"
चंद्रकांत तुकाराम कुंजीर (वय 51, रा. भारती विद्यापीठामागे, कात्रज) हे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. 2004 मध्ये याच महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. एका खासगी कंपनीत नोकरीस असलेली ही तीस वर्षीय तरुणी सप्तरंग आकाश, भेकराईनगर, फुरसुंगी येथे राहते. कुंजीर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडल्यामुळे तिने टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे त्यांच्या मुलाची कुमारी माता होण्याची इच्छा व्यक्त केली. कुंजीर व तरुणीच्या नातेवाइकांनी समजूत काढूनसुद्धा ती बधली नाही. ऐकले नाही तर बदनामी करीन किंवा स्वतःचे बरेवाईट करण्याच्या धमक्या तिने दिल्या. त्यामुळे कुंजीर तयार झाले. लक्ष्मी रस्त्यावरील एका रुग्णालयात झालेल्या प्रक्रियेअंती ती गरोदर राहिली. पण या बाबीला कुंजीर यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. अशातच ती तरुणी पडल्याने गर्भपात झाला. कुंजीर व त्यांच्या नातेवाइकांनी मारहाण केल्यामुळे गर्भपात झाल्याची फिर्याद तिने दिली. त्यानंतरही तिने त्रास देणे सुरूच ठेवले. तिने फ्लॅटची मागणी केल्यामुळे तिला फ्लॅट घेऊन दिला. धमक्यांना घाबरून पुन्हा या प्रक्रियेसाठी मदत केली. या वेळी तिने स्वतःचे नाव शीतल चंद्रकांत कुंजीर असे नोंदविले. पण ही गर्भधारणाही टिकली नाही. पुन्हा अशीच प्रक्रिया करण्याची मागणी केल्यानंतर नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या या तरुणीने त्यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दिली. यामध्ये कुंजीर यांना अटक झाली. दरम्याच्या काळात तिने कुंजीरऐवजी दुसऱ्याच पुरुषाची मदत घेतली आणि तेच कुंजीर आहेत, असे भासवून डेक्कन येथील रुग्णालयात पूर्वीच्या प्रक्रियेच्या वेळी घेतलेले कुंजीर यांचे वीर्य घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली. ही बाब लक्षात आल्यानंतर कुंजीर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या तरुणीविरुद्ध फसवणुकीचा, तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ती काम करीत असलेल्या कंपनीत तिला अटक करण्यासाठी पोलिस गेले असता ती फरारी झाल्याचे आढळून आले.
वाचने
6021
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वर्तमानपत्रामधील बातमीवरून
बर. मग आपण सगळ्यांनी मिळून
पत्रकार, अहो असं बोलायचं
In reply to बर. मग आपण सगळ्यांनी मिळून by यकु
असं ओ काय, तुमचिच स्वाक्षरी
In reply to बर. मग आपण सगळ्यांनी मिळून by यकु
संदेश!
In reply to बर. मग आपण सगळ्यांनी मिळून by यकु
ए गोट्या !!! पिळु का तुला?
In reply to बर. मग आपण सगळ्यांनी मिळून by यकु
अभियांत्रिकी महाविद्यालयात
In reply to ए गोट्या !!! पिळु का तुला? by वपाडाव
काचा फुटतील रे !!!
In reply to अभियांत्रिकी महाविद्यालयात by मदनबाण
तरीच म्हणलं तुला इतक्या जाड
In reply to काचा फुटतील रे !!! by वपाडाव
अरे टेस्ट ट्युबची साईज ती काय
In reply to तरीच म्हणलं तुला इतक्या जाड by मदनबाण
अरे टेस्ट ट्युबची साईज ती काय
In reply to अरे टेस्ट ट्युबची साईज ती काय by ५० फक्त
काय रे..... जवळचा चष्मा नाही
In reply to अरे टेस्ट ट्युबची साईज ती काय by मदनबाण
काय रे..... जवळचा चष्मा नाही
In reply to काय रे..... जवळचा चष्मा नाही by वपाडाव
प्राध्यापक
१) कुंजीर यांच्यात न्यूटन
" कुंजीर यांच्यात न्यूटन
हम्म, सध्या अशा विशयांवर भाष्य करायच नाही असं ठरवलं आहे