✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १)

ज
जागु यांनी
Wed, 10/05/2011 - 14:45  ·  लेख
लेख
हा रविवार रानफुलांच्या शोधात घालवू असे ठरवले आणि सकाळी नणंदेला घेउन रानफुलांच्या वाटेने निघाले. आमच्या एरीयात मी पहीलीच असेन अशी रस्त्यात फोटो काढणारी. जर लाजले तर मुळ हेतू दुर राहील आणी मनसोक्त फोटो काढता येणार नाही. म्हणून रस्त्याला कोण येत जात तिथे पाहीलच नाही. नणंदेला स्कूटीवर ड्रायव्हिंग करायच होत म्हणून तिने तिची वेगळी आणि माझी वेगळी अश्या दोन गाड्या घेउन आम्ही दोघी हम दो शेर चले प्रमाणे निघालो. सुरुवातीलाच एका ओसाड जागी जाऊन दोघी थांबलो. ती फक्त जाण्या येण्याची वाट आहे. दुचाकी तिथे जात येत होत्या. मला कॅमेरा अ‍ॅडजेस्ट होत नव्हता. प्रचंड दु:ख होत होतं तेंव्हा. अस वाटत होत मी फोटोग्राफीचा कोर्स करायला हवा होता. इतकी सुंदर फुले आणि मला चांगले फोटो काढता येत नाहीत ह्याच दु:ख मनात ठेवुन शेवटी मी सगळे फोटो ऑटो मोडवर काढले. उनही मध्ये मध्ये येत होत. त्या ओसाड वाटेवर एक दुचाकी परत फिरुन आली आणि आम्हाला विचारल मॅडम काही प्रॉब्लेम आहे का ? त्यांना वाटल आमची गाडी वगैरे बिघडली असेल म्हणून आम्ही तिथे थांबलोय. मग फोटो काढतोय म्हटल्यावर मनातल्या मनात आमच्या नावाने त्यांनी शंख फोडले असतील. :हहा: येणारे जाणारे सगळेच आमच्याकडे काय वेड्या कसले फोटो काढताहेत ह्या हावभावाने पाहत होते अगदी मान वळवून. पण मी कोणाकडे पहायचच नाही हे पथ्य पाळून फोटो काढत होते. मला नणंदेचीही काही फुल शोधून देण्यात मदत झाली. जवळ जवळ २ तास आम्ही फुलांचे फोटो काढत होतो. ठिकाण मुद्दामच लिहत नाही कारण कास सारखी परिस्थिती ह्या रानफुलांची होऊ नये. त्यांनी मुक्तपणे रुजावे फुलावे हिच इच्छा आहे. सध्या कामगार ही झुडपे कचरा म्हणून उपटून टाकत आहेत. मला खुप राग येतो त्यांचा पण त्यांच ते कामच आहे. इच्छा एवढीच आहे की त्यांनी ही झाडे सुकल्यावर ती काढावीत. फोटो काढताना जाणवले की आपण जी मुबलक प्रमाणात फुलतात तिच फुले पाहण्यात येतात. पण सुक्श्म नजर ठेउन पाहील तर पुष्कळ रानफुले आपल्या आसपास असतात. मला जशी टिपता आली तशी खाली देत आहे. ह्या काही रानफुलांची नावेही मला माहीत नाहीत जाणकारांनी ती द्यावीत. १) रानतीळ १(अ) १ब) २) कुर्डू किंवा कोंबडा २(अ) ३) तालिमखाना/कोळशिंदा ४) निळी पुंगळी ५) कवळा ५ (अ) ६) रानभेंडा ६ (अ) ७) एकदम चुन्नुक फुल होत हे. ७(अ) ८) ८(अ) ९) १०) ११) हे इतके छोटूकल आणि सुंदर फुल होत की बघतच बसावस वाटत होत. ११(अ) १२) सोफुबिया १२ (अ) १३) चिकणा १४) डवचाणा १५) बहुतेक हा रानतुरा १५(अ) १६) १७) १८) १८(अ) १८ (ब) १९) पांढरा गोकर्ण २०) निळा गोकर्ण डबलचा अजुन खुप रानफुले आहेत. आता पुढच्या भागात.
  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २)
  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३)
  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४)
  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ५)
  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६, रानफुलांचे शतक)
  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ७)

Book traversal links for रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १)

  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13466 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

सगळे फोटो खुप मस्त आहेत..

