एक dual SIM वाला mobile घ्यावा म्हणतोय. त्यासाठी सल्ला हवाय. माझे निकष खाली देतोय, त्यानुसार सुयोग्य असा कुठला ठरेल?
१.तो micromax नसावा.(माझ्या सर्व मित्रांना ह्याचा अत्यंत वाइट अनुभव आलेला आहे.)
२.परफॉर्मन्स चांगला हवाय. आवाजात सुस्प्ष्टता हवी.(सोनीचे पूर्वी सातेक हजार पर्यंत मिळणार्या काही मॉडेल्स मध्ये अशी अप्रतिम स्पष्टता होती. तितकी असेल तर उत्तम, त्याच्या जवळपास तरी जाणारी हवी.)
आज काय तर स्पीकर बिघडलाय. उद्या काय तर बॅटरीच बदलायची वेळ आली, असा सततचा त्रास नको. micromax सारखे नको. आमचा नोकिया ६०३० जसा पाचेक वर्षापासून ठणठणीत आहे, तसे काहितरी हवे.
मेन्टेनन्सची, देखभालीची कटकट नको.
३.GPRS,camera,FM व तत्सम हाय्-फाय गोष्टी असल्याच पाहिजेत असा हट्ट नाही. मिळाल्या, तर ठिक, नाही मिळाल्या तरी चालेल .
४.किंमत कमी असलेली बरी.(maintenace व voice quality ह्यावर तडजोड न करता.)
बंधूंनो,मित्रांनो,माझ्या जालशेजार्यांनो जितक्या लवकर ही माहिती मिळेल तेवढे चांगले. भरभरून प्रतिसादाची वाट पाहतो आहे. माझ्यासाठी हे तातडीने करण्याचे काम आहे.
संपादकांनी पाच-सात दिवसांनी धागा उडवला तरी चालेल.
--मनोबा
वाचने
2895
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सॅमसुंग
+१
In reply to सॅमसुंग by पैसा
सॅमसंग उत्तम
ड्युअल सिम जी एस एम ना !
spice QT 55 नेत वरुन ऑर्डर
अरे बाप रे, २० लाखाचा फोन
In reply to spice QT 55 नेत वरुन ऑर्डर by गणेशा
....आँ...
In reply to अरे बाप रे, २० लाखाचा फोन by प्रचेतस
तुमचा स्पेलचेक चालू आहे का !
In reply to ....आँ... by वपाडाव
खालील २ प्रकार चांगले आहेत
सॅमसंग चॅट
आभार...
सॅमसंग HERO 2232
हे पाहिलंत की नाही?