नमस्कार मंडळी,
गोडघाशा मिपाकरांसाठी ही एकदम सोपी पण वेळखाऊ पाककृती आमच्या सौंकडून साभार. ईकडे खवा मिळत नाही, त्यामुळे ह्या प्रकारे पेढे बनवले.
चला तर मग घ्या साहित्य.
१. रिकोटा चीज (२५० ग्रॅम)
२. स्वीटनड् कंडेंसड् मिल्क (१५० ग्रॅम)
३. बदाम ७-८ (पावडर करुन)
४. वेलची (३-४ बारीक वाटून)
५. स्कीम मिल्क पावडर ४ मोठे चमचे (नाही टाकली तरी चालेल)
यात साखर घालण्याची अजिबात गरज नाही. :)
रिकोटा चीज आणि कंडेंस्ड मिल्क
कृती:
१. एका कढईमधे रिकोटा चीज आणि कंडेंसड मिल्क एकत्र करुन घ्या.
२. गॅस शन्क्य तितका कमी ठेवा. आणि अधून मधुन मिश्रण ढवळत रहा. म्हणजे खाली लागणार नाही. थोडं जरी जळालं तरी पेढ्यांना जळका वास येतो, त्यामुळे काळजी घ्या.
३. साधारण तासभर लागेल मिश्रण चांगलं एकजीव आणि घट्ट व्हायला. मिश्रण घट्ट होत आलं की यात बदाम, वेलची, केसर, आणि स्किम मिल्क पावडर घाला.
४. पुन्हा एकदा चांगलं एकजीव करुन घ्या.
५. मिश्रण घट्ट झालं की गॅसवरुन खाली उतरवून घ्या. हे असं दिसेल.
६. हाताला थोडं तुप लावून हव्या त्या आकारात पेढे बनवा. अतिशय सुंदर आणि रवाळ पेढ्यांचा आस्वाद घ्या.
आपला,
मराठमोळा
वाचने
11093
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटू छान आलेत. मायक्रोवेव्हची
>>मायक्रोवेव्हची पेढे पाकृ
In reply to फोटू छान आलेत. मायक्रोवेव्हची by रेवती
वॉव!
धागा फसला!
असेच म्हणते.....
In reply to धागा फसला! by पिवळा डांबिस
धन्यवाद.
In reply to धागा फसला! by पिवळा डांबिस
तुझ्या बायकोने नै ना वाचला
In reply to धन्यवाद. by मराठमोळा
वाचला ना.. अगदी
In reply to तुझ्या बायकोने नै ना वाचला by शिल्पा ब
शेवटुन दुसरा फोटोच जास्त बरा
रिकोटा चीज
वाह!
सही... !! कोणी लाडू म्हणो का
सुहास, रिकोटा हे ईतर चीज
In reply to सही... !! कोणी लाडू म्हणो का by सुहास झेले
व्वा व्वा... धन्स ममो
In reply to सुहास, रिकोटा हे ईतर चीज by मराठमोळा
बरं झालं!!
मायला पुण्यामुंबईत रिकोटा चीज
अस्सल खव्याची हमी काय ?
In reply to मायला पुण्यामुंबईत रिकोटा चीज by पिंगू
दुध विकत आणून बनवता येईल की
In reply to अस्सल खव्याची हमी काय ? by मराठी_माणूस
>> रिकोटा वापरले त्यात काही
In reply to दुध विकत आणून बनवता येईल की by विश्वनाथ मेहेंदळे
मायला चितळे किती दिवस पुरणार
In reply to मायला पुण्यामुंबईत रिकोटा चीज by पिंगू
पेढे असो वा लाडू... किंवा
मस्त
एक तास ?? म्हणजे दोघांनी
अपर्णा ताई, हे तुमच्या साठी
In reply to एक तास ?? म्हणजे दोघांनी by स्पंदना
ममो.. या रेसिपीचे पेढे सुंदर
ममो
भारी रे !
>>तू खाल्लेना आनंदाने ? झाले
In reply to भारी रे ! by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to >>तू खाल्लेना आनंदाने ? झाले by मराठमोळा
>>मिपा नाही का बदललं? बदलले
In reply to >>तू खाल्लेना आनंदाने ? झाले by मराठमोळा
रीकोटा चिझ पेक्षा ही ताज्या