गोव्याला फेरी ही माझ्या जिवाभावाची गोष्ट आहे. यंदाच्या फेरीत मी माझ्या आवडत्या कोळवा बीचवरच मुक्काम ठोकला. कोळवा बीचवर केंच्युकी हे खाण्याचं जबरदस्त ठिकाण आहे. त्याहूनही भारी असलेलं "मार्टिन्स कॉर्नर" तिथून थोड्याश्याच अंतरावर आहे.
या ठिकाणांविषयी परत कधीतरी लिहीन कदाचित. पण यंदा असंच फिरत फिरत सापडलेलं ठिकाण म्हणजे "फिशरमन्स व्हार्फ" सर्वांसमोर आणावं म्हणून लिहावंसं वाटलं.. खादाडी सफरीमधे.. अशा खात्रीने की मिपावर अनेक खाद्यसंप्रदायी आहेत, आणि वेगवेगळ्या टाईपची खादाडीची ठिकाणं माहीत झालेली त्यांना आवडतील
यावेळी काहीतरी वेगळं हवं होतं. म्हणून रात्री कोळव्याच्या बीचवर बाहेर पडलो.
तिथे किनार्यावर संध्याकाळ ते मध्यरात्र असा एका रिक्षात मशीन बसवून डोळ्यादेखत गरमागरम चिकन शवारमा (उच्चारातल्या चुकांबद्दल मिपाकरांनी एकूणच मला माफ करत चलावं..) बनवून देणारा पिंटो नावाचा मनुष्यविशेष आहे. पिंटोकडचे तीन शवारमा काजूच्या फेणीसोबत चापले. त्यातच रात्रीचं जेवण झालं. मग बाजूलाच असलेल्या नेहमीच्या आवडत्या केंच्युकीत जायची पोटाची हिंमत झाली नाही.
दुसर्या दिवशी दुपारच्या वेळी मी ठरवलं की गोव्याच्या आणखी आणखी दक्षिणेकडे जात रहायचं. बघू तरी कोळव्याच्या अजून दक्षिणेला अजून किती आणि कसा गोवा आहे?
बरंच अंतर रँडमली भटकत गेल्यावर निर्जन भाग लागला. तिथपासून रस्त्याच्या बाजूला फुलसाईझ होर्डिंगवर एका मस्तपैकी फ्राय करुन ठेवलेल्या प्रचंड माशाचा फोटो होता. माझी भूक खवळली.
हा फोटो मी फिशरमन्स व्हार्फच्या साईटवरुन घेतला असला तरी असाच काहीसा तो होर्डिंगवरचा फोटोही होता. त्यावर एक बाण दाखवून "फिशरमन्स व्हार्फ" असं नाव लिहिलं होतं.
अगदी हव्या तेवढ्या योग्य अंतरावर हे बोर्ड रिपीट होत होते, फक्त माश्याऐवजी कधी खेकडा, कधी कोळंबी... पोटाचे हाल व्हायला लागले.
त्यामुळे मग या ठिकाणी जायचंच असं माझ्या मनाने घेतलं.. बोर्डांवरचे बाण फॉलो करत मी खूप खूप दूर जात राहिलो. शेवटी इतक्या निर्जन ठिकाणी खरंच काही असेल की आपला पोपट बनवण्यात येत आहे हे कळेना. पोपट झाल्यास उडता तरी येईल असा पॉझिटिव्ह विचार करुन मी तसाच जात राहिलो.
शेवटी एका ठिकाणी संपूर्ण आयसोलेटेड भागात एक वळण आलं. तिथेच होती फिशरमन्स व्हार्फची जागा. माझा फोटो पूर्ण व्ह्यू कव्हर करणारा न आल्याने मी इथे फिव्हाकडून घेतलेला फोटो साभार देत आहे.
आहा. जागा तर बेहद्द आवडली.. आता मुख्य प्रश्न.. मेनू कायकाय ? आणि किंमतीचं काय?
उर्दू पद्धतीने मेनूकार्ड पाहून तातडीने आनंद झाला कारण पदार्थांच्या किंमती अगदीच वाजवी होत्या. व्हरायटीही उत्तम दिसत होती. समुद्रजीवप्रेमींना नंदनवन वाटायला हरकत नव्हती.
काठावरचं एक टेबल पकडून बसलो.
बारच्या काउंटरवर एकदोन उत्साही तरुण बारटेंडर दिसत होते आणि बाजूला एका बोर्डवर बर्याच ऑफर्सही लिहिलेल्या होत्या. एकावर एक फ्री ड्रिंक वगैरे. ताज्या हापूस आंब्याचे मार्गरिटा बनवून देत होते. ही कल्पना मला आवडली आणि त्यातलं एक मी फस्त केलं. अफलातून टेस्ट होती. इथे मी फिव्हाला हाय रेटिंग द्यायला सुरुवात केलीच. मार्गरिटातील टकीला गोव्यातच बनवलेला उत्तम दर्जाचा टकीला होता. डेस्मंडजी या मेकचा.
