अमेरिकन बोईंग च्या एकतर्फी साम्राज्याला शह द्यायला सुरवात म्हनुन युरोपियन युनियन च्या एरबस ने केली. ह्याचा एक भाग म्हणून बोईंग च्या ७४७ चा टक्कर देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या विमान निर्मितीची योजना केली. नकटी च्या लग्नाला विघ्ने का काय म्हणतात तसे ह्यांचा उड्डाणाला विलंब झाला.( काही प्रसारमाध्यमांनी हा पांढरा हत्ती उडणार कधी अशी त्याची कुचेष्टा सुरु केली.)
पण ह्या ऐरावताचे पहिले उड्डाण पेरीस वरून लंडन च्या हिथ्रो वर आगमनाची तारीख पक्की ठरली.
ते वर्ष २००६ चे होते.. हित्रो लगत मोठ्या इमारती नसल्याने फक्त चार आणी पंचतारांकीत हॉटेलातील उंच इमारतीमधून हा लेंडिंग सोहळा प्रत्यक्ष पहाणे नशिबी होते.
टेलीविजन मिनिटा मिनिटाची खबरबात देत होते.. विमान चार्ल्स दे गौले वरून यशस्वी रीत्या अवकाशात झेपावले. तेव्हा तेथील जनतेचा, विमान निर्मिती करणाऱ्या. सदस्यांचा आनंद अवर्णनीय होता. हा युरोपच्या इभ्रतीचा, अभिमानाचा प्रश्न होता. एकेकाळी जगाला नवीन नवीन सर्वोत्तम गोष्टी देणारा युरोप मधल्या काळात अमेरिका व जपान च्या उत्तुंग यशाने झाकळून गेला होता. आज हवाई प्रवासाला कलाटणी देणारा शतकामधील सर्वोत्तम क्षण होता. सर्व श्रेणी मध्ये ५५५ आसन शमता असलेले हे विमान इंधन बचत व कमी आवाज करणारे पर्यावरणाच्या अनकूल होते. हवाई प्रवास आता १६ तासाचा तोही सलग सुरु झाला त्यामुळे त्यात नुसता प्रवासापेक्षा प्रवाश्यांना इतर सुविधा देणे क्रमप्राप्त झाले. जगात करोडपतींची संख्या वाढत असल्याने त्यांना व्यापारी श्रेणीत जास्त सुविधा देणे ओघाने आले. ह्या सर्व मागण्या हे विमान पूर्ण करणारे होते.. एमिरात ने आता ह्या विमानात स्पा निर्माण केला आहे. ओर्गेनिक खाद्य पदार्थ , जगातील उंची मद्ये असलेले बार आणी अनेक सोयी येत्या काळात ह्या विमानात येणार आहेत. ह्या बाबतीत जगातील सर्वोत्तम विमान कंपन्यामध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.
आम्ही हॉटेलचा सर्व कर्मचारी वर्ग हिल्टन च्या गच्चीवर गेलो. दुसर्या महायुद्धातील कट्टर वैरी जर्मनी व फ्रांस व एरवी अमेरिकेचा कच्छपी असलेला व युरोपियन असून युरो न स्वीकारलेला ब्रिटन व स्पेन ह्या देशांनी एकत्र येऊन ही विमान निर्मिती केली होती. हे विमान जेव्हा अवकाशातून हित्रोवर आले तेव्हा एकच जल्लोष झाला.
गरुडा सारखे त्यांचे आगमन झाले. ह्या संबधी घरी बाबांशी बोललो तेव्हा त्यांनी रामदास काका म्हणतात तसे त्यांनी जंबो दर्शनची गोष्ट सांगितली होती.
जंबो ते सुपर जंबो हे दोन पिढीतील अंतर ,मानवी प्रगतीचा चढता आलेख दर्शवितो.
