लेखनप्रकार
एका प्राध्यापकाने एका अमेरिकन विद्यापीठाच्या हॉस्टेलमधे एक प्रयोग केला. प्रत्येक हॉस्टेलमधे प्रत्येक मजल्यावर एक सार्वजनिक फ्रीज असतो. विद्यार्थी आपापले अन्नपदार्थ त्यात ठेवतात. ह्या प्रा. ने अशाच एका शीतकपाटात डझनभर कोकच्या (कोका कोला) बाटल्या ठेवल्या. रात्री उशीरा, जेव्हा कुणी विद्यार्थी आसपास नव्हते अशी वेळ साधून त्याने हे काम केले. ह्या बाटल्या कुणाच्या आहेत हे फक्त त्यालाच ठाऊक होते. त्याने ह्या बाटल्यांची नोंद ठेवली. आणि त्याला असे आढळले की ७२ तास उलटायच्या आत सगळ्या बाटल्याचा फन्ना उडला. अर्थातच ह्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी खुल्या दिल्याने ह्या बाटल्या "आपल्याशा" केल्या. असाच प्रयोग वेगवेगळ्या हॉस्टेलात केला आणि सगळीकडे साधारण असेच घडले.
मग त्याने एक वेगळा प्रयोग केला. एका तबकडीत डझनभर डॉलरच्या नोटा ठेवल्या आणि ही प्लेट चक्क फ्रीजमधे ठेवली. नंतर अनेक दिवस त्या प्लेटकडे लक्ष ठेवले. पण अनेक आठवडे उलटल्यावरही ह्या नोटा तशाच होत्या.
कोकची एक बाटली साधारण एक डॉलरला पडते. त्यामुळे दुसर्या कुणाची बाटली नि:संकोचपणे संपवणारे विद्यार्थी डॉलरच्या नोटांना हातही लावत नव्हते. आणि हे केवळ एका हॉस्टेलचे नव्हे तर सगळीकडे असेच घडले.
सामान्य माणूस वस्तूपेक्षा पैशाला जास्त पवित्र मानतो का? इथे असे दिसते तरी.
ऑफिसात एखादा माणूस काम करतो. संध्याकाळी बायकोचा फोन येतो की मुलाला पेन्सिल हवी आहे. निघायला उशीर झाला म्हणून घाईघाईने तो माणूस ऑफिसच्या सप्लाय डेस्कमधून एक पेन्सिल उचलतो आणि मुलाला देतो. हाच माणूस पेटी कॅशच्या बॉक्समधून ५ रुपये उचलेल का? वाटत नाही.
ह्यातून पैशाचे पावित्र्य दिसते का? तुम्हाला काय वाटते?
मिसळपाव
प्रश्न पावित्र्याचा नाही...
In reply to प्रश्न पावित्र्याचा नाही... by राजेश घासकडवी
दामल्या दुसर्या कुणासाठी
रोचक. पण....
मनोबांचा मठ्ठ मासला
In reply to मनोबांचा मठ्ठ मासला by हुप्प्या
माझ्या आप्ता, हुप्प्या
हम्म.
प्रयोग
<हॅहॅहॅ> फिरंगी आणि
प्रयोग थोडासा गंडला असला तरी
प्रयोग
सामान्य माणूस वस्तूपेक्षा
प्रयोगाबद्दल
शेवटचा परिच्छेद आम्ही असा वाचला
प्रयोग आणि निष्कर्ष आवडला आणि पटला.
इंटरेस्टिंग!