विशाखा राऊत
Wed, 10/05/2011 - 14:59 नवीन
सगळे फोटो खुप मस्त आहेत.. :) धन्यवाद जागुताई
  • Log in or register to post comments

अप्रतिम मस्त फोटो जागुतै

जाई.
Wed, 10/05/2011 - 15:10 नवीन
अप्रतिम मस्त फोटो जागुतै तुझ्या चिकाटीला _/\_
  • Log in or register to post comments

खुपच अप्रतिम, एकदम

उदय के'सागर
Wed, 10/05/2011 - 15:38 नवीन
खुपच अप्रतिम, एकदम खेडेगावातल्या माळरानातल्या पायवाटांवरून चालल्या सारखं वाटलं. खरच, हे रानफुलं किती दुर्लक्षीत असतात पण तुम्ही त्यांच खरं सौंदर्य आणि ऐश्वर्य तुमच्या फोटोज मधुन दाखवुन दिलं त्यासाठी शतशः -^- तुमचे सर्व जुने धागे बघता एकच म्हणेन ... जागुतै - A true LIVELY Indian :)
  • Log in or register to post comments

विशाखा, जाई, उदय धन्यवाद.

जागु
Wed, 10/05/2011 - 15:40 नवीन
विशाखा, जाई, उदय धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्तच ग जागुतै. गोकर्णाची फुल

गणपा
Wed, 10/05/2011 - 15:43 नवीन
मस्तच ग जागुतै. गोकर्णाची फुल पाहुन जमाना लोटला. :)
  • Log in or register to post comments

जागू

श्रावण मोडक
Wed, 10/05/2011 - 15:49 नवीन
जागू स्पेशल. प्रकाशचित्रे आवडली.
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
Fri, 10/07/2011 - 01:10 नवीन
छान. +१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

छान फुले

स्मिता.
Wed, 10/05/2011 - 15:52 नवीन
खूपच छान फुलं आहेत गं जागुताई. काही पाहिलेली तर काही नवीनच...
  • Log in or register to post comments

सुंदर !

प्राजक्ता पवार
Wed, 10/05/2011 - 15:56 नवीन
जागु , सर्वच फोटो छान आलेत :)
  • Log in or register to post comments

गणपा, श्रावण, स्मिता,

जागु
Wed, 10/05/2011 - 16:03 नवीन
गणपा, श्रावण, स्मिता, प्राजक्ता धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मष्ट ! भाग २ ची वाट पाहतो.

मदनबाण
Wed, 10/05/2011 - 16:18 नवीन
मष्ट ! :) भाग २ ची वाट पाहतो. :) जमल्यास मी पण फुलवाला धागा टाकतो... (गुलाब प्रेमी) :)
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम ..

गणेशा
Wed, 10/05/2011 - 17:50 नवीन
निव्वळ अप्रतिम ..
  • Log in or register to post comments

जबरदस्तच ,

५० फक्त
Wed, 10/05/2011 - 18:17 नवीन
जबरदस्तच ,
  • Log in or register to post comments

जागुताय.. मस्त फुले आहेत.

पिंगू
Wed, 10/05/2011 - 18:27 नवीन
जागुताय.. मस्त फुले आहेत. ह्यातील काही फुले कासला बघितली आहेत. - पिंगू
  • Log in or register to post comments

वॉव.......! सगळ्यात मस्त असेल

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/05/2011 - 19:27 नवीन
वॉव.......! सगळ्यात मस्त असेल तर तो नं-१८..... फिदा... खल्लास... मार डाला.... एटिन टिल आय डा...य....! :-)
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Wed, 10/05/2011 - 19:51 नवीन
वा, जागु, खूपच छान!
  • Log in or register to post comments

गणेशा, ५०,पराग, पिंगु

जागु
Wed, 10/05/2011 - 19:53 नवीन
गणेशा, ५०,पराग, पिंगु धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जागुतै,

प्रास
Wed, 10/05/2011 - 22:27 नवीन
लय भारी फोटोज बघा.... ते १६ नंबर वेगळंच वाटलं....
  • Log in or register to post comments

मस्त !

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 10/06/2011 - 09:07 नवीन
अरेच्चा हा धागा कसा बघायचा राहिला ? हे कुठे आहे ? मला येथे फोटो काढायला यायचे आहे. मदत होईल का ? काही फुले अगदीच नवीन आहेत मला. १६ वे बहूदा रान पडवळाचे असावे. शास्त्रीय नाव बहूदा Cucurbitaceae. (Flowers of Sahyadri मधून). थांबा ! मी आलोच :-) ट्रायपॉड नी कॅमेरा घेऊ द्या की रं मला बी फोटोला येऊ द्या की रं
  • Log in or register to post comments

आणी

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 10/06/2011 - 10:00 नवीन
फुल एकदम छान आहेत पन जंगली झुडपांचे फोटो टाकन्याचे प्रयोजन नाही कळले
  • Log in or register to post comments

जागुताई, फोटो पाहून कोकणातले

इरसाल
गुरुवार, 10/06/2011 - 11:31 नवीन
जागुताई, फोटो पाहून कोकणातले दिवस राहून राहून आठवत आहेत. उत्कृष्ट छायाचित्रण. क्यामेरा कोणता आहे तुजपाशी ?
  • Log in or register to post comments

खूप छान..