ह्या विमानात इतर विमानांचा तुलनेत ५०% जास्त फ्लोवर शमता असली तरी केवळ ३५ % जास्त प्रवासी प्रवास करू शकणार होते. विमानात सर्व श्रेणीच्या सीट्स मोठ्या आहेत. ह्या विमानाचा उड्डाण मार्ग जगातील सर्वात जास्त रहदारी असणार्या हवाई मार्गावर असल्याने निकोप स्पर्धा निर्माण होऊन विमान प्रवासाचे दर कमी होतील ही आशा आहे. दुर्दैवाने मंदीमुळे विमान कंपन्या व जगातील सरकार हवालदिल झाले आहेत. व प्रवास महागला.
( भारतात ह्या विमानाचे नियमित उड्डाण अमेरिका व युरोपियन खंडात सुरु झाले तर हवाई प्रवास नक्कीच स्वस्त होईल.) मात्र नुकतेच लुफ्तांजा ने म्युनिच आणी फ्रांक फ्रुट ते दिल्ली ह्या वाढत्या हवाई प्रवासाठी ह्या सुपर जंबो विमानाची निवड केली. पण दुर्दैवाने आपल्या कडून ही मागणी साफ नाकारल्या गेली ( आणी ह्या विमानाचे भारतातील आगमन बोंबलले ) ह्यामागील कारण देतांना आपले मंत्रालय मत...
बोईंग चा विमानापेक्षा १४९ आसन शमता असलेले हे सुपर जंबो भारतात आले तर भारतीय कंपन्या ज्या ७०% बोईंग वापरतात त्यांचावर विपरीत परिणाम होईन. किंग फिशर ने ह्या विमानाची २००८ मधेच ओर्डेर दिली होती मात्र आता त्यांचा निर्णयावर पुनर्विचार करायला त्यांना भाग पाडले जात आहे.( अजून एक कारण आपले विमानतळ ह्या विमानाच्या लायकीचे नाही हे कारण दिले जाते )
मात्र एरबस खुद हे आरोप नाकारते. दिल्ली विमानतळ हे ह्या सुपर जंबो साठी सर्वथा योग्य आहे. तर बाकीच्या प्रमुख विमातळावर काही तांत्रिक बदल केले तर ते सुद्धा कार्यरत होतील ( आता मुंबई विमानतळ जर स्वतःचा हक्काच्या जमिनीवरील बांगलादेशी व इतर उपर्या लोकांचे निवासस्थान मानवी हक्काचा उदार दृष्टीकोनातून ( काही दुष्ट लोक त्याला मताचे राजकारण म्हणतात ) हटवू शकत नाही.
तरी नवीन मुंबईत नवीन विमानतळ उभारतांना ह्या सोयी नक्कीच देऊ शकतात.( जगातील सर्वोत्तम असा फोर्मुला १ चा ट्रेक आपण बनवू शकतो त्याचा शेजारी भविष्यात जेपी ग्रुप क्रीडा नगरी ज्यात १ लाख आसन क्षमतेचे क्रिकेट स्टेडीयम बनवण्याची योजना राबवत आहे ) उभारली जात आहे तेथे अद्यावत विमानतळ बांधणे काहीच अवघड नाही.
मात्र जर भारतीय कंपन्या जर एरबस कडून अ३८० विकत घेऊ लागले तर बोईंग च्या भारतातील बाजार पेठीला प्रचंड धक्का बसेल.
भारतीय प्रवाशांचे काय
त्यांना हवाई प्रवासाची खाज असेल तर तर चार दिडक्या जास्त देतील.) जगातील सर्व प्रमुख हवाई कंपन्या आता ए ३८० ला पंसती देत आहेत. २००३ पासून एरबस ला बोईंग पेक्षा जास्त ओर्डेर संपूर्ण जगातून येत आहेत. आम्ही मात्र अजूनही..
बोईंग कशाला ३८० च्या तोडीस तोड विमान बनवेल. आपल्या सारख्या देशातील एकनिष्ठ बाजारपेठ त्यांचा दिमतीला आहेतच.
आज एमिरात व लुफ्तांजा ह्यांना भारतात हे विमान आणायचे आहे. मात्र एमिरात ने हे विमान आणले तर किंग फिशर व जेट ला सुद्धा हे विमान घ्यावे लागेल नी मग एर इंडिया ह्या पांढर्या हत्तीला सुद्धा ..पण त्याने भारत ते आखात प्रवास केवढा स्वस्त होईन व्यापार नी पर्यटन किती पटीने वाढेन. ह्याचा विचार कोण करेन.
