशाख परिधान करून मला काय अनुभव आला ते पाहून मी माझ्यापुरते हे मत बनविले आहे.

बाकी खर सांगतो ,

तुम्ही हँडसम दिसत असणार हो ..त्या शिवाय का सिंहीण घायाळ झाली ..

लेख वाचून अंमळ हळवा झालो.

शाहिर's picture

10 Nov 2011 - 7:57 pm | शाहिर

कोणती आठवण आलि कि सिंहीण भेटली नाही याची हळहळ ;)

सिंहाबद्दल ऐकलेल्या कथा - दंतकथांमुळे ;)

५० फक्त's picture

10 Nov 2011 - 10:09 pm | ५० फक्त

का सिंह आणि गा*** कथेमुळे...

कानडाऊ योगेशु's picture

10 Nov 2011 - 7:59 pm | कानडाऊ योगेशु

अर्रर्र.... सुभाषरावांमुळे सिहींणीचे भक्ष्य होण्याची चांगली संधी तुम्ही घालवली म्हणायची... (ह्.घ्या).

त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही >>>

हा हा हा
(पार डोळ्यात पाणी आले हसताना )

परिधान केल्याने विदुषक की पोशाख विदुषक ? ;)

असो......आजवर कुठल्याही विदुषकाला जीन्स टीशर्ट मध्ये पाहिले नाही म्हणु हा प्रश्न पडला असावा मला

सोत्रि's picture

10 Nov 2011 - 8:02 pm | सोत्रि

चेतन,

लेख जरा गोंधळलेला वाटला. सुरुवात चांगली होती, नंतर तरूणीने बोलावल्यावर तर खरी गंमत सुरू होइल असे वाटले होते. ;)

पण शेवट जरा अनपेक्षीत आणी न पटणारा. जी काही घटना सांगीतली आहे त्याचा आणी विदुषकी पोशाख म्हणजेच जीन्स टीशर्ट ह्याचा काही संबंध नाही.

त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.

हा 'मोराल ऑफ द लेख' अजिबात पटला नाही.

- (जीन्स टीशर्ट घालूनही, कुठल्याही तरूणीने (बायकोव्यतिरीक्त) खांद्यावर हात न ठेवलेला) सोकाजी :cry:

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 8:15 pm | चेतन सुभाष गुगळे

<< पण शेवट जरा अनपेक्षीत आणी न पटणारा. >>

जे घडलंय तसं मांडलं. हा काही काल्पनिक लेख नाही. वास्तविक अनुभव आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुम्हाला पटण्यासारखा शेवट व्हावा तर मला काहीतरी वेगळं लिहायला हवं होतं नाही तर वेगळं वागायला तरी.

<< सुरुवात चांगली होती, नंतर तरूणीने बोलावल्यावर तर खरी गंमत सुरू होइल असे वाटले होते. >>

माझ्या जागी तुम्ही असायला हवे होतात, म्हणजे चांगली गंमत अनुभवायला मिळाली असती तुम्हाला.

<< जी काही घटना सांगीतली आहे त्याचा आणी विदुषकी पोशाख म्हणजेच जीन्स टीशर्ट ह्याचा काही संबंध नाही. >>

मला तरी त्यापूर्वी आणि त्यानंतरही फॉर्मल कपड्यांत वावरतो तर असा अनुभव आला नाही. तो अनुभव तश्या पोशाखामुळेच आला असणार असं माझ्या मित्रांचंही मत पडलं. ती मला तिच्या 'टाईप'चा समजली असणार. तिची ही टाइपिंग मिस्टेक व्हायला माझा अवतारच जबाबदार.

शाहिर's picture

10 Nov 2011 - 8:30 pm | शाहिर

मुलींचे टाईप' असतात ( किंवा तुम्ही ते मानता ) असे जे तुम्ही लिहिले आहे त्या बद्दल अधिक जाणून घ्यायच आहे .

उदा : ( तुमच्या मते)
१. मुलींचे किती टाईप असतात ?
२. ते तुम्ही कसे ठरवता ?
३. आपण एखाद्या मुलीच्या टाईप चे आहोत कि नाही हे कसे ठरवणार ??

( आपल्या अभ्यास पूर्ण लेखांबद्दल मला कायम आदर वा टत आला आहे ..या औत्सुक्यापोटी विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही नक्की चांगली उत्तरे द्याल अशी खात्री आहे )

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 9:11 pm | चेतन सुभाष गुगळे

<< १. मुलींचे किती टाईप असतात ? >>
असंख्य

<< २. ते तुम्ही कसे ठरवता ? >>
मी ठरवित नाही.

<< ३. आपण एखाद्या मुलीच्या टाईप चे आहोत कि नाही हे कसे ठरवणार ?? >>
ती जवळपास मध्यरात्रीच्या वेळी कुठे डान्सपार्टीला जाणार होती. मला ते शक्य नव्हते.
तिने तितक्याच सहजपणे मी तिचा डान्सपार्टनर बनणार का असे विचारले. मी असे तिला विचारले नसतेच.
तिला घरून पालकांची कुठलीही आडकाठी नव्हती हे उघड आहे. आमच्या घरी यापेक्षा अतिशय भिन्न परिस्थिती होती.
निदान एवढ्या बाबींवरून तरी तिचा माझा टाईप एक नाही हे मला समजून चूकले.

