डॉ.दाढे साहेब,
यादें ताझा हो गई !
मी लिहिलेला लेख स्वतंत्रपणे प्रकशित करत आहे पण त्या आधी तुमच्यासारख्या दर्दी माणसासाठी म्हणून मी केलेले हे स्केच सोबत जोडत आहे - बघा आवडतंय का ते !
उदय सप्रेम
संगीतकार मदनमोहन यांना आदरांजली
डॉ. दाढे, मदनमोहन यांची सखोल ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
मनस्वी
"केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."
आणि समयोचित लेख. लेखात दिलेले किस्सेही आवडले. वर दिलेल्या गाण्यांबरोबरच मन्ना डेंचं "कौन आय मेरे मन के द्वारे" (अनुप कुमारची ओव्हर-ऍक्टिंग आणि हातवारे वगळता) आणि त्याच चित्रपटातलं तलतचं "हम से आया न गया, तुम से बुलाया न गया" ही गाणीही सुरेख आहेत. अदालत मधलं 'जमीं से हमें आसमाँ पर' आशा-रफीने तरंगत्या, तरल लयीत गायलं असलं तरी 'यूं हसरतों के दाग' आणि 'उनको ये शिकायत है' ही घायाळ करणारी गाणी गावीत तर लताबाईंनीच. उनको ये मधला आधीचा आलाप, शिकायत मधल्या का वरची जागा हे सारं अप्रतिमच, पण 'अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते' ही ओळ तर नर्गिसच्या भूमिकेबरोबरच त्यांच्या गाण्यातल्या संयत अंडरप्लेलाच उद्देशून लिहिली आहे, असं वाटतं.
मदन मोहन - लता मंगेशकर हे समीकरण स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. वो भूली दास्तां, आज सोचा तो, कदर जाने ना, आप की नजरों ने पासून दो दिल टूटें दो दिल हारें, नैनों में बरसा छाये, मेरा साया पर्यंतची गाणी पाहून थक्क व्हायला होतं. तुमचा लेख वाचून यूट्यूबवर यातली बरीचशी गाणी पुन्हा ऐकली. छान वाटलं. अनेक आभार.
मदन मोहन - लताबाईंच्या सुरेल काँबिनेशनमधलं हे गाणं मला अतिशय आवडतं.
डॉ. दाढे साहेब,
मदन मोहनच्या आठवणी जाग्याकेल्यात. एकदम काळजात हात घातलात!
माझ्याकडे मदनमोहनच्या गाण्यांचा बर्यापैकी संग्रह आहे.
परंतु त्याचे आदानप्रदान करायची काही सोय नाही.
कॉपीराईट आणी कायकाय बडगे दाखवल्यामुळे मदनमोहन सारख्या दिग्गजांची गाणी ही खाजगी संग्रहातच राहतात.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
डॉक्टर साहेब,
आपला लेख अत्यंत अभ्यासपुर्ण व ओघवत्या शैलीतला आहे . [म्हणजे नेहमीच असतो.] स्व. मदनमोहन हे आमच्या दृष्टीने नुसते संगितकार नव्हते ; तर आमच्या भावसृष्टीचे एक घटक होते. आमच्या काळात मनमोहक , कानांना भुरळ घालणारे, अगदी दिलखेचक संगीत देणारे संगीतकार बरेच होते. प्रत्येकाचा एक एक प्रांत [ संगीतातला] होता. एस.डि.; रोशन; नौशाद, शंकर-जयकिशन ई. तर ग्रेटच ; पण रवी, चित्रगुप्त,एन. दता ई. सुद्धा या प्रांतात नांव कमावून होते. [यातील शंकर-जयकीशन माझे अत्यंत आवडते.] तरीपण अंगावर रोमांच यायचे ते मदनमोहनची गाणीं ऐकूनच. लता- मदनमोहन समीकरण तर चित्रपट संगीतातले सोनेरी पानच. काळकूपीतला सोन्याचा खजिना.