त्या दुबई ची एमिरात किंवा अबुधाबी ची etihad किंवा साउथ कोरियन ह्या अमेरिकन धार्जिण्या देशांनी सुद्धा ए ३८० ला पसंती दिली. मात्र आम्ही अजूनही स्वतःची लायकी असून जगाच्या मागे राहत आहोत.
आज खरे तर देशा अंतर्गत हवाई प्रवासात युओपियान कंपन्यापेक्षा आपली किंग फिशर किंवा जेट अनेक पटीने उत्तम आहे.( आमचे कुटुंब लुफ्तांजा पेक्षा किंग फिशर ला पसंती देते. )
डिसेंबर ला भारतात येतांना आणी भारतातून दिल्ली व राजस्थान फिरण्यासाठी किंग फिशर ह्या पंच तारांकित हवाई कंपनीला पर्याय नाही. त्यांच्या भात्यात २०१४ ला सुपर जंबो येणार अशी बातमी आहे. देव करो आणी ह्या जंबो चे भारतात आगमन होवो.
वाचने
8494
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
चिरोटे साहेब भारतातील भाडेवाढ
In reply to मस्त by चिरोटा
लेख आवडला. १६ तास सलग प्रवास
एयर इंडिया
In reply to लेख आवडला. १६ तास सलग प्रवास by रेवती
हो, सगळ्या आज्ज्याच
In reply to एयर इंडिया by स्मिता.
नाही. किंबहुना A380 पहिलेच
In reply to लेख आवडला. १६ तास सलग प्रवास by रेवती
धन्यवाद लंबू.
In reply to नाही. किंबहुना A380 पहिलेच by लंबूटांग
जम्बो नाही तर नाही...पण
मस्त लेख...
+१
In reply to मस्त लेख... by योगी९००
आधी
In reply to +१ by स्पा
म्हणजे काय बुआ ?
In reply to आधी by कुंदन
पारपत्र म्हणजे पासपोर्ट
In reply to म्हणजे काय बुआ ? by निनाद मुक्काम …
भारतात जाणार होतो तेव्हा केट
चीचुन्द्र्या ..??
In reply to भारतात जाणार होतो तेव्हा केट by निनाद मुक्काम …
चिचुंद्री हा उंदरांच्या महिला
In reply to चीचुन्द्र्या ..?? by योगी९००
निनाद - खूप छान नि
निनाद - खूप छान नि
हॉटेल मधे सेवा देणारे
एअर इंडिआतल्या क्रुचा काका,
In reply to हॉटेल मधे सेवा देणारे by मराठी_माणूस
मला याचे कारण असे वाटते की,
In reply to एअर इंडिआतल्या क्रुचा काका, by मदनबाण
सुरक्षितता..
-१
In reply to सुरक्षितता.. by प्रभाकर पेठकर
उद्बोधक..
In reply to -१ by गवि
एअर इंडिया आणि इंडियन
In reply to उद्बोधक.. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद...
In reply to एअर इंडिया आणि इंडियन by गवि
मेले! मेले! माझं एयर इंडियाचं
In reply to एअर इंडिया आणि इंडियन by गवि
गवी ह्यांच्या एअर इंडिया
787 Dreamliner
In reply to गवी ह्यांच्या एअर इंडिया by निनाद मुक्काम …
माहितीपर लिखाण आवडले .