यकु's picture

10 Nov 2011 - 8:17 pm | यकु

सोकाजींच्या म्हणण्याशी सहमत आहे.
तुमचे पिताश्री मध्ये आले म्हणून वाचलात.. नाहीतर त्या सिंहीणीने तुम्हाला डॅन्स करायला ओढून नेलं असतं.

अवांतर ज्योकः एकदा एका रोटरी क्लब वाल्यांची सभा सुरु होती. एक वक्ता गेल्या कित्येक तासांपासून त्याचे दोन शब्द ऐकवत होता. सगळे कंटाळले होते.. अध्यक्षांनी कित्येकदा घंटी वाजविली होती .
शेवटी श्रोत्यांनीच मंचाच्या दिशेने वस्तू फेकायला सुरुवात केली, गोंधळ वाढला. वक्त्याचे भाषण काही थांबले नाही. त्या गोंधळात कुणीतरी जीव खाऊन फेकून मारलेली चप्पल अध्यक्षाच्या डोक्यात बसली. तो जमीनीवर पडला. पण पडल्या पडल्या म्हणाला -
"आणखी जोरात मारा.. मला भाषण अजूनही ऐकू येतंय..

दादा कोंडके's picture

10 Nov 2011 - 8:07 pm | दादा कोंडके

तुमचं नाव बघुनच अधाशासारखा धागा वाचला आणि निराशा झाली नाही! :)

बाकी तुम्ही वर्णन केलेल्या गुलाबी रंगाच्या प्यांट आणि पोटपिशवी असलेल्या सदर्‍यामध्ये तुम्ही किती स्मार्ट दिसत असाल त्याची कल्पना त्यामुलीने तुम्हाला दिलेल्या वागणुकी वरुनच आली!

तुमच्या वर लावलेल्या फोटोवरून ही घटणा दोन दशाकापुर्वी झाली असं वाटत नाहीय. अर्थात तुमच्याकडुन टंकण्यात वगैरे चूक होउच शकत नाही पण अगदीच रहावलं नाही म्हणून विचारतो.

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 8:48 pm | चेतन सुभाष गुगळे

<< तुमचं नाव बघुनच अधाशासारखा धागा वाचला आणि निराशा झाली नाही! >>

धन्यवाद.

<< बाकी तुम्ही वर्णन केलेल्या गुलाबी रंगाच्या प्यांट आणि पोटपिशवी असलेल्या सदर्‍यामध्ये तुम्ही किती स्मार्ट दिसत असाल त्याची कल्पना त्यामुलीने तुम्हाला दिलेल्या वागणुकी वरुनच आली! >>

:):)

<< तुमच्या वर लावलेल्या फोटोवरून ही घटणा दोन दशाकापुर्वी झाली असं वाटत नाहीय. अर्थात तुमच्याकडुन टंकण्यात वगैरे चूक होउच शकत नाही पण अगदीच रहावलं नाही म्हणून विचारतो. >>

माझे वर लावलेले छायाचित्र दोन वर्षांपूर्वीचे (२००९) आहे. तर सदर उल्लेखित घटना दोन दशकांपूर्वी म्हणजे १९९२ साली घडलेली आहे. यात काही चूकीचे नाही.

दादा कोंडके's picture

10 Nov 2011 - 9:24 pm | दादा कोंडके

तुमच्या आभार प्रदर्शन आणि स्पष्टीकरणाबद्दल मंडळ आभारी आहे.

अन्या दातार's picture

10 Nov 2011 - 8:09 pm | अन्या दातार

बर मग या कथेचा आणि सिंहिणीचा काय संबंध?? :~ :-~ :puzzled:
(सहसा शीर्षक कथा/लेखाशी सुसंगत असणे अभिप्रेत असते, जर इथेही तुमचे काही वैयक्तिक मत असल्यास हॅ हॅ हॅ...........)

स्मिता.'s picture

10 Nov 2011 - 8:15 pm | स्मिता.

ती तरूणी लायन्स क्लबची मेंबर आणि जास्त धीट असल्याने तिला सिंहीण म्हटले असावे.

शाहिर's picture

10 Nov 2011 - 8:21 pm | शाहिर

लायन्स = सिंह

त्या कार्यक्रमामध्ये भेटलेली मुलगी सिंहिण !!

हो क्कि नाय हो गुगळे

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 8:42 pm | चेतन सुभाष गुगळे

<< बर मग या कथेचा आणि सिंहिणीचा काय संबंध?? >>

त्या क्लबात प्रत्येक पुरुषाचा उल्लेख सर्वजण नावाआधी लायन हा शब्द वापरून आणि प्रत्येक स्त्रीचा उल्लेख नावाआधी लायनेस हा शब्द वापरून करत होते.

लायन्स क्लब विषयी इतकी किमान माहिती तरी नक्कीच बाळगणारे मिसळपाव वरील चाणाक्ष वाचक हा संबंध ओळखतील असे वाटले होते. असो.

अन्या दातार's picture

10 Nov 2011 - 10:00 pm | अन्या दातार

>>लायन्स क्लब विषयी इतकी किमान माहिती तरी नक्कीच बाळगणारे मिसळपाव वरील चाणाक्ष वाचक हा संबंध ओळखतील असे वाटले होते. असो.