नौशादसाब तर एकदा म्हणाले होते कि , " आप अपनी फिल्म 'अनपढ' की वो दो गझल मूझे देदो, मै अपना पूरा संगीत आपको दे दूंगा.' हि मदनमोहनच्या गझल ना मिळालेली सर्वात मोठठी दाद होती.
एकदा 'सवाई गंधर्व संगीत महोत्सवात' [सुमारे २५ वर्षां पुर्वी] उस्ताद विलायतखां यांची सतार चालू होती. आम्ही सर्व श्रोतें त्यांच्या बिलासखानी तोडीने न्हाऊन निघत असतांनाच मदनमोहनजी लुंगी आणि हिरव्या मखमली कुर्त्यांत रंगमंचावर अवतीर्ण झाले. जरा डूलतच होते. त्यांनी रंगमंचावरच बैठक मारली. उस्तादांच्या सतारीवर मदनमोहनजी खुश होवून डुलत होते. खां साहेबांची सतार संपली .टाळ्यांचा कडकडाट झाला. मदनमोहनजींनी माईक हातात घेतला आणि ते खां साहेबांना म्हणाले," अभी तक आपने लोंगोके लीए खुब बजाया. अब मेरे लिये कुछ बजाओ." एका महान कलाकाराने दुसर्या तेवढ्याच महान कलाकाराकडे केलेल्या त्या हट्ट्-प्रसंगाला आम्ही साक्षी दार होतो, हे आमचे परम भाग्य. त्या नंतर खां साहेबांनी एक मिश्र धून वाजवली. 'वाजवली' हे क्रीयापद कमी पडेल. कारण सतार वाजत होती , जणू काही आपोआपच वाजत होती. आणि मदनमोहनजी सापासारखे डोलत होते. त्या विश्वात ते दोघेच होते. त्यांना कुणाचेच आणि कसलेच भान नव्हते. आमच्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नव्हती. आम्ही आमचेच राहीलेले नव्हतो. काळ जणू थांबला होता. 'ती रात्र मी कधीच विसरणार नाही ' असे छापील वाक्य म्हणण्यात काही अर्थ नाही. तसे करणे मला शक्यच नाही. हा महीमा त्या दोघांचा आहे.
मदनमोहनजींना आदरांजली !!
आपल्या सर्वांसाठी मदनमोहनचे एक गाणे..
http://www.esnips.com/doc/f0fb988a-d021-45d7-8a3b-1d8b4eb49cd3/Sapanon-Mein-Agar-
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
दाढे साहेब, माहिती फारच छान दिली आहेत. मदनमोहन म्हटलं की मला आठवण होते आमच्या कोल्हापुरच्या गंगावेश टी स्टॉलची. त्याचा मालक मदनमोहन यांचा मोठा फॅन बरं! त्यांच्या संग्रही अनेक रेकॉर्डस आहेत ज्या आज मंगेशकर घराण्याकडे तसेच मदनमोहन यांच्या पुढच्या पिढीतील लोकांकडेही मिळणार नाहीत. त्या सगळ्या रेकॉर्डस दरवर्षी दि. १४ जुलैला ऐकवतात. प्रत्येक अन प्रत्येक चित्रपट, त्यातील कलाकार, गाणी, संगीतकार यांच्याविषयीचा तो एक एन्सायक्लोपिडीयाच.
अवांतरः दुपार आहे, मी कधीच डोलत नाही. तरीसुद्धा चुकून प्रमोद देवच्या ऐवजी डॉ. प्रसाद दाढे वाचले की काय?????????? :B ~X(
डॉ. दाढे यांना उत्तम लेखाबद्दल धन्यवाद.
मला काही दिवसांपूर्वी एका संकेतस्थळावर मदन मोहऩ यांच्या आवाजातील "दिल ढूंढता है" हे गाणे एका वेगळ्या चालीत ऐकायला मिळाले - ती चाल आता "वीर झारा" मधल्या "तेरे लिये" या गाण्यासाठी वापरली आहे.
