मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोप्पा लेमन केक

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्य: १ वाटी मैदा १२ टेस्पून साखर २ अंडी (फ्रिजमधून थोडे आधी काढून ठेवावी) ४ टेस्पून तेल ४ टेस्पून दुध ११/२ टेस्पून लिंबाचे किसलेले साल (फक्त पिवळा भाग, पांढरा नको नाहीतर कडवट होईल) १ टेस्पून लिंबाचा रस २ टीस्पून बेकिंग पावडर १/२ टेस्पून व्हॅनिला इसेन्स मीठ जरासे चवीपुरते . पाकृ: प्रथम मैदा, मीठ व बेकिंग पावडर एकत्र करुन दोन-तीनदा चाळून घेणे. एका भांडयात अंडी व साखर इलेक्ट्रीक बीटर किंवा वायर-व्हिस्कने घट्ट होईपर्यंत फेटणे. . त्यात थोडे-थोडे करून तेल घालून चांगले फेटणे. . मग त्यात चाळून घेतलेला मैदा थोडा-थोडा करुन घालणे व एकत्र करणे. . मैदा अगदी चांगला मिसळला की त्यात दुध घालावे व फेटावे. . आता त्यात व्हॅनिला इसेन्स, लिंबाचे किसलेले साल व लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण एकत्र करणे. (फोल्ड करणे) . तुप लावलेल्या केकच्या भांडयात हे मिश्रण ओतून, प्री-हिट केलेल्या ओव्हन मधे १८० डिग्रीला ३५-४० मिनिटे बेक करणे.केक तयार झाला की कुलिंग रॅकवर काढून गार करायला ठेवणे. . त्याचे स्लाईसेस करणे व खायला सुरुवात करणे. . . नोटः ह्या केकवर तुम्ही कुठले ही फ्रॉस्टींग लावू शकता, आईसिंग शुगर भुरभुरु शकता....मला ह्याचा सिट्रस फ्लेव्हर खुप जास्त आवडतो, म्हणून मी त्यावर कसलचं ग्लेज किंवा फ्रॉस्टींग लावत नाही.

वाचने 6870 वाचनखूण प्रतिक्रिया 14

रेवती Wed, 10/19/2011 - 07:02
भारी आहे. फोटू मस्त! एक शंका, लिंबाच्या सालीचा फ्रेश वास असताना व्हॅनिला एसेंन्स वापरल्याने काही चांगला फरक पडतो का? स्वातीताईची आठवण आली.

हो व्हॅनिला एसेंन्स घातल्यामुळे अंड्याचा वास येत नाही आणी लिंबाच्या सालीचा फ्रेश वास खुपचं स्ट्राँग असल्यामुळे चवीत फरक पडत नाही :)