लायन्स क्लबबद्दल कधीच डीट्टेल माहिती घेतली नाही (नावाच्या आधी ते काय बिरुद मिरवतात वगैरे वगैरे). त्यांच्या कार्याबद्दल तर अद्याप कधीच काही पत्ता लागला नाही. काही पैसेवाल्या लोकांनी एकत्र येण्यासाठी घातलेला घाट वाटत आला आहे.

स्मिता.'s picture

10 Nov 2011 - 8:12 pm | स्मिता.

हे काय? तुम्ही अर्धाच किस्सा सांगितला की किस्स्याचा उत्तरार्ध बदलून सांगितलात?? तुम्ही एकटे गेलेल्या कार्यक्रमात अचानक तुमचे वडील कसे पोहोचले???

एखाद्या तरूणीने खांद्यावर हात ठेवला म्हणून त्यावेळी घातलेल्या प्रकारचे कपडे पुन्हा न घालणारे तुम्ही पहिलेच असाल!

त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही.
म्हणजे जीन्स टीशर्ट घालणारे (माझ्यासकट) सगळे विदुषक असतात असं म्हणायचंय की काय?

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 8:24 pm | चेतन सुभाष गुगळे

<< हे काय? तुम्ही अर्धाच किस्सा सांगितला की किस्स्याचा उत्तरार्ध बदलून सांगितलात?? तुम्ही एकटे गेलेल्या कार्यक्रमात अचानक तुमचे वडील कसे पोहोचले??? >>

जे आणि जसं घडलं ते आणि तसंच सांगितलं. काहीही बदल केलेला नाही. मी कुठे जातो ते घरी सांगूनच. तेव्हाही आणि आताही. आता जर घरी परतण्यास उशीर झाला तर घरचे मोबाईलवर कॉल करतात. तेव्हा आई किंवा वडील थेट घटनास्थळीच माझा शोध घेत येत असत. तसंही कार्यक्रमाचं स्थळ घरापासून जवळच होतं त्यामुळेच वडील मला उशीर का झाला ते पाह्यला आले.

<< म्हणजे जीन्स टीशर्ट घालणारे (माझ्यासकट) सगळे विदुषक असतात असं म्हणायचंय की काय? >>

मला नाही वाटत की माझा तुम्हाला किंवा अन्य कोणाला दुखविण्याचा काही उद्देश होता. १९९२ साली मी माझ्यापुरता असा वैयक्तिक निर्णय घेतला होता. त्या काळाचे संदर्भ लावून पाहाल तर तुम्हाला त्यात फारसं काही चूकीचं वाटणार नाही. या पोशाखाला तेव्हा एका विशिष्ट वर्गातच पाठिंबा होता.

स्मिता.'s picture

10 Nov 2011 - 8:30 pm | स्मिता.

वडिलांचे तेथे येणे पटले. आणि जीन्स टीशर्ट हा त्यावेळी विदुषकी पोषाख वाटला असेल तर ठिक आहे. पण आता तर तसे मत नाही ना?

सोत्रि's picture

10 Nov 2011 - 8:37 pm | सोत्रि

वडिलांचे तेथे येणे पटले

अज्याबत पटले नाही. माझ्यावर आई वडिलांचा विश्वास होता. त्यामुळे ते कधीही माझ्यामागे आलेले मला आठवत नाही. (असो, हे वैयक्तिक मत आहे)

- (आपला विश्वासू) सोकाजी

स्मिता.'s picture

10 Nov 2011 - 9:09 pm | स्मिता.

वडिलांचे येणे पटले म्हणाले कारण त्याकाळी मुलाला घरी यायला जास्तच उशीर झाला तर चौकशी करायला मोबाईल नव्हते. तेव्हा घराजवळच असणार्‍या ठिकाणे वडिलांनी स्वतः येण्याची शक्यता आहे.
तसं तर माझेही वडील कधी माझ्या मागे आलेले मला आठवत नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 8:37 pm | चेतन सुभाष गुगळे

<< आणि जीन्स टीशर्ट हा त्यावेळी विदुषकी पोषाख वाटला असेल तर ठिक आहे. पण आता तर तसे मत नाही ना? >>

मी पुन्हा कुठलाही धोका पत्करायला तयार नाही त्यामुळे तसला पोशाख आता पुन्हा परिधान करणार नाही. त्यामुळे तो कसाही वाटला तरी काय फरक पडतो.

सोत्रि's picture

10 Nov 2011 - 8:28 pm | सोत्रि

जाउद्या हो स्मितातै!

लैच मनावर घेता बुवा तुम्ही. तुमचे ह्यांना 'जीन्स टीशर्ट' खुपच आवडतो हे कळले आम्हला ;)

- (जीन्स टीशर्टच घालणारा आणि तरीही सिंहीण न भेटणारा :cry: ) सोकाजी

स्मिता.'s picture

10 Nov 2011 - 8:38 pm | स्मिता.

लैच मनावर घेता बुवा तुम्ही.
छे छे... मनावर नाही घेतलं हो. पण चेतनरावांना जीन्स टीशर्ट घालणारे विदूषक वाटतात का आणि का वाटतात हा प्रश्न पडला म्हणून विचारलं.