"नैना बरसे" या गाण्यासाठीही मदन मोहन यांनी १५-१६ चाली तयार केल्या होत्या शेवटी जी चाल त्यांच्या पसंतीस उतरली ती ध्वनिमुद्रणासाठी वापरली गेली असे वाचले होते.
दस्तक चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
-अमित
डॉ. दाढे यांना उत्तम लेखाबद्दल धन्यवाद.
+१
वीरझारा मधील गाण्यांचे संगीत त्यांनी केलेल्या काही धुनींवर कसे तयार केले यावरील सीडी ऐकण्यासारखी आहे. दस्तकमधील "माई रे" गाणे अफलातून आहे.
काळजाला हात घातलात! मदनमोहन हा माझा फार आवडता संगीतकार.
लताच्या आवाजातल्या रेंजचा अत्यंत सहजपणे वापर करुन घेणारे काही थोडे संगीतकार होते त्यातला अव्वल!
(हृदयनाथ मंगेशकरांनी चाली लावलेली काही गीते ही फक्त लतासाठीच केली आहेत हे जसे वाटते तसेच मदनमोहन बद्दलही म्हणता येईल त्या चालीत्-गाण्यात फक्त लताच डोळ्यांसमोर येते!)
सतारीबरोबरच व्हायोलिनचा अत्यंत आर्त सुरावटींचा वापर हाही अत्यंत चपखलपणे त्याच्या गाण्यात दिसतो. लताची ओळ कुठे संपते आणि व्हायोलिन काळजावरुन कधी फिरु लागतं हे कळतही नाही इतकं ते एकरुप झालेलं आहे. उदाहरणा दाखल 'आप कि नझरो॑ ने' हे गाणे ऐका. संपूर्ण गाण्यात पार्श्वभूमीला असलेलं व्हायोलिन ऐका. काळजाचा ठोका चुकतोच!
'अगर मुझसे मोहोब्ब्त है' हे ही ऐका, पुन्हा तीच जादू, पुन्हा तीच वेदना!
गाण्यातला ठेका किंवा ताल हेही त्याचे फार मोठे बलस्थान होते असं मला वाटतं. (पंचमदा हे सुद्धा मोठे तालातले दर्दी व्यक्तिमत्त्व होते कित्येक गाणी तर त्यातल्या ठेक्यावरुन आपण अचूक ओळखू शकतो की ही पंचमनेच संगीतबद्ध केलेली आहेत. तसेच मदनमोहनबद्दल म्हणता येईल.)
'नैना बरसे रिमझिम' हे ऐका, अचूक ठेका पकडल्यामुळे गाणे एका क्षणात उंच ढगात घेऊन जातेच पण त्याही पेक्षा मुखडा-अंतरा ह्यामधे कुठे थांबायचे आणि पुन्हा सुरु करायचे ह्यातला तोल लाजवाब आहे!
(जाता जाता - मदनमोहनच्या संगीता इतकेच त्याला उत्तमोत्तम गजला देणार्या 'राजा मेहदी अली खान' ह्याचा उल्लेख अपरिहार्य आहे असे मला वाटते, तसे न करणे हा त्या महान गीतकारावर अन्याय होईल. गीतरामायणात जशी गदिमांच्या शब्दांची जादू ही बाबूजींच्या सुरांनी अमृतात परिवर्तित झाली तसाच प्रकार इथेही आहे.)
चतुरंग
सहमत. मदनमोहनबरोबर राजेन्द्रकृष्ण, राजा मेहन्दी अली खान, साहिर लुधियानवी, नक्ष लायलपुरी, मजरूह सुलतानपुरी तसेच कैफी आझमी॑सारख्या थोर गीतकारा॑नी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. मदनची घायाळ करणारी धून व उपरोक्त गीतकारा॑चे हृदयावर वार करणारे शब्द असा तो अजोड स॑गम होता.