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/06/2011 - 15:14 नवीन
खूप छान आहेत छायाचित्रे. जरा संकलीत (एडीट) केली असती तर अजून मजा आली असती.
  • Log in or register to post comments

>>> ठिकाण मुद्दामच लिहत नाही

पाषाणभेद
गुरुवार, 10/06/2011 - 15:42 नवीन
>>> ठिकाण मुद्दामच लिहत नाही कारण कास सारखी परिस्थिती ह्या रानफुलांची होऊ नये. त्यांनी मुक्तपणे रुजावे फुलावे हिच इच्छा आहे. हे वाक्य तर प्रचंड आवडलं! आपल्या साधनेला प्रणाम.
  • Log in or register to post comments

झेंडु

बद्दु
गुरुवार, 10/06/2011 - 16:41 नवीन
१८ अ आणि १८ ब बहुतेक इंग्लिश झेंडू असावेत. बाकी फोटो सुंदर आले.
  • Log in or register to post comments

क ह र!! अप्रतिम! ते छोटुकलं

प्राजु
गुरुवार, 10/06/2011 - 22:11 नवीन
क ह र!! अप्रतिम! ते छोटुकलं पांढरं फूल कसलं सुंदर आहे.. पाकळ्यांना तुरे आहेत.. :)
  • Log in or register to post comments

मस्त फुलं! काही पाहिलेली तर

रेवती
गुरुवार, 10/06/2011 - 22:31 नवीन
मस्त फुलं! काही पाहिलेली तर काही न पाहिलेली. १६ नंबराचं फूल एक नंबरी आहे.;) असं असू शकेल याची कल्पना केली नव्हती.
  • Log in or register to post comments

प्रास, जयंत, नावसेना प्रमुख,

जागु
गुरुवार, 10/06/2011 - 23:28 नवीन
प्रास, जयंत, नावसेना प्रमुख, प्रभाकर, पाषाणभेद, बद्दू, प्राजु, रेवती, जयंत कुलकर्णी धन्यवाद. इरसाल कॅमेरा कॅनॉनचा आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सविता००१
Fri, 10/07/2011 - 14:30 नवीन
जबरदस्त छायाचित्रे....... मस्त
  • Log in or register to post comments

:) :) :) :)

पल्लवी
Fri, 10/07/2011 - 18:09 नवीन
भारी ! भारी !! भारी !!!!!!!
  • Log in or register to post comments

अहाहा!

वाहीदा
Sun, 10/09/2011 - 21:02 नवीन
डोळे तृप्त झाले ! जाईन विचारीत रानफुला .... भेटेल तिथे गं, सजण मला भग्न शिवालय परिसर निर्जन, पळस तरुंचे दाट पुढे बन, तरुवेली करीतील गर्द झुला, भेटेल तिथे गं, सजण मला ! उंच पुकारील, मोर काननी, निळया ढगांतून भरेल पाणी, लहरेल विजेची सोनसळा, भेटेल तिथे गं, सजण मला ! वाहत येईल पूर अनावर , बुडतील वाटा आणि जुने घर, जाईल बुडून हा प्राण खुळा, भेटेल तिथे गं, सजण मला ! गीतकार :शांता शेळके
  • Log in or register to post comments

जबरदस्त

पप्पु अंकल
Mon, 10/10/2011 - 10:59 नवीन
सुंदर फोटो, शार्प फोकसिंग आणि फुलांना जपण्याच्या तुमच्या भावनांना सलाम. आणि मानल तुम्हाला काय काय करता तुम्ही. फोटो काढायला जाताना १ व्हाइट कार्डबोर्ड जवळ असावा ज्याचा वापर रिफ्लेक्टर सारखा करता येतो वा विषयावर पडणारे थेट उन टाळण्यास देखिल होतो.
  • Log in or register to post comments

मत्त मत्त फोटो! आडौले. (शब्द

प्यारे१
Mon, 10/10/2011 - 13:46 नवीन
मत्त मत्त फोटो! आडौले. :) (शब्द वप्याकडून साभा... कशाला? तसाच घेतला आहे. ;) )
  • Log in or register to post comments

१६ क्रमांकाचा फटु तर लैच

वपाडाव
Mon, 10/10/2011 - 13:59 नवीन
१६ क्रमांकाचा फटु तर लैच आडौला गेला आहे.... त्याचं नाव सांगितल्यास वुत्तम....
  • Log in or register to post comments

मस्त हो जागुताई !!

दीप्स
गुरुवार, 10/20/2011 - 13:02 नवीन
छान आहेत फोटो. यातली बरीचशी फुले कधी पाहिलीही नाही तुमच्या मूळे पहावयास मिळाली त्या बद्दल धन्यवाद ! आणि दंडवत तुमच्या हौशिपानाला --- /\ ---
  • Log in or register to post comments

सविता, पल्लवी, अंकल, प्यारे१,

जागु
Fri, 10/21/2011 - 12:48 नवीन
सविता, पल्लवी, अंकल, प्यारे१, वडापाव, दिप्स धन्यवाद. वहिदा एकदम मस्त वाटल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा