एक रम्य संध्याकाळ!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मिपाकरहो!!
मी इथे (संकेतस्थळावर) खुप दिवस असलो तरी आज लिहीता झालो. हा माझा पहिला धागा आहे. तरी कृपया सांभाळुन घेणे ही विनंती.
तर एका रम्य परंतु थंड अशा रविवार संध्याकाळी रुमवर आराम करत पडलो होतो. इकडचा (जर्मनी) उन्हाळा संपुन फॉल (मराठीत शब्द माहित नाही... पानगळती का?) चालु झालाय. थंडी चालु झाल्यामुळे बाहेर जास्त पडावेसे वाटत नाही. पण थोडेसे ऊन असल्यामुळे लोक बाहेर पडले होते. तसेही इकडचे लोक थोडेसे जरी सुर्याचे दर्शन झाले की बाहेर पडायला उत्सुक असतात. आपल्याला त्याचे जास्त कौतुक नाही. पण शेवटी लोळण्याचापण कंटाळा आला...मग पडलो बाहेर कॅमेरा काढुन.
आमच्या कॉलनीमागे एक मस्त ओल्पर नावाचे तळे आहे. त्याच्या बाजुनेच जॉगिंग ट्रॅकसुद्धा आहे. खुप लोक सकाळ संध्याकाळ जॉगिंग करत असतात. मी सुद्धा जॉगिंगचे प्रयत्न केलेत पण आजतागायत कायमपणा ठेवता आलेला नाही. असो. पण फिरायला जातो. तर जरा या रम्य संध्याकाळचे फोटो काढले आहेत. ते इथे चिकटवतो.
ही जाण्याची वाट...
कानात मस्त आयपॉड लावुन जगजीत साहेबांच्या गझल ऐकत निघालो होतो...
मध्येच आकाशात एक चॅटर प्लेन चाल्ले होते.. एक क्लिक मारला जाता जाता..
एक जोडपे फिरायला निघालेले चिरंजिवांबरोबर...
मग दिसला तो राजहंस... याच्याबद्द्ल शब्दात काय वर्णन करणार?
बाकी थोडे चालु झालेल्या फॉलचे फोटोज..
हे ते नयनरम्य तळे...
सुर्व्या आला तळपुन गेला.. मावळतीच्या खळगालीला...(पण जास्त तळपत नाहीये आजकाल :( .... )
हे जोडपेपण मस्त मजा लुटत आहे..
नंतर काय झाले काय माहित... भांडले कदाचीत... ती त्याला सोडुन पळाली... :(
आणि मग आम्हीसुद्धा घराकडे पळालो...काय करणार थंडी वाढत होती...
(कॅमेरा साधाच डिजीट्ल आहे.. आणि मी शिकाऊ छायाचित्रकार आहे.. :) एसलआर घ्यायचा इरादा आहे.. कृपया चांगला कॅमेरा जाणकार लोकांनी सुचवणे..)
प्रतिक्रिया
फोटो आवडले. हे ठिकाण तुमच्या
हो नक्कीच!!
मस्त फोटो!
छान!! आवडले फोटू!
अप्रतिम फोटो
मस्त फटू आहेत.
+१
मस्त फोटो आहेत. पण काय हो, ती
बदकीणच
पण काय हो, ती सोडुन गेलेली
बदक असावे...
सुंदर फोटो. असे ठिकाण आपल्या
फोटो अतिशय छान.
छान आलेत फोटो
सुंदर फोटु.
छान!! विशेषतः वरून ४था आणी तो
मस्त फोटो
मस्त रे !!
धन्यवाद!!
होका ??
"आळस हा माणसाचा शत्रु आहे,
जर्मनीचे? जर्मनीचे असूनही
हॅ हॅ हॅ
हम्म.. !!
सुंदर
प्रत्येक फटु डेस्कटॉपवर
अप्रतिम फोटो आहेत सगळे
उत्तम चित्रे
अतिशय सुरेख!
सगळेच फोटो सुरेख
अप्रतिम
जबरदस्त फोटो काढलेत, कालच
मस्तच....फोटो झकास..
मस्त फोटो..
मोहनराव, मस्त फोटो आले
मस्तं....