नंतर मी मेनूवर नजर टाकली. बटर गार्लिक श्रिंप अशा एका प्रॉन्सच्या डिशने लक्ष वेधलं. मग ती मागवली आणि सोबत मागवला लंबबेट चहा. इथे मिळालेला लाँग आयलंड आईस टी आत्तापर्यंत चाखलेल्यातला सर्वोत्कृष्ट होता. अप्रतिम ब्लेंड.. अजूनही चव तोंडात येतेय.
मेनूत प्रॉन्स, खेकडे, मासे, म्हाकुळ यांचे असंख्य प्रकार दिसत होते. आंबट तिखट टायटलखाली येणारं गोवन कालवण, मोरी ऊर्फ शार्कचे पदार्थ असा बराच व्हरायटीवाला मेनू होता.
गोव्यात नवीन ठिकाणी गेलं की मुख्यतः फिशकरी आणि भात असा साधा मेनू मागवावा. मी तर गोव्यात दोनपैकी एक जेवण फिशकरी राईसचंच घेतो. ती गोव्याची "सिग्नेचर" डिश आहे. शिवाय माझं असं मत आहे की साधा पण त्या इलाक्यातला सिग्नेचर पदार्थ मागवला की संपूर्ण किचनची आणि त्यातल्या चवीची कल्पना एकदमच येते. उदा. उत्तरेकडील ढाब्यांवर दालरोटी..
तर.. फिशकरी राईस मागवला.
पुन्हा एकदा तेच.. आत्तापर्यंत गोव्यात खाल्लेल्या गोवन फिशकरीपैकी ही सर्वात टेसदार होती. अतिशय तृप्त वाटलं. सोबत मद्याचे सिप्स आणि मासा यासारखं सुख नाही. इथेही फेणी उपलब्ध होतीच.
एकूण शंभर ते दोनशेच्या मधे किंमती असलेले पदार्थ आणि ड्रिंक्स, प्रशस्त ऐसपैस जागा, पोरांना खेळायला भरपूर बाग, समुद्र आणि नदी यांच्या अगदी काठावर आणि मुख्य म्हणजे अतिशय मस्त चव.. असे खूप गुण असलेलं फिशरमन्स व्हार्फ सोडलं ते लवकरात लवकर परत येण्यासाठीच...
त्यांची वेबसाईट नंतर सापडली. तिथे कसं जायचं वगैरे वेबसाईटवरुन कळेल...
रेकमेंडेड.. जा जरुर...

वाचने
9221
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
अरे दुष्टा कुठे फेडशील ही
+ १ आता कुठे बियर फेस्ट मधील
In reply to अरे दुष्टा कुठे फेडशील ही by गणपा
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो !!
In reply to + १ आता कुठे बियर फेस्ट मधील by निनाद मुक्काम …
ताजे आंबे म्हणजे टिनमधला आमरस
In reply to ठ्ठो ठ्ठो ठ्ठो !! by वपाडाव
गोव्यात गेल्या नंतर आवडीने
+१
In reply to गोव्यात गेल्या नंतर आवडीने by गणेशा
ओळख, जागा, मेन्यु हे सगळं
'या अति वाईट विनोदाबद्दल माफक
पण आमच्यासाठी काय, म्हणजे मी,
मस्त
जरुर जा. केंचुकीला पण.. अगदी
In reply to मस्त by नंदन
मद्य, किमान फेणी आणि मासे खात
वा
In reply to मद्य, किमान फेणी आणि मासे खात by गवि
फि व्हा मधे शाकाहारीही मस्तच मिळत बरका!!!
In reply to मद्य, किमान फेणी आणि मासे खात by गवि
ओ ५०राव.... आशुला कसं इसर्ला
लेखन आवडलं. वर
मस्तच!!
छान माहिती
प्रकाटाआ
नावाजलेलं हाटेल
>>> गोव्यातलं चविष्ट शाकहारी
In reply to नावाजलेलं हाटेल by पैसा
+१
In reply to >>> गोव्यातलं चविष्ट शाकहारी by पिंगू
या या!
In reply to +१ by सोत्रि
रामपार्या ?
In reply to नावाजलेलं हाटेल by पैसा
ए बापू
In reply to रामपार्या ? by वपाडाव
म्हणजे बंगाली लोकांसारखच म्हण
In reply to ए बापू by पैसा
हापूसची मार्गारिटी - च् च्
थोडा बदल
In reply to हापूसची मार्गारिटी - च् च् by धनंजय
फिशरमन व्हार्फचं नाव ऐकून दचकलो