त्याचबरोबर मदनमोहनला उत्तमोत्तम स॑गीत-स॑योजक (अरे॑जर) सुद्धा लाभले होते. त्याच्या पुष्कळशा चित्रपटा॑त मास्टर सोनिक, केर्सी लॉर्ड सारखे अत्य॑त गुणी अरे॑जर होते तर शेवटच्या काळात ग्यान वर्मा त्याच्या सोबत होते.
प्रभाकर जोग, उत्तम सि॑ग ह्यासारखे अव्वल दर्जाचे व्हायोलिन वादक तर मनोहारी सि॑गसारखे उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक (आठवा: 'शोख नजर की बिजलिया॑) या॑च्याशिवाय मदनचे पान हलत नसे.
लता म॑गेशकर आणि मदन मोहन हा खरोखरच एका स्वत॑त्र लेखाचाच विषय आहे.. नक्की लिहायला आवडेल
डॉक्टरसाहेब लेख आवडला.
लताने गायलेली बरीच गाणी इथे विनाव्यत्यय ऐकता येतील. त्यात इतरांबरोबर मदनमोहन ह्यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही आहेत.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
शापीत यक्ष ही मदनमोहनला समर्पक उपमा आहे.
अवा॑तरः मदनमोहनला पाळीव कुत्र्या॑चेही वेड होते. त्याच्याकडे एक जोडीही होती.
तो मकानी मॅनोर, पेडर रोड येथे राहात असे.
आणखी एक आठवणः मदनमोहनच्या मृत्यून॑तर त्याचा पियानो विकाउ होता. भलत्याच्या हातात जाऊ नये म्हणून ज्येष्ठ अरे॑जर बासू चक्रवर्ती (एस्.डी व आर्.डी बर्मनचे उजवे हात) या॑नी तो विकत घेतला होता. एक दिवस त्या॑ना मदनमोहनचे अरे॑जर मास्टर सोनिक घराजवळ दिसले. त्या॑नी आपल्या मुलाकरवी (बबलू चक्रवर्ती- आजचे आघाडीचे स॑गीत स॑योजक) मास्टरजी॑ना घरी आणवल॑ आणि म्हणाले,'आप को एक चीज बतानी है॑.. ' अन त्या॑नी सोनिकना त्या पियानोपाशी नेल॑. पियानोच्या पट्ट्या॑वर एकदा हात फिरवताच सोनिकजी उद्गारले,' ये पियानो जाना पेहचाना लगता है..ये तो मदनसाबका है..'
मित्रा॑नो यात आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या प्रस॑गाच्या वेळी मास्टर सोनिक पूर्णपणे आ॑धळे झाले होते! केवळ स्पर्श आणि श्रवणशक्तिनेच त्या॑नी मदनमोहनचा पियानो ओळखला होता..
जबरदस्त!
मदन मोहनांचे संगीत सदैव ताजे होते. उदाहरणच सांगायचे झाले तर त्यांनी अखेरीस केलेली - परवाना ( जिस दिनसे मैने तुमको देखा है ) , मोसम ( दिल ढुंढता है ), हिंदुस्तान की कसम ( है तेरे साथ मेरी वफा ) ही गाणी !
वीर झारातलं - जाने क्युं हे गाणे तर अप्रतिमच ! दुर्दैवाने सिनेमात या गाण्यावर कात्री चालवली गेली!
प्रतिक्रिया
स्व. मदनमोहन या॑ची तसबिर
मदन मोहन यांचे मी केलेले एक स्केच
दैवदुर्विलास
संगीतकार मदनमोहन यांना आदरांजली
+१
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
यू - ट्यूब . . . . . .
मदन मोहन
आदरांजली !
सपनोंमें अगर मेरे...
मस्त
उत्तम लेख
+१
दाढेसाहेब,
सहमत.
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.
असेच म्हणतो
माहितीपूर्ण लेख!
सलाम..
शापीत यक्ष
मास्टर सोनीक म्हणजे - - - - -
बरोब्बर!
मदनमोहन
जबरदस्त!