तुमचे ह्यांना 'जीन्स टीशर्ट' खुपच आवडतो हे कळले आम्हला
अरेच्चा! हे कसं काय कळलं राव तुम्हाला?? आमचे हे भेटले की काय? ;)

(जीन्स टीशर्टच घालणारा आणि तरीही सिंहीण न भेटणारा ) सोकाजी
सिंहीण भेटली नाही म्हणून केव्हाचे रडताय... एक काम करा, आतापासून सगळीकडे फॉर्मल घालत चला. कदाचित त्याने सिंहीण भेटेल :-P
(सोकाजी आणि चेतन, दोघांनीही हलकेच घेणे!)

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 8:51 pm | चेतन सुभाष गुगळे

<< पण चेतनरावांना जीन्स टीशर्ट घालणारे विदूषक वाटतात का आणि का वाटतात हा प्रश्न पडला म्हणून विचारलं. >>

तुम्ही ते वाचलं नाहीत का की ती जीन्स पॅन्ट बॅगी होती आणि तिचा खिसा वगैरे.. शिवाय तो पोटपिशवी वाला टीशर्ट...
आणि एक गोष्ट गडबडीत वर्णन करायची राहूनच गेली - तो टीशर्ट त्याकाळच्या लेटेस्ट फ्याशनप्रमाणे लुझर होता...

तो टीशर्ट त्याकाळच्या लेटेस्ट फ्याशनप्रमाणे लुझर होता...

आणि तरीही "माझ्या डावीकडून स्वत:चा उजवा हात माझ्या उजव्या खांद्यावर ठेवत" वगैरे वगैरे झालं ना? कुठला डीओ वापरायचेत तुम्ही तेव्हा?

सोत्रि's picture

10 Nov 2011 - 9:04 pm | सोत्रि

कुठला डीओ वापरायचेत तुम्ही तेव्हा?

फुटलो! वारलो!! खपलो!!!

- (AXE डीओ वापरूनही बघितलेला :cry:) सोकाजी

उद्या तेराव्याचे वडे करायला घ्या कुणीतरी स्कॉचमध्ये बेसन भिजवुन.,

मदनबाण's picture

11 Nov 2011 - 12:02 pm | मदनबाण

सोक्या...
अरे AXE Dark Temptation भारी आहे बघ ! म्हणजे मला तर लयं आवडतो.
तसेच AXE Phoenix किंवा Fever पण ट्राय मारुन पहा. मला पण हे ट्राय मारायचे आहेत.
तू AXE चा कोणता गंध वापरला होतास ?
या सर्वांनी काही फरक पडत नसेल तर झकास पैकी अत्तर वापर ! मस्क अंबर / मजमुआ किंवा दरबार वापरुन पहा.
एकदा अत्तर वापरायची सवय झाली ना की त्याच्यापुढे डिओ,परर्फ्युम काहीच वाटत नाही...
जस्ट ट्राय वन्स... ;)

पाषाणभेद's picture

12 Nov 2011 - 12:11 am | पाषाणभेद

>>> अरे AXE Dark Temptation भारी आहे बघ ! म्हणजे मला तर लयं आवडतो.

अच्छा? पण मला वाटले की AXE हा ब्रांड मुलींना आवडण्यासाठी असतो. नाही म्हणजे काही काही प्रॉब्लेम नाही ना?
:-)
(हघेवेसान)

सुहास झेले's picture

11 Nov 2011 - 12:18 am | सुहास झेले

हा हा हा !!! :bigsmile:

कपिलमुनी's picture

11 Nov 2011 - 6:48 am | कपिलमुनी

डीओ !!!

नाद खुळा.....

बाकी लायन्स क्लबची मेंबरशिप घ्यावी म्हणतो..

कुठला डीओ वापरायचेत तुम्ही तेव्हा?

जांभळ्या पोलक्या वाल्या बैंनी वापरला होता का हे ही विचारुन घ्या लगोलग?
- (मित्रांचे डिओ आलटून-पालटून ढापुन वापरणारा) वपाडाव

(मित्रांचे डिओ आलटून-पालटून ढापुन वापरणारा) वपाडाव

डिओंच्या जाहिरातीचा बराच परिणाम झालेला दिसतोय तुझ्यावर !
सगळ्या डिओंच्या जाहिराती प्रोव्होक करणार्‍या का असतात बरं ? ;)
AXE provoke नविन आलाय बाजारात कोणी ट्राय मारलाय का ? ;)

(AXE Dark Temptation प्रेमी) ;)

lakhu risbud's picture

11 Nov 2011 - 4:03 pm | lakhu risbud

गंधक वरून बघा एकदा.फारच इफेक्टीव आहे.

मदनबाण's picture

11 Nov 2011 - 4:10 pm | मदनबाण

गंधक वरून बघा एकदा.फारच इफेक्टीव आहे.
हे काय आहे ? जरा अधिक माहिती द्या. एखादी लिंक देता आली तर अती उत्तम.

प्रभाकर पेठकर's picture

12 Nov 2011 - 1:51 pm | प्रभाकर पेठकर

वरून बघा, म्हणजे वर लावून बघा, खाली लावू नका. फारच इफेक्टीव्ह आहे म्हणून म्हणतो.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2011 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार

चेतन सुभाष गुगळे's picture

12 Mar 2016 - 7:29 pm | चेतन सुभाष गुगळे

या लेखाला आपण आपल्या मिस्कीली या फेसबुक गटातर्फे झालेल्या स्पर्धेत समाविष्ट करुन "बोलक्या रेषा" हे पुस्तक पारितोषिकादाखल पाठविल्याबद्दल आभारी आहे.