लेखात A380 व बोईंगच्या
@दिल्लीचे विमानतळ ('हवाईअडडा'
In reply to लेखात A380 व बोईंगच्या by प्रदीप
+१
In reply to @दिल्लीचे विमानतळ ('हवाईअडडा' by निनाद मुक्काम …
विकीबाबा ए ३८० च्या संधर्भात
In reply to +१ by लंबूटांग
काही उत्तरे
In reply to @दिल्लीचे विमानतळ ('हवाईअडडा' by निनाद मुक्काम …
787 हे पूर्णपणे वेगळ्या
In reply to काही उत्तरे by प्रदीप
अरे कर्मा असे असेल तर माझा तो
787 Dreamliner continued
- 747X जे 747 400 पेक्षा थोडे लांब पण थोडे जास्ती fuel efficient
- Sonic Cruiser जे आवाजाच्या वेगाच्या ९८% वेगाने जाऊ शकेल (Mach 0.98) परंतु 767 ह्या छोट्या विमानाइतकेच इंधन वापरेल.(Sonic Cruiser हे आपल्या नेहेमीच्या विमानपेक्षा वेगळ्या पद्धतीने design केले जाणार होते. नंतर Sonic Cruiser हे project cancel kele गेले. का ते खाली आहेच)
747 X मध्ये फारश्या कोणी उत्साह दाखवला नाही पण Sonic Cruiser मध्ये बऱ्याच मोठ्या airlines ने interest दाखवला. अमेरिकेवर 2001 मध्ये झालेले हल्ल्यांमुळे अमेरिकेतील कंपन्यांना सर्वाधिक नुकसान झाले आणि ज्या कंपन्यांनी आधी Sonic Cruiser मध्ये रुची दाखवली होती त्यांनीही आता विचार बदलण्यास सुरुवात केली. त्यातच वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे विमान कंपन्या जास्ती वेगापेक्षा जास्तीत जास्त fuel efficient विमानांकडे आकर्षित होऊ लागल्या. ह्याच सर्वाची परिणीती म्हणून Boeing ने २० डिसेंबर २००२ मध्ये Sonic Cruiser project बंद केला आणि पारंपारिक पद्धतीचे विमान बनवण्याचा निर्णय घेतला. ज्याला त्यांनी 7E7 असे नाव दिले. 787 हे पहिले विमान ठरले ज्याचे fuselage (मधले नळकांडे ज्यात प्रवासी बसतात) हे aluminum च्या sheets एकत्र जोडून बनवण्याऐवजी एकसंध composite materials वापरून बनवले गेले. ह्या sheets जोडण्यासाठी जवळपास ५०,००० screws सारखे fasteners लागत असत. ह्यामुळे विमानाचे स्वत:चे वजन कमी होण्यास मदत झाली. Boeing च्या म्हणण्याप्रमाणे हे विमान 767 पेक्षा २०% जास्ती fuel efficient आहे. ह्यापैकी फक्त ८% बचत ही नवीन प्रकारचे इंजिन वापरल्यामुळे आहे तर बाकीची composite materials वापरल्याने व काही aerodynamic design improvements मुळे झाली. हे विमान बनवताना मात्र Boeing ने Airbus चाच मार्ग अवलंबला. सर्व काही एकाच ठिकाणी न बनवता विविध कंपन्यांना parts ची subcontracts देऊन फक्त जोडणी स्वत:च्या factory मध्ये केली. ज्यामुळे केवळ ३ दिवसात सर्व जोडणी करून विमान तयार करता येऊ लागले. केवळ airlines साठीच नाही तर प्रवाशांसाठीपण ह्या विमानात बरेच बदल करण्यात आले आहेत. ह्या विमानाच्या आत त्याच्या श्रेणीमधील इतर सर्व विमानांपेक्षा जास्ती जागा आहे. खिडक्या मोठ्या व थोड्या अधिक उंचीवर आहेत तसेच smart आहेत. ज्यामुळे बाहेरील सूर्यप्रकाश डोळ्यावर येत असल्यास automatic dim होऊन तुम्हाला बाहेरचे बघता येते पण प्रकाशाचा त्रास होत नाही. नवीन engines बरीच कमी आवाज करणारी आहेत तसेच sound proofing मधील काही नवीन पद्धतींच्या वापरणे विमानाच्या आत engine noise खूप कमी येतो. असो थोडासा धागा हायजॅक केलाच आहे. अधिक होण्याच्या भयाने इथेच थांबतो. दोन्ही प्रतिसादांमधील बहुतांश माहिती विकीवरून साभार.लंबू टांग तांत्रिक माहिती