धनंजय यांच्या चित्रावरुन मला 'गती' या प्रकारातील प्रतिमास्फोट हा चित्रणप्रकार आठवला.
या चित्रणप्रकारातले चित्र पाहताना त्या प्रतिमेचा किंबहुना विषयाचा केंद्रापसारी स्फोट होउन चित्रकण वेगाने सर्व दिशांना फाकत आहेत असा आभास निर्माण होतो आणि वेगाची जाणीव होते. चित्रणातील वस्तू (विषय) आकाशात उंच गेल्यावर बाण फुटुन सर्वत्र रंगीबेरंगी प्रकाश पसरतो तशी केंद्रापासुन बाहेर झेपावत आहे असा आभास होतो.
हे चित्रण करताना भरारीभिंग वापरावे लागते. अनावरण काल जरा वाढवुन किरण साधताच कळ दाबताना अनावरण कालावधीतच फरारीभिंगाचे नाभीय अंतर बदलावे लागते म्हणजे प्रतिमादर्शन लांबुन जवळ व जवळुन लांब करावे लागते. थोडक्यात कळ दाबणे व भरारीभिंगाचे चलन हे एकसमयावच्छेदेकरुन साधावे लागते.
या प्रकारातला हा माझा एक प्रयत्न.


| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4186
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
झालेल्या स्फोटामुळे प्रतिमा
"फरारीभिंगाचे नाभीय अंतर",
सहीच!!
कुठलाही काढलेला फोटो फोटो शोप
छान प्रयत्न ..
बरोबर
In reply to छान प्रयत्न .. by मर्द मराठा
छान.
अनावरण काल = अॅपरेचर
अनावरण काल
In reply to अनावरण काल = अॅपरेचर by विजुभाऊ
आपण जशा प्रकारे मराठी
In reply to अनावरण काल by सर्वसाक्षी
धन्यवाद
In reply to आपण जशा प्रकारे मराठी by पाषाणभेद
छान तंत्र
चांगला प्रयत्न. हे करुन
यशोशी सहमत... पण हा प्रयोग
In reply to चांगला प्रयत्न. हे करुन by यशोधरा
अवश्य!