शाहिर's picture

10 Nov 2011 - 8:20 pm | शाहिर

प्र का टा आ

छान लिहीले आहे तुम्ही गुगळे साहेब!!
तुमचा अनुभव तुम्ही जसाच्या तसा लिहीला आहे. तुमचे बरोबर आहे त्यावेळी असे मॉडर्न कपडे घालणारा गोविंदाछापच दिसत असेल. पण आता लोक जे काही नविन पेहराव करतात ती फॅशन झाली आहे!!

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 9:42 pm | चेतन सुभाष गुगळे

<< तुमचे बरोबर आहे त्यावेळी असे मॉडर्न कपडे घालणारा गोविंदाछापच दिसत असेल. >>

धन्यवाद मोहनराव मुद्दा समजून घेतल्याबद्दल...

<< पण आता लोक जे काही नविन पेहराव करतात ती फॅशन झाली आहे!! >>

होय. आता म्हणजे सन २००० नंतर सगळे संदर्भच बदललेत. पूर्वी फक्त एमजी रोड कॅम्प व कोरेगाव पार्क इथेच चित्रविचित्र कपड्यांतले लोक दिसत असतात. आता तर जंगली महाराज रोड, इतकेच काय पेठांमध्येही असे पोशाख सर्रास दिसतात.

इतकेच काय पेठांमध्येही असे पोशाख सर्रास दिसतात.

नेमके कोणत्या पेठेत जाता हो, गुगळे... अन कोरड्या गोष्टी का करता २-४ फटु अपलोडवा जरा...
- (पेठांमधील फटु पाहण्यास आतुर असलेला) वपाडाव

मृत्युन्जय's picture

10 Nov 2011 - 10:27 pm | मृत्युन्जय

१. तुमच्या आईने कुठल्या दुकानातुन टी शर्ट आणि जीन्स खरेदी केली होती?

२. लाय्न्स क्लब्ची मेंबर्शिप कुठे मिळवावी?

३. त्या तरुणीने तुम्हाला केवळ नाचायची विनंती केली होती की त्याबरोबर अजुनही काही ऑफर (पैसे वगैरे) केली होती?

४. तुमच्याकडे तुमच्या भाषणाची प्रत अजुनही आहे काय?

५. सदरहू युवतीची धाकली बहीण किंवा मोठ्या बहिणीची कन्या देखील सिंहीण आहे काय?

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 11:34 pm | चेतन सुभाष गुगळे

१. ठाऊक नाही.
२. ठाऊक नाही.
३. नाही.
४. नाही.
५. ठाऊक नाही.

अन्या दातार's picture

11 Nov 2011 - 8:57 am | अन्या दातार

प्र. २. लाय्न्स क्लब्ची मेंबर्शिप कुठे मिळवावी?
उ. २. ठाऊक नाही.

लायन्स क्लबविषयी इतकी किमान माहितीही सदर 'अभ्यासू' लेखकाला असू नये हे पाहून खेद वाटला
असो, चालायचंच. नाहीतरी घडलेल्या प्रकारामुळे त्यांनी लायन्स क्लबला कायमचा राम राम ठोकला असण्याची शक्यता नाकारता येत नाही

रामपुरी's picture

11 Nov 2011 - 12:14 am | रामपुरी

छान करमणूक करणारा लेख...

१९९२ मध्ये जीन्स / टि-शर्ट हा एका विशिष्ट वर्गाचाच पोषाख होता हे तुम्हाला कुणी सांगितलं? कि ते पण तुमचं वैयक्तिक मत???

या अनुभवातून नक्की काय सांगायचं आहे?

१. मी कधीच असला पोषाख घालत नाही.
२. मी नेहेमीच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो
३. अर्रर्र थोडक्यात 'चान्स' हुकला
४. मलाही 'चान्स' मिळाला होता पण मी 'त्यातला' नाही
४. आम्ही अगदीच भोटम नाही आम्हाला पण मुली भेटल्यात म्हटलं
५. जीन्स / टि-शर्ट घालणारे सगळेच विदूषक असतात
६. जे "फॉर्मल अटायर" परीधान करतात तेच सज्जन असतात. बाकी सगळे चालू असतात.
७. वरील सर्व
८. वरील सर्व + आणखी बरेच काही

:) :) :)

४. मलाही 'चान्स' मिळाला होता पण मी 'त्यातला' नाही
४. आम्ही अगदीच भोटम नाही आम्हाला पण मुली भेटल्यात म्हटलं

आम्हाला तर लेखाचा रोख वरचे दोन मुद्दे सांगणारा वाटला. अर्थात हे आमचं वैयक्तिक मत आहे. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Nov 2011 - 2:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्यांचे वय वर्षे 13 होते तेव्हा. वरच्या दोन मुद्द्यांना फार अर्थ नाही त्या वयात.
तेराव्या वर्षी चान्स घेऊन पण काय केले असते? विशेषत: ते गुगळे होते हे लक्षात घेऊन (म्हणजे सभ्य, सात्विक, नैतिक वगैरे वगैरे)

चुक. त्यांचे वय साडे तेरा होते, तेरा नाही.
आणि त्यांनी हा विदा आज दिला. मी प्रतिसाद काल दिला होता.

बाकी ते गुगळे होते हे लक्षात घेऊन (म्हणजे सभ्य, सात्विक, नैतिक वगैरे वगैरे) यातल्या शब्दाशब्दाशी सहमत. :)

चेतन सुभाष गुगळे's picture

11 Nov 2011 - 11:24 am | चेतन सुभाष गुगळे

<<नेहेमीप्रमाणेच छान करमणूक करणारा लेख... >>

धन्यवाद.

<<या अनुभवातून नक्की काय सांगायचं आहे? >>

http://www.misalpav.com/node/19536#comment-348622 इथे महिलांच्या धिटाईविषयी एक शंका व्यक्त केली गेली होती. तिला उत्तर देण्यातून ह्या धाग्याची निर्मिती झाली आहे. (मुख्य उद्देश)

<< १. मी कधीच असला पोषाख घालत नाही.
२. मी नेहेमीच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो >>

http://www.misalpav.com/node/19536#comment-348629 इथे श्री. यशवंत एकनाथ कुलकर्णी यांनी माझ्या स्वभावाला मीटर्बाज असं विशेषण वापरलंय. माझा स्वभाव असा का घडत गेला याविषयीही या लेखात जाता जाता शेवटच्या ओळींमधून सांगायचा प्रयत्न केला. (दुय्यम उद्देश)

याव्यतिरिक्त कुठलाही उद्देश नाही.

साला, काय साधकबाधक चर्चा चालू आहे या धाग्यावर. असे विचारप्रवर्तक धागे रोज यावेत, लोकांनी हिरिरीने आपली मते मांडावीत आणि धागा प्रवर्तकानेही (आपल्याला सोयीच्या वाटणार्‍या) प्रतिसादांना तितक्याच हिरीरीने उत्तरे दयावीत. मग माय-मराठीला मुळीच मरण नाही.

पुष्करिणी's picture

11 Nov 2011 - 1:17 am | पुष्करिणी

आता फॉर्मलमधे गुलाबी रंगाचं काही घेउ नका...जीन्स गुलाबी असल्यानं असं झालं असावं कदाचित

पाषाणभेद's picture

11 Nov 2011 - 1:26 am | पाषाणभेद

चेतनजी आपण मिपावरील सर्वात आदर्श व्यक्तिमत्व आहात. आपणाकडून असलेच चांगले चांगले लेख अनुभव वाचायला मिळो व ते लिहायला आपणाला वेळ मिळो या सदिच्छा.

बाकी दोन दशकांपुर्वी आम्हीही निगडीत फिरत होतो. आपण भेटले असता तर आमचेही कल्याण भिवंडी झाले असते. आम्हालाही सिंहीणीच्या गुहेत डोकवायला भेटले असते.

शिल्पा ब's picture

11 Nov 2011 - 2:22 am | शिल्पा ब

गुलाबी पँट? तरी मुलगी तुमच्यावर लाईन मारत होती? गुलाबी पँट घातल्याने पुरुष विदुषकी दिसत असावा..अजुन कोणालाही गुलाबी पँटात पैलं नै.

बाकी लैच आगाउ पोरगी होती म्हणा ना!!

मन१'s picture

11 Nov 2011 - 7:14 am | मन१

ह्यावरून आठवला तो म्हणजे मिपावरील अजून एक दिग्गज लेखक श्रीराम दिवटे ह्यांचा लेख "स्त्रिया सुद्धा गैरफायदा घेतातच"(http://www.misalpav.com/node/16674).
लेखन एका वेगळ्याच उंचीवर पोचलेलं दिसत आहे.

नगरीनिरंजन's picture

11 Nov 2011 - 8:18 am | नगरीनिरंजन

तुफान विनोदी किस्सा. हहपुवा झाली.
श्री. गुगळे यांनी विनोदी लेखनावरचेही आपले प्रभुत्व सिद्ध करून आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत असे म्हणावे लागेल.
शिवाय आपल्या भाषणाला अनपेक्षितपणे बक्षीस मिळाले असे म्हणण्यात, गुलाबी पँट आणि काळे लूझर घालून आपण गमतीदार दिसत होतो असे म्हणण्यात आणि कुठेही ती मुलगी आपल्यावर लट्टू झाली होती असा उल्लेख न करण्यात त्यांची नम्रता दिसून येते.
हॅट्स ऑफ.

चेतन सुभाष गुगळे's picture

11 Nov 2011 - 11:34 am | चेतन सुभाष गुगळे

माझे या संस्थळावरील एक परममित्र जे माझ्या बहुतेक धाग्यांवर (मग भले तो http://www.misalpav.com/node/18987 इतका मोठा का असेना) आवर्जून प्रतिसाद देतात, त्यांचा या धाग्यावर मात्र अजून प्रतिसाद आला नव्हता; आपल्या प्रतिसादाने मात्र त्यांच्या प्रतिसादाची उणीव भरून काढली असेच म्हणतो.

आभारी आहे.

चित्रा's picture

11 Nov 2011 - 8:31 am | चित्रा

आईने कपड्यांची तयारी करून दिली. तुम्ही ते कपडे घातले. आईने पावडर लावून दिली.
वडिल आणायला आले. तुम्ही त्यांच्याबरोबर खळखळ न करता गेलात.

वय काय होते हो तुमचे?

शिल्पा ब's picture

11 Nov 2011 - 8:38 am | शिल्पा ब

ते अजुनही असेच वागतात (असा आमचा संशय आहे.

चित्रा's picture

11 Nov 2011 - 8:46 am | चित्रा

लेखकाचे आजवरचे धाडस बघता आश्चर्यचकित होण्यासारखे आहे खरे.

चेतन सुभाष गुगळे's picture

11 Nov 2011 - 11:06 am | चेतन सुभाष गुगळे

तेव्हाचे माझे वय वर्षे साडे तेरा फक्त. मी इयत्ता नववीत शिकत होतो.

@ चेतन जी
याउलट माझ्या भाषणात मी जातीयवादाचा संबंध प्राचीन काळाशी जोडून त्याकाळी चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे शूद्र ठरविल्या गेलेल्या जातींवर इतर तथाकथित उच्च जातींकडून कसा अन्याय झाला वगैरे मुद्दे मांडले होते. जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले माझ्या भाषणात होते. जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हा संदेशही शेवटी होताच. आपले भाषण आऊड ऑफ डेट आहे हे मला जाणवू लागले तसेच इतर स्पर्धकांच्या तूलनेत माझ्या भाषणात

फक्त साडे-तेरा वर्षाचे असुन तुम्ही अश्या प्रकारचे भाषण स्वतः लिहील ?
काय म्हणावे तुमच्या बुद्धीमतेला तोड नाही.
आम्ही तर कॉले़जात असताना देखील सर्/म्याम ने तय्यार करुन दिलेले आयते भाषण घोकमपट्टी करण्याकरिता सहज ८-१५ दिवस घालवायचो ( कमाल आहे बुवा तुमची) :)
असो .

आम्ही तर कॉले़जात असताना देखील सर्/म्याम ने तय्यार करुन दिलेले आयते भाषण घोकमपट्टी...................

आपणही कॉलेजात गेलो होतो हे दाखवीण्याचा क्षीण प्रयत्न... ;)

गणपा गुर्जी, आपण कालेजात गेलो होतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न नाही तो, आपल्या कालेजात फक्त सर नव्हते तर म्याव
म्हणजे म्याम पण होत्या हे दाखवण्याचा स्त्युत्य उपक्रम आहे तो.

लेख छान आहे...
आज मी हापिसात जीन्स टी-शर्ट घालुन पोहचलोय ! ;)

तुम्ही गोग्गोड असल्याशिवाय कोणतीही तरुणी जवळ येणार नाही...हात लावणं तर दुरच.

तुम्ही गोग्गोड असल्याशिवाय कोणतीही तरुणी जवळ येणार नाही...हात लावणं तर दुरच.

हा प्रतिसाद मला असल्यास्,शुक्रवारी हापिसात तुम्हाला आवडती वेशभूषा करण्याची परवानगी असते म्हणुन.

शिल्पा ब's picture

11 Nov 2011 - 9:48 am | शिल्पा ब

बॉरं!! मला वाटलं या लेखाने तुम्ही प्रभावित होऊन बदललात की काय!!

बाकी एरवी आठवडाभर तुम्हाला हापिसात युनिफॉर्म असतो का? नै, शाळेत असताना आम्हालाही अशीच एक दिवस सुट असायची हे आठवलं म्हणुन विचारलं.

मदनबाण's picture

11 Nov 2011 - 9:56 am | मदनबाण

बॉरं!! मला वाटलं या लेखाने तुम्ही प्रभावित होऊन बदललात की काय!!

आम्ही दुसर्‍यांना प्रभावित करतो... ;)
बाकी एरवी आठवडाभर तुम्हाला हापिसात युनिफॉर्म असतो का? नै, शाळेत असताना आम्हालाही अशीच एक दिवस सुट असायची हे आठवलं म्हणुन विचारलं.

इतर दिवशी फॉरमल कपडे घालावेत्...शुक्रवारी यात सुट असते, फक्त टी-शर्ट घातला तर तो कॉलरवाला असावा, असे बंधन आहे.
या नियमा विषयी कंपनीने मध्यंतरी इंटर्नल सर्व्हेपण घेतला होता....
थोडक्यात पॉलिसी ! पॉलिसी खेळणे...
अप्रेझल,प्रमोशन... या वेळी सर्व पॉलिसी फाट्यावर मारण्यात येतात... हे सांगायला हवे काय ? ;)

मराठी_माणूस's picture

11 Nov 2011 - 10:14 am | मराठी_माणूस

इतर दिवशी फॉरमल कपडे घालावेत्...शुक्रवारी यात सुट असते

आमच्या कडे पण अशी सुट असते.
शुक्रवारी आमच्या कडे झाडुन सगळे , जीन्स , टीशर्ट, स्पोर्टस् शूज अशा गणवेषात येतात, जणू काही तो नियम आहे.

शुक्रवारी आमच्या कडे झाडुन सगळे , जीन्स , टीशर्ट, स्पोर्टस् शूज अशा गणवेषात येतात, जणू काही तो नियम आहे.
खी खी खी... पाखरं तर अगदी नट्टा-पट्टा करुनश्यान येतात... या दिवशी असे बनुन येण्यासाठी बहुतेक त्या आठवडाभर तयारीच करत असतात ! असा मला दाट संशय आहे. ;)
नविन जॉइन झालेली पाखरं... जाउ दे या विषयी मौन बरे ! ;)

हाहाहा... अगदी अगदी... आम्ही तर ज्युनियर पोरांना कामाला लावून या फुड कोर्टमधून त्या फुडकोर्टमध्ये चकरा मारत असतो... काही चांगलं दिसतंय का ते पाहायला ;)

मराठी_माणूस's picture

11 Nov 2011 - 10:51 am | मराठी_माणूस

पाखरांचे ठीक आहे. पण शिंग मोडुन वासरात शिरणार्‍या गाईंची (बैलांची सुध्दा) गंमत वाटते. किमान आपल्याला शोभते किंवा नाही हे पण पहात नाहीत. सुट (सवलत ह्या अर्थि) दिलि म्हणजे तिचा उपयोग केलाच पाहीजे असे काही नाही.

मदनबाण's picture

11 Nov 2011 - 10:55 am | मदनबाण

पाखरांचे ठीक आहे. पण शिंग मोडुन वासरात शिरणार्‍या गाईंची
खीक... खीखीखी. ;)
तरी सुद्धा त्यांना वाटतं की आपण "माल" दिसतो ! ;)
उगाच काहीही अंगावर चढवुन मिरवत फिरतात !

उगाच काहीही अंगावर चढवुन मिरवत फिरतात !

अचुक निरिक्षण ;)

धन्या's picture

11 Nov 2011 - 10:28 am | धन्या

इतर दिवशी फॉरमल कपडे घालावेत्...शुक्रवारी यात सुट असते, फक्त टी-शर्ट घातला तर तो कॉलरवाला असावा, असे बंधन आहे.

बहुतेक सगळ्या येमेन्शीमध्ये असंच असतं रे... मी तुमच्या हापिसात होतो तेव्हाही हा नियम होता आणि आता इकडे दुसर्‍या हापिसातही हाच नियम आहे.

बाकी आज कुणी पोरीने तुझ्या डाव्या बाजूने तुझ्या उजव्या खांद्यावर तिचा उजवा हात ठेवला तर ते इथे सांगायला विसरु नको बरे. ;)

बाकी आज कुणी पोरीने तुझ्या डाव्या बाजूने तुझ्या उजव्या खांद्यावर तिचा उजवा हात ठेवला तर ते इथे सांगायला विसरु नको बरे.
हॅहॅहॅ... साहेब. घरी दोन घास सुखाचे जेवायला मिळतात्,त्यावर कशाला गदा आणता ? ;)

मदनबाण's picture

11 Nov 2011 - 10:43 am | मदनबाण

*

गवि's picture

11 Nov 2011 - 9:49 am | गवि

त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.

याने काही होणार नाही.. जातीचा देखणा लुंगीतही देखणाच दिसतो...

त्यामुळे अगदी फॉर्मल अटायर परिधान केलेत तरी एखादी वाघीण पाघळून जवळ येऊन तुमच्या फॉर्मल अटायरचा कंठलंगोट पकडून "ओह कम्मॉन ब्लू आईड टायगर.. लेट मी टीच यू साल्सा.." असं घोगर्‍या आवाजात म्हणेल.. :)

चेतन सुभाष गुगळे's picture

11 Nov 2011 - 11:40 am | चेतन सुभाष गुगळे

<< लेख आवडला आहे. >>

धन्यवाद.

<< याने काही होणार नाही.. जातीचा देखणा लुंगीतही देखणाच दिसतो... >>

यावर आता तुमचा एखादा अनुभव इथे मांडा की.

<< "ओह कम्मॉन ब्लू आईड टायगर.. लेट मी टीच यू साल्सा.." असं घोगर्‍या आवाजात म्हणेल >>

पण शंका
१. माझे डोळे काळे आहेत.
२. शिवाय साल्सा करिता आधी वेटलिफ्टींग शिकावं लागेल ना?

:)

यावर आता तुमचा एखादा अनुभव इथे मांडा की.

तामिळनाडूत असताना लुंगी नेसून पिक्चरला जायचो तेव्हा रस्त्यात असंख्य स्वर्नलथा, अन लक्स्मीप्रिया माझ्याकडे बघूही शकायच्या नाहीत.. तेजस्वीपणा.. दुसरं काय?

शिवाय साल्सा करिता आधी वेटलिफ्टींग शिकावं लागेल ना?

हा हा हा..

तेही खरंच.. पण ती एकदम शेलाट्या बांध्याची स्लिम असेल तर फार प्रॅक्टिस लागू नये..
पण साल्सा म्हणजे मज्जा राव.. आणि शिकताना तर खूपच मज्जा..
..चुका होतात नं सुरुवातीला..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Nov 2011 - 2:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>> पण साल्सा म्हणजे मज्जा राव.. आणि शिकताना तर खूपच मज्जा.. ..चुका होतात नं सुरुवातीला..
अरे व्वा, शिकायला पाहिजे. माणूस हा अनंतकाळचा विद्यार्थी असतो असे म्हणतात.

(स्लो लर्नर) विमे